समारोप
गेले दहा दिवस चालू असलेली लेखमाला आज संपुष्टात येत आहे. नवरात्रीच्या निमित्ताने मासिक पाळी सारख्या निषिद्ध मानल्या जाणाऱ्या विषयाला हात घातला याचे मुख्य कारण म्हणजे मासिक पाळीचे शक्तीस्वरूप तसेच तिचे आरोग्यविषयक महत्व.
आज मासिक पाळी आणि त्या अनुषंगाने स्त्रियांना आज जे दुय्यम स्थान स्थान आहे ते दूर करुन मासिक पाळीचे शरीरातील महत्व ,शास्त्रीय स्वरूप त्यामुळे स्त्रीला मिळणारी नवनिर्माणाची, सर्जनाची शक्ती याची जाणीव सर्वांनाच व्हावी आणि यापुढे मासिक पाळी हा अमंगल,लाजिरवाणा विषय ठरू नये यासाठीचा हा प्रयत्न छोटासा प्रयत्न होता.
यासाठीचे पहिले पाऊल म्हणजे जाणीवपूर्वक स्त्री-पुरुष असा मिश्र वाचकवर्ग असेल अशा मंचाची निवड केली.जेणेकरून पुरुषांनाही योग्य शास्त्रीय माहिती मिळेल व प्रत्येक पुरुषालासुद्धा स्त्रियांना होणारा त्रास समजू शकेल आणि स्त्रीच्या कोणत्याही रूपाबद्दल मग ती आई, बहीण, बायको,वहिनी,मुलगी,मैत्रीण ,कोणीही का असेना तिच्याबद्दल त्याच्या मनात आदरभाव असेल.यामुळे स्रीयांविषयीचा दृष्टिकोन सुधारला तर ते मोठे यश म्हणता येईल.
गेले दहा दिवस सर्वांचा उत्तम प्रतिसाद मिळाला.हजारापेक्षा जास्त लोकांनी हे लेख वाचले आणि प्रतिक्रियाही कळवल्या याबद्दल सर्वांचे आभार.यापुढेही विविध विषयांवर लेख प्रकाशित होत रहातील, त्यांनाही आपला असाच प्रतिसाद मिळावा.
धन्यवाद.
No comments:
Post a Comment