Pages

Friday, 8 January 2016

गाजराचे सूप

                               गाजराचे सूप

थंडीचे दिवस म्हणजे कफ दोष संचयाचा काळ.याच काळात थंडीमुळे वाताचे त्रासही दिसून येतात.पण याच दिवसांत शारीर बल अधिक असते.म्हणून अधिक पोषणमूल्ये असलेले पदार्थ आहारात असावेत व त्यांना व्यायामाची जोड द्यावी म्हणजे आरोग्यप्राप्ति (Fitness) होईल. सध्याच्या थंडीच्या दिवसांत शरीर आणि मनाला तरतरी यावी म्हणून हे सूप करून पहा..



साहित्य -

गाजरं - 2 मोठी
कांदा - 1 मध्यम
टोमॅटो - 1 मध्यम
पाणी - 3-4 बाउल
कोथिंबीरीचे देठ 8-10
आले - 1 टेबलस्पून बारीक कापलेले
काळी मिरी - 10-12
तमालपत्र - 2
मीठ चवीनुसार

कृती -

1. एका भांड्यात पाणी घेऊन त्यात गाजराचे तुकडे , कोथिंबीरीचे देठ , बारीक कापलेले आले एक तमालपत्र आणि 7-8 काळी मिरीचे दाणे घालून शिजत ठेवावे.
2. दुसऱ्या भांड्यात तूप गरम करुन त्यात एक तमालपत्र , 2 मिरीचे दाणे घालून एक मध्यम कापलेला कांद गुलाबी होईपर्यंत परतून घ्यावा.
3. पहिल्या भांड्यातील गाजर शिजत आले की त्यात एक मध्यम टोमॅटो कापून घालावा व शिजेपर्यंत उकळू द्यावे.
4. शिजलेले मिश्रण गाळून घ्यावे व भाज्या आणि परतलेला कांदा मिक्सरच्या भांड्यात काढून थंड होऊ द्यावा. (त्यातील तमालपत्र काढून घ्यावे तसेच गाळलेले पाणी फेकू नये.)
अवश्यकतेनुसार कोमट पाणी घालून मिश्रण बारीक वाटून घ्यावे.
5. या पेस्टमध्ये आधी गाळून घेतलेले पाणी घालून मिश्रण पुन्हा गॅसवर ठेवावे आणि त्यात चविनुसार मीठ आवश्यकता वाटल्यास किंचित साखर घालावी.
6.आवडीप्रमाणे सूपचा दाटपणा कमी-जास्त करुन एक उकळी घ्यावी.

टीप -

- टोमॅटोचा वापर आपल्या चविप्रमाणे करावा.टोमॅटो न घालता फक्त गाजराचे सूप केल्यास तेसुद्धा छान लागते.
- सूप creamy व्हावे म्हणून ते गाळून घेतले जाते तसेच त्यात क्रीम किंवा दही घातले जाते.
पण पेस्ट पुन्हा गाळल्यामुळे त्यातील आरोग्यासाठी चांगले असणारे तंतुमय पदार्थ ( Fibers) काढून टाकले जातात.
तसेच दही किंवा क्रीम वापरणे हे विरुद्ध संयोग आहे त्यामुळे ते टाळावे.

गुणधर्म

गाजर - उष्ण गुणात्मक , रक्तविशुद्ध करणारे,कफहर तसेच vitamin E चा स्रोत आहे.

2 comments:

  1. Thank you so much Dr. Snigdha for the recepie. It's really wondeful taste and easy to make ☺

    ReplyDelete
    Replies
    1. Hi Piya,sorry for the delayed reply. Thank you. I'm glad that you cooked this recipe and found it Easy and tasty. My Purpose of such write up is to encourage people to cook their own healthy bowl of food.
      Your comment is quite encouraging for me too

      Delete