सध्या रेडिओ , दूरचित्रवाणी , वृत्तपत्रे , सर्व माध्यमांतून सर्वाधिक भडिमार कशाचा होत असेल तर वेदनाशामक औषधे ( Painkillers ) विकणाऱ्या जाहिरातींचा.……
"अगं आई गं…. जोडो में दर्द?बदनदर्द?? डोके भणभणत… कंबर लचकली …. कान-नाक-गले का दर्द???? आणि अजून कुठे कुठे वेदना??? मग आमचे औषध वापरा, हमखास गुण येईल. बेनामी चेहऱ्यांपासून लोकप्रिय कलाकार, क्रीडापटू सगळेजण ही औषधे विकण्याच्या शर्यतीत हिरीरीने भाग घेतात आणि या सर्व माध्यमबाजीला बळी पडून आपणही या गोष्टी आणत असतो.
जरा कुठे दुखले खुपले कि टाक हि गोळी तोंडात , मार तो स्प्रे ,चोळा तिथला बाम. पण कोणी कधी हा विचार केला आहे का कि या गोळीची घटक औषधे कोणती? हि औषधे कशी काम करतात? या औषधाच्या अतिसेवनाने किडनी,यकृतावर किती घातक दुष्परिणाम होऊ शकतात ?
या सगळ्याचा विचार करायचा झाला तर पहिल्यांदा वेदना म्हणजे काय?कशा होतात या वेदना? याचा विचार करावा लागेल. आपल्यापैकी प्रत्येकानेच आयुष्यात कधी ना कधी वेदना अनुभवलेल्या असतात मग त्या साध्या असोत किंवा अवघड जागेचे दुखणे किंवा मग "दिल का दर्द … "
International association for the study of Pain ही संस्था Pain ची व्याख्या करताना म्हणते की ,
Pain is defined as an unpleasant sensory or emotional experience associated with actual , potential tissue damage or described in terms of such damage.
तर आयुर्वेद शास्त्रात ,
वात -पित्त-कफादि दोषांनुसार वेदनेचे पुढील प्रकारसुद्धा वर्णन केले आहेत,
वातज वेदना -
- तोद - सुई टोचल्याप्रमाणे होणाऱ्या वेदना / Priking Pain
- भेदन - फाटल्या /तुटल्या प्रमाणे होणारी वेदना / Stabbing Pain
- ताडन - काठीने मारल्याप्रमाणे होणारी वेदना
- छेदन - कापल्याप्रमाणे दुखणे
- आयामन - खेचल्याप्रमाणे दुखणे / Stretching Pain
- मंथन - Girding Pain
- विक्षेपण -
- चुमचुमायन -
- निर्दहन -
- अवभंजन -
- स्फोटन -
- विदरण -
- उत्पाटन -
- कंपन
- विश्लेषण
- विकिरण
- स्तंभन
- पुरण
- आकुंचन
- अंकुशिका
- ओष -
- चोष
- परिदाह -
- धुमायन -
तर
- कंडू -
- गुरुत्व -
- सुप्तता -
- उपदेह -
- स्तब्धता -
- शैत्य -
या वेदना कफामुळे होतात.
वेदना शमनार्थ केले जाणारे उपाय :
- स्नेहन - सर्वांगाला औषधी तेलाने मसाज करून तेल अंगात जिरवणे म्हणजे स्नेहन होय. या मध्ये आजारानुसार तेल व स्नेहानाची पद्धत कोणती वापरायची ते ठरते.
- स्वेदन - म्हणजे शरीराला शेक देणे, यासाठी औषधी काढे , किंवा कोरडा शेक वापरला जातो. बऱ्याचदा स्नेहनानंतर स्वेदन क्रिया केली जाते. किंवा पिंडस्वेद पद्धती सारखे स्नेह-स्वेद एकत्र केले जाणारे उपचार ही असतात,जे संपूर्ण अंगदुखी , पेशी-स्नायू वेदना यामध्ये अतिशय लाभदायी ठरतात.
- लेप - वेगवेगळ्या प्रकारचे धान्यलेप ,औषधी वनस्पतींचे लेप, चिकट लेप, यासारखे प्रकार औषधी वनस्पतीचे विशिष्ट लेप त्या दुखऱ्या जागी लावण्यासाठी वापरतात.
- बस्ति - बस्तिचिकित्सा शरीराच्या अभ्यंतर भागातील दुखण्याच्या उपचारासाठी वापरली जाते.
- नस्य - म्हणजे दोन्ही नाकपुड्यामध्ये औषधांचे थेंब टाकणे. उर्ध्वजत्रुगत (मानेच्या वरच्या वेदनादायी विकारांत ) नस्योपचार वापरले जातात. जसे की डोकेदुखी , नाकाचे हाड वाढणे,मान दुखणे.
- रक्तमोक्षण - शरीरातील दूषित रक्त व त्याद्वारे होणाऱ्या वेदनांच्या उपचारासाठी रक्तमोक्षण
- अग्निकर्म - एखाद्या प्रदेशी तीव्र तसेच असह्य वेदना होत असल्यास (Local acute pain ) ते बरे करण्यासाठी अग्निकर्म हा उत्तम वेदनाशामक उपचार आहे. वेगवेगळे सांध्यांचे दुखणे,डोकेदुखी,मानेचे दुखणे,टाचदुखी ,पायाची भोवरी, अशा तीव्र आजारांमध्ये अग्निकर्म केले जाते.
अर्थात हे सर्व उपचार करताना त्या भागाची शारीर रचना आणि सखोल आयुर्वेदीय मर्मज्ञान या विषयांचा सखोल अभ्यास असणे आवश्यक आहे. त्यामुळे हे उपचार तज्ञ वैद्यांच्या सल्ल्याने व त्यांच्या मार्गदर्शनाखालीच करून घ्यावेत.
तसेच हे उपाय वेदनेच्या मूळावर घाव घालणारे असल्यामुळे दीर्घकाळासाठी आराम देणारे आणि गोळ्यांप्रमाणे यकृत तसेच किडनी वर साईड इफेक्ट्स करणारे नसतात. त्यामुळे अशा बहुगुणी आयुर्वेदिक उपचारांचा वापर करायला काय हरकत आहे?
तसेच हे उपाय वेदनेच्या मूळावर घाव घालणारे असल्यामुळे दीर्घकाळासाठी आराम देणारे आणि गोळ्यांप्रमाणे यकृत तसेच किडनी वर साईड इफेक्ट्स करणारे नसतात. त्यामुळे अशा बहुगुणी आयुर्वेदिक उपचारांचा वापर करायला काय हरकत आहे?
No comments:
Post a Comment