Pages

Monday, 24 April 2017

आला उन्हाळा… आरोग्य सांभाळा…

   
   आला उन्हाळा… आरोग्य सांभाळा…
                                                  ( ग्रीष्म ऋतुचर्या )




                   हे शीर्षक वाचूनच तुम्ही म्हणाल की ‘अहो, उन्हाळा येतोय कसला, आता तर अगदी ठाणच मांडून बसलाय! हीटवेव्ह तर दोनदा येऊन गेली. बसल्या बसल्या शिजतोय आम्ही रोज.’ तुमचंही खरंच आहे म्हणा,यावर्षी आल्हाददायी वसंत फारसा असा जाणवलाच नाही. सध्या वसंत ऋतू सुरु आहे असं फक्त झाडावरची कोवळी पालवी आणि गाणारा कोकिळच म्हणेल, बाकी हवामान तर ग्रीष्माचीच लक्षणं दाखवतं आहे.सूर्याची प्रखर किरणं अंगाची काहिली करत आहेत आणि म्हणून यावर उतारा देण्यासाठी गल्लोगल्ली टपाटप लिंबू सरबत,ज्यूस,ताक, लस्सी,सोडापब ची दुकानं उभी राहिलीत आणि त्यांच्या समोरची गर्दी ही शीतपेयं पटापट रिचवू लागलीय. पण इथेच खरा घात होतो. हे असे गारेगार उपचारच उन्हाळ्यात त्रासदायक ठरतात त्यामुळे त्यांचा वापर हा मर्यादितच हवा.
               कर्कवृत्तावर असलेल्या आपल्या संपूर्ण भारतात उन्हाळा अंमळ कडकच असतो. उन्हाळ्यात सूर्यकिरणे लंबरूप पडत असल्याने अधिक प्रखर असतात. त्यात आपण प्रगतीच्या नावाखाली केलेल्या विकास(??)कामांनी  वाढवलेले ग्रीन हाऊस इफेक्ट्स या तीव्रतेत अधिकच भर घालतात. या अतिउष्णतेमुळे वातावरण आणि जमीन उष्ण,रुक्ष बनते. यामुळे या काळात शरीरामध्ये वातदोषाचा नैसर्गिक संचय आणि कफ दोषाचे नैसर्गिक शमन होते. यामुळे शरीराची रुक्षता वाढते.शरीरबल, पचनशक्ती आणि जाठराग्नि मंद होतात.
                   अशा वेळी शीतोपचार मर्यादा पाळून करायला हवेत. म्हणजे बाह्योपचार शीत असावेत पण आभ्यंतर उपचार करताना या गारव्याचा मारा नको. बाह्योपचार म्हणजे आंघोळीसाठी कोमट किंवा साधे नळाचे पाणी वापरावे.आंघोळीनंतर शरीराला चंदनाचा लेप किंवा चंदनाचे वस्त्रगाळ चूर्ण लावावे(म्हणजे नेहमीच्या टाल्कम पावडरऐवजी चंदनाचे चूर्ण वापरता येईल.),मोगरा-जाई-जुई सारख्या सुगंधी फुलांच्या सहवासात राहावे.सध्याच्या काळात कोणी गजरे माळत नाही पण फुले फक्त सौंदर्यासाठी महत्वाची नाहीत तर चंदन,मोगरा,जाई-जुई या शीतवीर्यात्मक वनस्पती आहेत. त्यांचा सहवास बाह्य वा आभ्यंतर वापर पित्तशामक असतो. तसेच त्यांचा सुगंध मनाला आल्हाददायक असतो.(ही एक प्रकारची Aroma therapy म्हणा ना). याखेरीज घरात,ऑफिसेस मध्ये वावरणाऱ्या व्यक्तींसाठी पंखा, वातानुकूलन यंत्र आणि कूलर यामध्ये दमट हवामानात वातानुकूलन यंत्र आणि कोरड्या हवामानासाठी आर्द्रता आणि तापमान नियंत्रित करणारा (temperature and humidity control) कूलर हितकर. पण यामुळे बाहेरच्या आणि आतल्या तापमानात जास्त फरक असू नये. कारण बाहेर नागपूर आणि आत महाबळेश्वर असेल तर एवढा तीव्र तापमानातील फरक उलट त्रासदायकच ठरेल. तसेच गार हवेचा झोत,पंख्याचा वारा थेट अंगावर येणार नाही याची ही काळजी घ्यावी.कारण यामुळे शरीरातील रुक्षतेला आणि पर्यायाने संचित वात दोषाला बळ मिळतं आणि पुढे वातप्रकोप काळात म्हणजेच वर्षा ऋतूत एखादा वात विकार होण्याची शक्यता बळावते. या काळात उन्हात फिरणे अनावश्यक असल्यास टाळावे.मात्र ज्यांची नोकरी, व्यवसाय फिरतीचा आहे त्यांना हे जमत नसल्यास त्यांनी किमान संपूर्ण अंग झाकून घेणारा हलका,सुती पेहराव, स्कार्फ,टोपी, गॉगल,छत्री अशा साधनांचा वापर करावा,बरोबर सामान्य तापमानाचे पाणी,मीठ,साखर बरोबर ठेवावे.
                 ही झाली बाह्योपचारांची गोष्ट आता आभ्यंतर उपचार पाहू.आभ्यंतर उपचारामध्ये मात्र हे कृत्रिम शैत्य वापरण्यास अगदी मज्जाव आहे कारण बर्फाळलेले,फ्रिजमधले "थंडग्गार" पाणी मनाला जसे थंड करते तसंच शरीरालाही थंड-सुस्त करते. मग आधीच उन्हामुळे त्रासलेल्या,पचनशक्ती मंदावलेल्या शरीराला हा कृत्रिम गारवा त्रस्त करून सोडतो. कारण पूर्वी नमूद केल्याप्रमाणे या काळात पचन आणि जाठराग्नी मंद झालेले असतात. आजकालच्या भाषेत सांगायचे झाले तर आधीच क्षीण झालेल्या अग्निला ही शीतपेय पुरतं झोपवून टाकतात. त्यामुळे ‘कित्ती गरम होतंय,चला बाटल्या भरून फ्रिजमध्ये ठेवू….आत्ताच गार पाणी हवंय म्हणून थेट फ्रीजरमध्येच ठेवू...दुकानातून ही भली थोरली chilled cold-drink ची बाटलीच आणू…’ असले कोणतेही अघोरी उपाय या काळात चालत नाहीत.
                 त्याऐवजी सामान्य तापमानाचे किंवा नैसर्गिकरित्या थंड झालेलं माठाचं पाणी,ज्यात पित्ताशमनासाठी वाळा/गुलाब यासारख्या वनस्पती घातल्या आहेत असं प्यायला,सरबत बनवायला वापरता येईल.तसंच शहाळ्याचे पाणी,डाळिंब-कलिंगड-अननस यांचे घरी बनवलेले आणि  न गाळलेले ज्युस , आवळा-लिंबू-कोकम-अननस-आंबा यांची सरबतं घ्यावी. दही-ताक यासारखे उन्हाळ्यासाठी सर्वांच्या पसंतीचे पदार्थ मात्र जपूनच वापरावे.कारण हे उष्ण गुणांचे पदार्थ आहेत.यापैकी ताक स्वभावाने उष्ण असले तरी पाचक आहे त्यामुळे मर्यादित प्रमाणात,धने-जीरे पूड घालून घेता येईल,मात्र दही उष्ण आणि पचायला जड आहे त्यामुळे त्याचा वापर टाळावा.
                 यानंतर सगळ्यात महत्वाचा विषय तो म्हणजे ‘आंबा आणि आमरस’ वसंत-ग्रीष्मात आंब्याची मजा न चाखणे म्हणजे शिक्षाच म्हणा ना. त्यामुळे उन्हाळ्यात रसपुरीचा बेत होत नाही असे घर विरळाच. हा आंबा “हाणताना” जरा जपून, बरं का? म्हणजे असं की आंबा पचायला जड असतो त्यामुळे रसपुरी टाळावी.साध्या चपाती/पोळीशी आमरस खावा,तेसुद्धा पोळ्यांचे प्रमाण नेहमीपेक्षा निम्मे ठेवून. स्थूल,मधुमेही व्यक्तींनी आंबा खाताना नेहमीच्या जेवणाऐवजी व पोटात थोडी जागा आणि भूक शिल्लक ठेवून आंब्याचा आस्वाद घ्यावा.इतर अन्नपदार्थांत काय खावे,काय खाऊ नये याची यादी लेखाच्या शेवटी देत आहे.
                 इतर दिनचर्येचं म्हणाल तर रात्री जागरण टाळावे,ज्यांच्या परीक्षा आहेत त्या विद्यार्थ्यांनी पहाटे,सकाळच्या वेळेत अभ्यास करावा(पहाटेच्या वेळेत मेंदू शांत आणि ताजातवाना असतो.त्यामुळे अभयस चांगला होऊ शकतो.) ज्यांना सुट्ट्या आहेत त्यांनी "Binge watching" टाळावे. व्यायाम अगदी हलक्या स्वरूपाचा असावा.पोहोण्याचा व्यायाम केल्यास जिममध्ये जाऊ नये.वृद्ध,लहान मुले, सुकुमार(नाजूक व्यक्ती) आणि आजारी व्यक्तींनी तर व्यायाम करूच नये. या काळात रतिक्रीडा १५ दिवसांतून एकदाच करावी असा शास्त्र निर्देश आहे. दुपारची झोप याकाळात चालते. पण ती प्रमाणात (साधारण ३० ते ४५ मि. ) असावी. अशा प्रकारे उन्हाळा आणि त्याचे उपाय समजून घेऊन आचरण ठेवले तर उन्हाळा सुसह्य  होईलच पण उन्हाळ्याचे आजारही आटोक्यात येतील.

टीप -
१. तरीही आईस क्रीम खाणाऱ्यांसाठी खास सूचना. सध्या आईस क्रीम आणि फ्रोझन डेझर्ट मध्ये नक्की कशासाठी युद्ध सुरु आहे आणि त्याचे आपल्या शरीरावर काय परिणाम होणार आहेत हे खालील लिंक वर जाणून घ्या.

२. आंब्याचे गुणधर्म खालील लिंक वर वाचा.

३.पथ्य-अपथ्यकारक पदार्थ

  पदार्थ

                पथ्य

            अपथ्य

तृणधान्य

गहू,तांदूळ,ज्वारी

मका,बाजरी,नाचणी

डाळी

मूग,मसूर

चणा,तूर, उडीद मर्यादित खावे.

कडधान्य

मूग,मटकी,मसूर

वाल, वाटणे, हरभरे, कुळीथ,राजमा,छोले

फळभाज्या-शेंगा 

पडवळ,दोडकी,शिराळे,रताळे, सुरण, दुधी भोपळा, लाल भोपळा,वांगी, फरसबी ,शेवगा 

कारली, गवार, नवलकोल, कॉलीफ्लॉवर, कोबी , सिमला मिरची 

पालेभाज्या

पालक, शेवगा, तांदूळजा, लालमाठ, 

मेथी,शेपू




फळे

आवळे,द्राक्षे(बी असलेली),डाळिंब,आंबा,कैरी,केळी, संत्री,मोसंबी,काकडी,कोकम,लिंबू, ऊस,शहाळे,नारळ,खरबूज,कोहळा,कलिंगड,खजूर,मनुका




फणस,जांभूळ,कवठ,काजू

दूध व दुधाचे पदार्थ

दूध,तूप,लोणी

ताक(मर्यादित प्रमाणात ), दही, कढी

मांस वर्ग

शेळी,कोंबडा,बदक 

सुके मांस, मासे, पोर्क

मसाले

लवंग,वेलची,धणे,जीरे, दालचिनी, लाल तिखट.

हिंग,ओवा,लसूण, हिरवी मिरची, मोहरी 




Monday, 17 April 2017

देह देवाचे मंदिर - भाग २


             दिनचर्या या विषयावरील दोन भागांच्या दीर्घ लेखाचा हा दुसरा आणि अंतिम भाग आहे.मागील लेखात आपण उत्थान(उठण्याची वेळ),शौच,दंतधावन, अंजन, नस्य,गंडूष ,स्नेहाभ्यंग, व्यायाम, स्नान,ध्यान आदि दिनक्रियाविशेषांचा विचार केला. या लेखात दिवसभराचा आहार,शतपावली,निद्रा यांबद्दल जाणून घेऊ.

आहार - व्यवसाय-चरितार्थाचे काम करताना आवश्यक असा दिनाक्रमाचा भाग म्हणजे आहार. शरीर आणि मनाचे पोषण, स्वास्थ्य यासाठी आहार चांगला असणे आणि तो वेळेवर घेणे गरजेचे आहे. चांगला आहार हा प्रमाण आणि गुणात्मक पुरेसा हवा. तो कसा ते आपण पाहू. आयुर्वेदात म्हटले आहे की
‘याममध्ये न भोक्तव्यं , यामयुग्मं न लङघयेत् ।
याममध्ये रसोद्वेगो युग्मेऽतीते बलक्षयः॥
म्हणजेच काहीही खाल्ल्यानंतर किमान तीन तास काही खाऊ नये परंतु कमाल सहा तासांपेक्षा जास्त काळ उपाशी राहू नये. पण  यामध्येही अजून सूक्ष्म विचार सांगितला आहे,बरं का. आधी घेतलेले जेवण पचले असेल तरच पुन्हा आहार घ्यावा नाहीतर लंघन करावे. यावरून आपल्या लक्षात येईल की वजन वाढवणे किंवा कमी करणे यासाठी दर दोन तासांनी खात राहणे किंवा “Diet”च्या नावाखाली कडक उपवास करणे हे दोन्ही टोकाचे उपाय चुकीचे आहेत. वजन वाढणे किंवा कमी होणे हे शरीरातील इतर अवयवसंस्थांवरही परिणाम करते त्यामुळे वैद्यकीय सल्ल्यानेच वजन कमी करावे. आहार-पचन व त्याचा वजनाशी असलेला संबंध यावर सविस्तर बोलायचे झाले तर तो एक स्वतंत्र लेखाचा विषय होईल त्यामुळे आता आपण रोजच्या आहाराविषयी पाहू,
                     न्याहारी - सकाळच्या वेळेत प्रातर्विधी झाल्यानंतर हलका नाश्ता (चहा-कॉफी नाही) घ्यावा. यात दूध,आंबील, भुकेनुसार थोडा आणि ठराविक सुका मेवा घेता येईल. यामुळे रात्रीची भूक कमी होईल आणि व्यायाम करताना पोटाला जडपणा जाणवणार नाही. यानंतर ज्यांचे दुपारचे जेवण उशीरा होते अशांनी पोटभर न्याहारी करावी
  • न्याहारीची वेळ साधारण सकाळी ८.३० ते ९.३०ची असावी.
  • न्याहारीचे पदार्थ पोटभरीचे, मात्र तडस निर्माण करणारे नसावे.
  • दिवसाची सुरुवात आईस क्रीम, चॉकोलेट,मिठाई यासारखे अतिगोड किंवा समोसे, ढोकळा यासारखे अति तिखट,तेलकट किंवा तळलेले नसावे.
  • न्याहारी करताना घरी शिजवलेल्या पदार्थांचाच आग्रह मी धरते.
  • न्याहारीचे पदार्थ - न्याहारी म्हटले की बऱ्याच घरांमध्ये दिवसाची सुरुवात म्हणजे कॉर्नफ्लेक्स, मुसेली, ब्रेड-बटर, च्यवनप्राश(??? एक मोठ्ठा चमचा हो..) आणि त्याबरोबर उंच मग भरुन चहा-कॉफी किंवा मग उंच ग्लास भरुन दूध अथवा ज्यूस (It's healthy,u know?) अशी होत आहे. पण खरंच हा असा नाश्ता गरजेचा असतो का? तर नाही.
  • नाश्त्यासाठी सहज पचणारे,हलके,पोटभरीचे पदार्थ हवेत.
  • आपले पारंपरिक पदार्थ या सर्व निकषांत अगदी उत्तम बसतात.त्यामुळे या पदार्थांचा जरूर विचार करावा.
  • पोहे, सांजा,शिरा,लापशी,दलिया उपमा,शेवया उपमा हे सर्व पदार्थ out dated, बोअरिंग नसून आवश्यक आहेत हे समजून घेणे गरजेचे आहे.
          दुपारचे जेवण- दुपारचे जेवण दुपारी ११ ते ०१ या काळात असावे.म्हणजेच सकाळी लवकर घराबाहेर पडणाऱ्यांनी ११ वाजता जेवण घेतले पाहिजे.
  • हा काळ पित्त दोष प्राबल्याचा असतो त्यामुळे पचन सुधारते.
  • मग संध्याकाळी आवश्यकता वाटली तर पचायला हलके पदार्थ ,दूध, लाडू,चिक्की खाता येईल.

                    संध्याकाळचे जेवण -  आता संध्याकाळच्या जेवणासाठी मी जी वेळ सांगणार आहे ती ऐकून सगळ्यांच्याच भुवया उंचावतील,
  • कारण संध्याकाळच्या जेवणाची आदर्श वेळ आहे ०६.३० ते ०८.३० (म्हणजेच ०८.३०वाजण्याच्या आत जेवण झालेच पाहिजे). यामागचे कारण असे की सूर्यास्तानंतर आपल्या शरीराचे व्यापार हळूहळू मंदावू लागतात. त्यामुळे खाल्लेल्या अन्नाचे पचन नीट होत नाही त्यामुळे प्रत्येकाने आपापला दिनक्रम लक्षात घेऊन जेवणाची वेळ लवकर कशी करता येईल त्याकडे लक्ष द्यावे.
  • रात्रीचे जेवण दुपारच्या जेवणाच्या अर्ध्या प्रमाणात असावे.

                 शतपावली - जेवणानंतर काही लोक शतपावली घालतात तर बऱ्याच जणांचा Night Walk तर काही जणांचा Dessert walk/Chaat walk सुद्धा होतो. पण शतपावली घालण्यामागचे शास्त्र असे आहे की जमिनीवर मांडी घालून जेवताना पायाकडे कमी झालेला रक्तपुरवठा पूर्ववत व्हावा. हल्ली किती जण जमिनीवर मांडी घालून बसतात हो? टेबल-खुर्ची वर बसणाऱ्यांचे पाय लोंबकळत/उभे असतात त्यामुळं त्यांनी थोडा वेळ घरात चालणे किंवा पायाचे हलके व्यायाम करणे जास्त संयुक्तिक होईल.

                  निद्रा - हा मनुष्याच्या जीवनाचा एक महत्वाचा भाग (स्तंभच म्हणा ना, ज्यावर मानवी आयुष्याचे आरोग्य अवलंबून असते.)
  • रात्रीचे जेवण झाल्यानंतर साधारणतः २ ते ३ तासांनी झोपेची वेळ हवी. मात्र झोपेच्या आधी दूरचित्रवाणी(मराठीत टीव्ही),स्मार्टफोन,टॅबलेट या आणि यासारख्या इतर साधनांचा वापर टाळावा. मालिकांमधील नाट्य,पार्श्वसंगीत,तसेच स्क्रीनचा तेजस्वीपणा यामुळे मेंदू व चेतासंस्था उत्तेजित होतात.याउलट त्या क्षणी आपल्या शरीराला विश्रांतीची गरज असते.
  • झोप शरीराला अत्यावश्यक असते, व ती योग्य त्या प्रमाणात मिळाली तरच शरीर व्यापार उदा. उत्साह,संप्रेरकांचे,पाचक स्रावांचे स्रवण, भूक, मलमूत्रादि वेगांचे उत्सर्जन व्यवस्थित होते.
  • किती - रोज साधारण ६-८ तास झोप आवश्यक आहे,मात्र ८ तास झोपायचे म्हणून रात्री १-२ वाजता झोपून सकाळी ८-१० वाजता उठणे चुकीचेच आहे.
  • नाईलाजाने जागरण झाल्यास किंवा रात्रपाळी करणाऱ्यांनी रात्री जेवढी झोप कमी पडते त्याच्या निम्मीच झोप दिवसा घ्यावी.
  • दिवसा झोप फक्त ग्रीष्म ऋतूतच घ्यावी,तीसुद्धा उपरोक्त सांगितल्याप्रमाणे मर्यादित प्रमाणात. एरवी लहान मुले,आजारी माणसे यांनाच दिवसा झोप घेणे शास्त्र संमत आहे.
  • अवेळी झोपणं, रात्री जागरण करणे, दुपारी झोपणे, या मुळे अनेक आजार उत्पन्न होतात.
  • अकाल शयन - अवेळी झोपल्यामुळे मोह, ताप, डोकं दुखणे, शरीर जखड्ल्या सारखे वाटणे,अपचन,अम्लपित्त, वारंवार सर्दी, डोकेदुखी, दिवसभर आळस येणे, भूक मंदावणे यासारखे आजार होतात. आणि यातल्या बऱ्याच आजारांचे मूळ कारण चुकीची झोप आहे हे आपल्याला जाणवतही नाही.
  • त्यामुळे शांत व सलग झोप लागावी यासाठी शयनगृहातील दिवे मंद असावेत. रात्री खोलीत संपूर्ण काळोख असावा. बाहेरून येणारा उजेड टाळण्यासाठी जाड पडदे वापरावे.
  • शांत झोप लागावी यासाठी पावलांना गायीचे तूप लावून काशाच्या वाटीने मालिश करावे.पादाभ्यंग केल्याने दृष्टी सुधारते व झोप शांत लागते.
अशा प्रकारे पहाटे उठाण्यापासून रात्री झोपेपर्यंत दिनचर्या एका ठराविक क्रमाने सांगितली आहे. दोषांच्या प्राबल्यानुसार आपण आपला दिनक्रम कसा पार पाडावा हे त्यात सांगितले आहे. स्वस्थ व्यक्तीचे स्वास्थ्य दीर्घकाळ टिकून राहावे यासाठी केलेली ती योजना आहे. म्हणूनच या लेखांना ‘देह देवाचे मंदीर’ हे शीर्षक  हेतूतः दिले आहे. जीवात्मा हा परमात्म्याचा अंश मानला आहे.  मग त्याचे अधिष्ठान म्हणजे आपले शरीर हेसुद्धा मंदिराप्रमाणेच शुद्ध स्वच्छ हवे,त्याची निगा राखायला हवी.यासाठीच हे सर्व आपणा सर्वांपर्यंत पोहोचावे म्हणून केलेला हा लेखनाचा प्रयास.
अशा प्रकारे आयुर्वेद शास्त्रात सांगितलेले ‘दिनचर्या’आख्यान सफळ-संपूर्ण झाले.
देह देवाचे मंदिर लेखमालेचा प्रथम भाग खालील लिंकवर उपलब्ध आहे.

http://samanwayhealth.blogspot.in/2017/03/blog-post.html?m=1



टीप - हा लेख लिहिताना पुढील व्यक्तींचे सहाय्य लाभले त्याबाबत मी त्यांची ऋणी आहे.

१. वैद्य श्रेया चुरी.(BAMS, मित्तल आयुर्वेद महाविद्यालय)

(कृपया हे लेखन लेखिकेच्या नावासकट पोस्ट अथवा शेअर करावी.तुमच्या या नैतिक कृतीने लेखनासाठी काढलेला वेळ आणि वापरलेली बुद्धी सत्कारणी लागल्याचे समाधान मिळते.धन्यवाद. )

Monday, 10 April 2017

Depression... Let's talk.

Depression, Let's talk..




World health organization (WHO) has chosen to fight against Depression for 2017. The battle kicked off on 7th April 2017 and we celebrated World Health Day with a slogan ‘Depression, Let's talk.’ This campaign will continue through out the year and various aspects regarding depression will be considered. The goal is to reach out as much population as possible and create awareness about Depression.

What is Depression??
Depression is not a disease, it is a psychological illness. It is characterized by persistent feeling of sadness and lack of interest in normal activities. A Person suffering from depression may show following symptoms
  • Loss of energy
  • Change in appetite. (Either increase or Loss of appetite)
  • Change i sleep patterns (reduced or aggravated)
  • Mood swings and anxiety
  • Loss of concentration
  • Indecisiveness
  • Feeling of worthlessness,guilt or helplessness
  • Thoughts of self harm or even suicide.

Who can be suffering?

  • Depression affects people of all ages-class, from all walks of life and in all countries. Nowadays life has become very fast and competitive. This hustle and competitiveness are taking its toll on our life. As a result of this, number of people suffering from depression and/or anxiety has been increased by nearly 50% during past decades. Currently almost 10% of the population is affected by either or both of the conditions.
  • Financial worries, unemployment, death or illness of dear ones, own illness, professional failures, competitive and demanding nature of academics or profession can cause depression.
  • Also cases of depression during pregnancy or Post partum depression(ie after delivery up to two years) are increasing nowadays.
  • failure in relationships - break up or divorces
  • alcoholism or drug addiction
  • Also older adults (over 60s)

Effects of depression on life -
  • Depression causes mental anguish. persistent feeling of sadness affects person’s routine. He/she may not wish doing everyday chores or even enjoy their favorite things.
  • This affects their work
  • It sometimes also has negative impact on their relationships with friends and family members as well.
  • Depression during pregnancy or post partum (after delivery upto two years) can affect development of foetus or newborns.
  • Depression may also lead to development of type 2 diabetes or cardiovascular disorders also these diseases may also be a cause of depression.

How to treat Depression?
  • Depression can be treated easily and effectively. But for that we need to clear out all the misconceptions and overcome the stigma associated with depression.
  • This will help people from coming out of shadow and seek treatment.
  • Most often treatment involves counselling and medical treatment, depending on the severity.
  • Counselling is the first step. A person suffering from any of the symptoms should make it known. It could be anyone,your friend-family-relative. Anyone who can understand and is trustworthy. Talking to people you trust can be a first step towards recovery. Mild depression can be treated by such informal counselling.
  • If needed, one should seek professional help. A Good counselor can understand your problems and help you to deal with it.
  • Moderate to severe cases may also need combination therapy of counselling and antidepressants.
  • Always make advance planning for your stress
  • And prepare your mind and body for unexpected stressful situations. Meditation has proven helpful in such situations.
  • indulging into some hobbies and cultivating interests can help to take mind off difficult situations.
  • Also even if you are not suffering from depression but if you see someone from your family, friends or colleagues are suffering from, please make your that you offer a support. Cause sometimes it is just a helping hand that does the trick.
So Let's talk……..



Ref. World Health organization
Picture courtesy : World Health Organization.

Friday, 7 April 2017

चला बोलूया, नैराश्य टाळू या….. Depression, Let's Talk

चला बोलूया, नैराश्य टाळू या….. Depression, Let's Talk.



आज जागतिक आरोग्य दिन, त्यामुळे सर्वप्रथम आपणा सर्वांना आरोग्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ।।
                   यावर्षी आरोग्यदिनाचे ध्येय म्हणून जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच World Health Organization (WHO) यांनी नैराश्य म्हणजेच Depression या आजाराची निवड केली आहे. यासाठी बोधवाक्य निवडले आहे, “चला बोलूया, नैराश्य टाळूया… Depression, Let's talk.”  
हे फक्त आरोग्यदिनाचे ध्येय नाही तर आजच्या जागतिक आरोग्यदिनाचे औचित्य साधून संपूर्ण वर्षभरात या विषयावर जगभर मोहीम घेतली जाणार आहे. ‘नैराश्य’ हा मानसिक आजार असून जास्तीत जास्त लोकांपर्यंत त्याविषयी माहिती व उपाययोजना पोहोचावी हे याचे उद्दिष्ट आहे.जेणेकरुन नैराश्याने पीडित व्यक्तीला मदत मिळू शकेल तसेच त्यांच्या कुटुंबियांना या आजाराविषयी व नैराश्य बाधित व्यक्तीची कशी काळजी घ्यावी याविषयी माहिती मिळेल. आता आपणही नैराश्य या आजाराविषयी सर्वसाधारण माहिती घेऊ.

  • नैराश्य म्हणजे काय ?
 नैराश्य हा एक मानसिक आजार आहे. पण नैराश्याची लक्षणे सुरवातीला अगदी सौम्य असतात. 
  1. नैराश्य पीडित व्यक्तीला सतत उदास वाटणे,कोणत्याही गोष्टीत,अगदी आवडीच्या विषयांतही आनंद-रस न वाटणे अशी लक्षणे दिसतात.
  2. याची सुरुवात आपला दिनक्रम,रोजची कामे करण्यात उत्साह न वाटणे यापासून होते.
  3. मग हळूहळू गळून गेल्यासारखे वाटणे,
  4. भूक न लागणे,
  5. भावनाप्रधानता, मनाची चलबिचल,
  6. झोप अचानक कमी होणे किंवा अधिक झोप येणे,
  7. एकाग्रता कमी-कामात लक्ष न लागणे,
  8. स्वतःविषयी कमीपणाची भावना,हताश झाल्याचे विचार मनात येऊ लागतात. कधी स्वतःविषयी-स्वतःच्या क्षमतेविषयी शंका निर्माण होते.
  9. याचे प्रमाण अति झाल्यास नैराश्याने पीडित व्यक्ती स्वतःचे काही नुकसान किंवा टोकाची भूमिका घेऊन जीवाचे बरे-वाईट करून घेऊ शकते. त्यामुळे नैराश्य हा गंभीर स्वरूपाचा आजार ठरतो.

  • नैराश्य कोणाला येऊ शकते?
  1. सध्याच्या स्पर्धेच्या,धावपळीच्या जगात स्वतःची जागा निर्माण करणे आणि ती टिकवणे याचा ताण प्रचंड आहे यामुळे नैराश्याबरोबर इतर मानसिक ताणसुद्धा वाढत आहे.गेल्या काही दशकांत नैराश्य आणि ताण सहन करण्याऱ्या व्यक्तींच्या संख्येत ५०% ची वाढ झाली आहे आणि सध्या जगातील १०% लोकसंख्या यापैकी एका आजाराने पीडित आहे. नैराश्य सर्व वयोगटांत, आर्थिक स्तरांत,सर्व देशांमध्ये दिसून येते.
  2. आर्थिक दुर्बलता,बेरोजगारी, जीवलगांचा मृत्यू-आजार, व्यक्तीचे स्वतःचे आजारपण, व्यावसायिक असफलता, व्यवसाय किंवा अभ्यासातील आत्यंतिक चढाओढ,  मद्यसेवन किंवा ड्रग चे सेवन यापैकी एक वा अनेक कारणे ज्यांच्या आयुष्यात असतात अशा व्यक्तींमध्ये नैराश्य मोठ्या प्रमाणात दिसते.
  3. तसेच स्त्रियांमध्ये गरोदरपणात किंवा बाळाच्या जन्मानंतर नैराश्य बाधित होण्याचे प्रमाण अधिक आहे.
  4. ब्रेकअप किंवा घटस्फोटीत व्यक्ती.
  5. वृद्धावस्था (Empty Nest Syndrome) -  मुलेबाळे मोठी होऊन उच्चशिक्षण,लग्न,नोकरी -व्यवसायाच्या निमित्ताने घराबाहेर पडतात, स्वतः नोकरी-व्यवसायातून निवृत्त होणे अथवा स्वतःच्या प्रकृतीच्या तक्रारी यामुळे  ज्येष्ठ व्यक्तीसुद्धा नैराश्याला बळी  पडू शकतात. 

  • नैराश्याचे दुष्परिणाम -
  1. नैराश्यमूळे व्यक्ती सतत खिन्न मनस्थितीत असते. त्यामुळे त्याचा व्यक्तीच्या दैनंदिन कामकाजावर परिणाम होतो, अगदी रोजच्या जीवनातील छोट्या-छोट्या गोष्टी करायचाही उत्साह त्यांना वाटत नाही.
  2. याचा इतर नातेसंबंधांवरही परिणाम होतो, नातेवाईक-जिवलग-मित्र दुरावतात.
  3. व्यवसाय-नोकरीवर परिणाम होतो.
  4. गरोदर स्त्री किंवा प्रसूतेच्या बाळाची वाढ आणि पोषण यावर नैराश्याचे दुष्परिणाम होतात.
  5. सतत नैराश्याने पिडीत व्यक्तीच्या सर्वसाधारण आरोग्यावरही परिणाम होतो, मधुमेह तसेच हृदयविकार यांचा धोका नैराश्यामुळे वाढतो तसेच या आजारांमुळे नैराश्य येण्याचाही धोका वाढतो.

  • नैराश्यापासून सुटका कशी करावी ?
नैराश्य सहज आणि प्रभावीरित्या बरे करता येते. पण सर्वप्रथम या आजाराला असलेले गैरसमजाचे वलय दूर करणे गरजेचे आहे. नैराश्य म्हणजे वेड नव्हे किंवा ती काही भूतबाधासुद्धा नाही. ही एक मानसिक अवस्था किंवा मनाला आलेली मरगळ समजा हवी तर….
  1. ही मरगळ दूर करण्यासाठी सर्वप्रथम बोलायला हवे. कोणाशीही बोला,तुमचे मित्र-कुटुंबाचे सदस्य,नातेवाईक यापैकी तुमचे विश्वासू असे कोणीही असू शकेल जे तुम्हाला यातून बाहेर पडण्यासाठी मदत करतील. सौम्य स्वरूपाचे नैराश्य बोलण्याने कमी होऊ शकते.
  2. गरज पडल्यास समुपदेशकाची मदत घ्यावी. समुपदेशक किंवा मनोविकार तज्ञ म्हणजे वेड्यांचा डॉक्टर...लोक काय म्हणतील हा विचार टाळला पाहीजे.
  3. मध्यम किंवा तीव्र स्वरूपाच्या केसेस मध्ये समुपदेशनासोबत औषधी उपायांचीही गरज भासते.अशा वेळी गोळ्यांची काय गरज,औषधांची सवय लागली तर?? असे विचार न करता वेळेवर औषधे घ्यावी ज्यामुळे त्रास आटोक्यात येऊन औषधेसुद्धा बंद होतील.
  4. स्वतःच्या ताण तणावांचे नियोजन करावे
  5. ताणाचा योग्य व शांतपणे सामना करण्याची सवय लावावी.
  6. स्वतःला आवडणारा एखादा छंद जोपासावा.
  7. तसेच आपल्याला काही त्रास नसेल पण आपल्या जवळच्या व्यक्तीला यापैकी काही त्रास जाणवत असेल तर तो वेळीच ओळखा, त्यांना बोलते करा, त्यांना मदतीचा हात द्या व तज्ञांची मदत घेण्यासाठी प्रवृत्त करा. 

आयुर्वेदशास्त्र आणि मन (थोडक्यात पण महत्त्वाचे )

                             आयुर्वेदशास्त्रामध्ये 'मनाचे' वेगळे अस्तित्त्व मान्य केले आहे. मन,बुद्धी ,अहंकार,आणि चित्त असे भाग सांगितले आहेत. 
  1. मन दिसत नसले तरी मनाचे पोषण हे आपल्या वर्तन आणि आहारावर अवलंबून असते. 
  2. सौम्य संगीत , मंत्रोच्चारण , ध्यानधारणा यांचा नियमित अभ्यास करणे मनःशांतीसाठी लाभदायक आहे. नियमित व्यायाम, योगासनांचा सरावसुद्धा चित्तवृत्ती उल्हसित करण्यासाठी मदत होते. मात्र यासाठी थोडी स्वयंशिस्त महत्वाची असते.  
  3. बैठी जीवनशैली, सिगारेट/तंबाखू/मद्य/अंमली -नशा  उत्त्पन्न करणारे व्यसनी पदार्थ , जंक फूडचे सेवन टाळणे महत्त्वाचे 

चला तर मग…
चला बोलूया,नैराश्य टाळूया.. आनंदी जीवन जगूया ।।



संदर्भ व छायाचित्र - जागतिक आरोग्य संघटना (WHO) संकेतस्थळ.