फळांचा राजा आंबा
वसंत ऋतूमध्ये कोकिळेच्या आवाजाबरोबर सर्वांना साद घालत येतो तो आंबा. या दिवसात आंब्याला आलेला मोहोर, हळूहळू वाढणाऱ्या कैऱ्या सर्वांना खुणावत असतात.ज्याच्या घराजवळ-बागेत झाड असेल तिथे येणाऱ्या जाणाऱ्या सगळ्यांचे लक्ष या कैऱ्यांवर असते.बाजारातसुद्धा आंब्यांची हंगामी दुकाने दिसू लागतात. हापूस,पायरी,रायवळ,लंगडा,दशहरा,बेंगनापल्ली, केशर,तोतापुरी,राजापुरी या आणि अशा कितीतरी प्रकारचे आंबे संपूर्ण भारतात वेगवेगळ्या ठीकाणी आवडीने खाल्ले जातात. या दिवसात आंबा न खाण्याची इच्छा होणारी व्यक्ती क्वचितच असेल.
आयुर्वेदातही आंब्याचे गुण सविस्तर वर्णन केले आहेत.छोटी कैरी (बाल आम्र),वाढ पूर्ण झालेला परंतु कच्चा आंबा (तरुण आम्र ) आणि पिकलेला आंबा (पक्व आम्र) यांचे गुण वेगवेगळे असतात.
तरुण आम्र हा अतिशय आंबट, रुक्ष, उष्ण आणि तिन्ही दोष वाढवणारा आहे. कैरीमध्ये क्षारांचे प्रमाण अधिक असते. उन्हाळ्यात घामावाटे क्षार निघून गेल्याने जाणवणाऱ्या थकव्यासाठी पन्हे हे उत्तम तर्पण आहे.मात्र कैरी अतिप्रमाणात खाल्ली तर पोटाचे त्रास होतील. त्यामुळे पन्हे,आंबेडाळ,भेळ असा आडवा हात मारताना मनाला आवरलेलेच बरे. गावाकडे घामोळे आल्यावर कैरीचा गर लावून अंघोळ करायची पद्धत आहे. कैरीचा किस रुमाल बांधव डोळयांवर ठेवल्यास डोळ्यावर आलेला ताण कमी होतो. कैरीची कोय तुरट चवीची असते. बाठीचे चूर्ण मंजनामध्येसुद्धा वापरतात. कषाय रसामुळे (तुरट चवीमुळे) हिरड्यांतून रक्त येणे,त्यांत पू होणे अश्या त्रासांमध्ये कोयींच्या चूर्णाने मंजन केले जाते. आंब्याची पाने 'पंचपल्लवांमध्ये**' गणली जातात. त्यांचा जंतुनाशक तसेच म्हणून सुगंधासाठी वापर होतो.
पिकलेला आंबा
हा मधूर रस-विपाकी, थोडासा तुरट ,स्निग्ध आणि शीतवीर्य आहे. पिकलेला आंबा नियमितपणे खाल्ल्यास तो बलदायी, हृदय (मनाला आनंद देणारा आणि हृदयाचे संरक्षण करणारा) , वर्णकर आहे. आंब्यामुळे जठराग्नि (पचनशक्तीचे बळ ) वाढते पण तरीही हा पित्ताकार नाही.तसेच पिकलेला आंबा हा गुरू - पचायला जड आहे, त्यामुळे अति प्रमाणात खाल्ल्यास पोट जड होते. या कारणामुळे तसेच अधिक मात्रेत शर्करा असल्यामुळे मधुमेही व्यक्तींनी वैद्यकीय सल्ल्याने आंबा प्रमाणात खावा.
आमरस हा रुची वाढवणारा , स्निग्ध पण सारक असतो.
● पिकलेला आंबा आणि सप्तधातू
आंबा हा रस-रक्तादि सर्व धातूंना बल देतो. शुक्रवृद्धी करतो. वृष्य (aphrodisiac) आहे. आंबा पोषक आहे, सप्तधातूंच्या पोषणासाठी पिकलेल्या आंब्याचे नियमित सेवन उत्तम असते.आधुनिक मतानुसार आंबा जितका पिकलेला तितके त्यात कॅरोटीन चे प्रमाण वाढते.कॅरोटीन हा Vitamin A चे प्रारूप (Precursor) आहे. म्हणून आबालवृद्धांनी या मोसमात आंबा नियमित व प्रमाणात खावा.
वसंत ऋतूमध्ये कोकिळेच्या आवाजाबरोबर सर्वांना साद घालत येतो तो आंबा. या दिवसात आंब्याला आलेला मोहोर, हळूहळू वाढणाऱ्या कैऱ्या सर्वांना खुणावत असतात.ज्याच्या घराजवळ-बागेत झाड असेल तिथे येणाऱ्या जाणाऱ्या सगळ्यांचे लक्ष या कैऱ्यांवर असते.बाजारातसुद्धा आंब्यांची हंगामी दुकाने दिसू लागतात. हापूस,पायरी,रायवळ,लंगडा,दशहरा,बेंगनापल्ली, केशर,तोतापुरी,राजापुरी या आणि अशा कितीतरी प्रकारचे आंबे संपूर्ण भारतात वेगवेगळ्या ठीकाणी आवडीने खाल्ले जातात. या दिवसात आंबा न खाण्याची इच्छा होणारी व्यक्ती क्वचितच असेल.
आयुर्वेदातही आंब्याचे गुण सविस्तर वर्णन केले आहेत.छोटी कैरी (बाल आम्र),वाढ पूर्ण झालेला परंतु कच्चा आंबा (तरुण आम्र ) आणि पिकलेला आंबा (पक्व आम्र) यांचे गुण वेगवेगळे असतात.
आम्र बालं कषायाम्लं रुच्यं मारुतपित्तकृत् ।
तरुणं तु तदत्यम्लं रुक्षं दोषत्रयास्रकृत् ।।
कोवळी कैरी ही चवीला तुरट-आंबट , अम्ल विपाकी आणि उष्ण गुणांची आहे. तशीच ती वात-पित्तकर आहे.तरुण आम्र हा अतिशय आंबट, रुक्ष, उष्ण आणि तिन्ही दोष वाढवणारा आहे. कैरीमध्ये क्षारांचे प्रमाण अधिक असते. उन्हाळ्यात घामावाटे क्षार निघून गेल्याने जाणवणाऱ्या थकव्यासाठी पन्हे हे उत्तम तर्पण आहे.मात्र कैरी अतिप्रमाणात खाल्ली तर पोटाचे त्रास होतील. त्यामुळे पन्हे,आंबेडाळ,भेळ असा आडवा हात मारताना मनाला आवरलेलेच बरे. गावाकडे घामोळे आल्यावर कैरीचा गर लावून अंघोळ करायची पद्धत आहे. कैरीचा किस रुमाल बांधव डोळयांवर ठेवल्यास डोळ्यावर आलेला ताण कमी होतो. कैरीची कोय तुरट चवीची असते. बाठीचे चूर्ण मंजनामध्येसुद्धा वापरतात. कषाय रसामुळे (तुरट चवीमुळे) हिरड्यांतून रक्त येणे,त्यांत पू होणे अश्या त्रासांमध्ये कोयींच्या चूर्णाने मंजन केले जाते. आंब्याची पाने 'पंचपल्लवांमध्ये**' गणली जातात. त्यांचा जंतुनाशक तसेच म्हणून सुगंधासाठी वापर होतो.
पिकलेला आंबा
पक्वं तु मधुरं वृष्यं स्निग्धं हृद्यं बलप्रदम् ।
गुरु वातहरं रुच्यं वर्ण्यं शीतमपित्तलम् ।।
रसस्तस्य सरः स्निग्धो रोचनो बलवर्णकृत् ।
हा मधूर रस-विपाकी, थोडासा तुरट ,स्निग्ध आणि शीतवीर्य आहे. पिकलेला आंबा नियमितपणे खाल्ल्यास तो बलदायी, हृदय (मनाला आनंद देणारा आणि हृदयाचे संरक्षण करणारा) , वर्णकर आहे. आंब्यामुळे जठराग्नि (पचनशक्तीचे बळ ) वाढते पण तरीही हा पित्ताकार नाही.तसेच पिकलेला आंबा हा गुरू - पचायला जड आहे, त्यामुळे अति प्रमाणात खाल्ल्यास पोट जड होते. या कारणामुळे तसेच अधिक मात्रेत शर्करा असल्यामुळे मधुमेही व्यक्तींनी वैद्यकीय सल्ल्याने आंबा प्रमाणात खावा.
आमरस हा रुची वाढवणारा , स्निग्ध पण सारक असतो.
● पिकलेला आंबा आणि सप्तधातू
आंबा हा रस-रक्तादि सर्व धातूंना बल देतो. शुक्रवृद्धी करतो. वृष्य (aphrodisiac) आहे. आंबा पोषक आहे, सप्तधातूंच्या पोषणासाठी पिकलेल्या आंब्याचे नियमित सेवन उत्तम असते.आधुनिक मतानुसार आंबा जितका पिकलेला तितके त्यात कॅरोटीन चे प्रमाण वाढते.कॅरोटीन हा Vitamin A चे प्रारूप (Precursor) आहे. म्हणून आबालवृद्धांनी या मोसमात आंबा नियमित व प्रमाणात खावा.
- कैरीचे पन्हे
याला आयुर्वेदात 'पानक' असे म्हणतात.त्याची कृती पुढीलप्रमाणे,कैरीचा गर १ वाटीखडीसाखर १ ते १.५ वाटी (बारीक करून घ्यावी)पाणीभीमसेनी कापूरमिरेपूडवेलचीजिरेपूड१. कैऱ्या सोलून पाण्यात उकळून शिजवून घ्याव्या.(कुकरला उकडून सुद्धा घेता येतील.)२. कोयी बाजूला काढून गर बारीक करावा.३. हा गर मोजून त्यात 1 वाटी गराला साधारण १ ते १.५ वाटी खडीसाखर मिसळावी.( साखरेचे प्रमाण कैरीचा आंबटपणावर अवलंबून)४. पाणी मिसळून भीमसेनी कापूर, जिरे-मिरेपूड, वेलची आणि चवीनुसार मीठ घालावे.हे पानक उष्ण आणि पित्तकारक असते मात्र त्यातील खडीसाखर,भीमसेनी कापूर, जीरे, वेलची यामुळे त्याचा उष्ण गुण कमी होतो तसेच ते शीघ्र इंद्रिय तर्पण म्हणजेच तृप्ती देणारे,तहान कमी करणारे होते.व किंचित मिरेपूड घातल्याने बाधत नाही. भीमसेनी कापूर खात्रीचा न मिळाल्यास नाही टाकला तरी चालेल पण कृत्रिम पद्धतीने बनवलेला रसायनयुक्त कपूर वापरू नये.त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात पन्हे पिण्याचा आनंद जर5 घ्यावा फक्त पित्त प्रकृतीच्या व्यक्तींनी जरा जपून घ्यावा.
- पिकलेल्या आंब्याचा मुरंबा
पिकलेल्या आंब्याच्या सोलून मोठ्या फोडीसाखर - दीडपटपाणी - साधारण साखरेच्या निम्मेलवंगाकृती -१. साखर व पाणी एकत्र करून दोनतारी पाक करावा.२. आंब्याच्या फोडी व लवंगा घालाव्यात.३.आंब्याच्या रसामुळे पाक पुन्हा पातळ होईल. मध्यम आचेवर मुरांबा शिजवावा आणि पूर्वीप्रमाणे दोनतारी पाक होईपर्यंत शिजवावे.
आंबेडाळ - ही पाककृती माझ्या लहानपणापासून खूप आवडती आहे. आमच्या बालमोहन विद्यामंदिर शाळेत चैत्र महिना सुरु झाला कि सगळ्या विद्यार्थ्यांना आंबेडाळ आणि कलिंगड दिले जाई. मुलींना चैत्रगौरीचे हळदी-कुंकू दिले जाई. त्यामुळे कलिंगड आणि कैऱ्या दिसल्या कि माझं मन पुन्हा एकदा शाळेत जातं.तर , आंबेडाळ बनवण्यासाठी साहित्य -चण्याची डाळ - १ कप ( ६-८ तास किंवा रात्रभर भिजवून ठेवलेली )कैरीचा किस - १ कपसाखर - १चमचामीठ - चवीनुसारफोडणीसाठी साहित्य - तेल, मोहरी , मिरची, कढी पत्ता,किंचित हळद आणि हिंगकृति -१. भिजवलेली चणा डाळ मिक्सरमध्ये भरड वाटून घ्यावी.२. त्यामध्ये किसलेली कैरी, चवीनुसार साखर आणि मीठ घालून नीट मिसळून घ्यावे.३. वरून फोडणी द्यावी. अशी साधी सोपी सहज आंबेडाळ सगळ्यांना नेहमीच आवडते.
असे हे आंबा आख्यान सुफळ संपूर्ण झाले.
टीप - प्रस्तुत लेख वैद्य स्निग्धा चुरी-वर्तक यांनी लिहिला असून या लेखाचे copyright हक्क लेखिकेधीन आहेत. लेख शेअर करायच्या असल्यास त्यात बदल न करता , लेखिकेच्या नावासहित शेअर करावा.