मकरसंक्रांत आणि तीळगुळाचे लाडू
आज मकरसंक्रांत. आज घरोघरी तिळगूळ -हलवा बनवला जात असेल.पतंगबाजीची स्पर्धा असेल.मकरसंक्रांत म्हटली की तिळगूळ आलाच, काही घरांत गुळपोळी, गुळपापडी, तिळाच्या वड्यासुद्धा केल्या जातात.
तीळ (Sesamum indicum) - हे मधुर रस , तिक्त (कडू) विपाकी कफ-वात दोषाचे शमन करणारे आणि किंचित पित्तकर ,उष्ण गुणाचे आहेत. अग्निजनन (पचन वाढवणारे), मेधाजनन (बुद्धिवर्धक), त्वच्य (त्वचेसाठी गुणकारी), बलदायक, केशजनन करणारे आहेत.
गूळ (Jaggery) - गूळ मधुर रस-विपाकी, वात-पित्तनाशक आहे. उसाच्या काकवीपासून बनवलेला आणि रसायनांनी शुद्ध न केलेला (Organic) गूळ हा सक्षार (अल्कली गुणाचा), अल्प उष्ण , स्निग्ध, मुत्राशय आणि मूत्र शुद्ध करणारा,रक्तशोधक,मेदकर,बलदायी,वृष्य (शुक्रधातु वाढवणारा) , कृमिकर असतो.
शेंगदाणे (Ground nuts) - हे वातशामक परंतु अत्यंत पित्तवर्धक आहेत. त्यामुळे कमी प्रमाणात खावे. पित्तप्रकृतिच्या व्यक्तीने टाळलेलेच बरे.
सुके खोबरे (Dried Coconut) - हे मधुर रस-विपाकी,वात-पित्तशामक, थंड , गुरु (पचायला जड), वृष्य(शुक्रधातु वर्धक), पोषक आणि केश्य (केसांसाठी उत्तम) आहेत.
वरील सर्व घटक पहिल्यावर लक्षात येते की या पदार्थांमुळे वात-पित्त-कफ या त्रिदोषांचा समतोल राखला जातो आणि शरीराला बळ मिळते.म्हणून तिळगुळाची योजना ही या गुणधर्माचा अधिकाधिक फायदा मिळावा म्हणून केली गेली आहे. त्यामुळे आपणही आपल्या आहारात तीळ , गूळ , खोबरे नियमित वापरावे.तिळाच्या वडया,गूळपापडी असे पोषक पदार्थ थंडीच्या दिवसांत खावे.
"मकरसंक्रांतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.. तिळगुळ खा आणि गोड-गोड बोला."
To view this article in english click here
https://samanwayayurved.blogspot.com/2016/01/significance-of-tilgud-for.html?m=0

मकरसंक्रांतिला सूर्य मकर राशीत प्रवेश करतो आणि उत्तरायण सुरु होते.म्हणजेच सूर्य आता उत्तर गोलार्धात संक्रमण करणार, अधिक प्रकाश-उष्णता घेऊन येणार याचे हे चिन्ह.येणाऱ्या वसंत ऋतूची चाहूल घेऊन येतो हा सण.असे असले तरी अजूनही थंडी असते.हवेत आर्द्रता कमी असल्याने कोरडेपणाही असतो.शरीरावरसुद्धा या कोरडया हवेचा परिणाम होतच असतो.म्हणूनच संक्रांतीच्या निमित्ताने केल्या जाणाऱ्या तिलगुळाच्या लाडवांचे आरोग्यदायी महत्व जाणून घेऊ.
तीळ (Sesamum indicum) - हे मधुर रस , तिक्त (कडू) विपाकी कफ-वात दोषाचे शमन करणारे आणि किंचित पित्तकर ,उष्ण गुणाचे आहेत. अग्निजनन (पचन वाढवणारे), मेधाजनन (बुद्धिवर्धक), त्वच्य (त्वचेसाठी गुणकारी), बलदायक, केशजनन करणारे आहेत.
गूळ (Jaggery) - गूळ मधुर रस-विपाकी, वात-पित्तनाशक आहे. उसाच्या काकवीपासून बनवलेला आणि रसायनांनी शुद्ध न केलेला (Organic) गूळ हा सक्षार (अल्कली गुणाचा), अल्प उष्ण , स्निग्ध, मुत्राशय आणि मूत्र शुद्ध करणारा,रक्तशोधक,मेदकर,बलदायी,वृष्य (शुक्रधातु वाढवणारा) , कृमिकर असतो.
शेंगदाणे (Ground nuts) - हे वातशामक परंतु अत्यंत पित्तवर्धक आहेत. त्यामुळे कमी प्रमाणात खावे. पित्तप्रकृतिच्या व्यक्तीने टाळलेलेच बरे.
सुके खोबरे (Dried Coconut) - हे मधुर रस-विपाकी,वात-पित्तशामक, थंड , गुरु (पचायला जड), वृष्य(शुक्रधातु वर्धक), पोषक आणि केश्य (केसांसाठी उत्तम) आहेत.
वरील सर्व घटक पहिल्यावर लक्षात येते की या पदार्थांमुळे वात-पित्त-कफ या त्रिदोषांचा समतोल राखला जातो आणि शरीराला बळ मिळते.म्हणून तिळगुळाची योजना ही या गुणधर्माचा अधिकाधिक फायदा मिळावा म्हणून केली गेली आहे. त्यामुळे आपणही आपल्या आहारात तीळ , गूळ , खोबरे नियमित वापरावे.तिळाच्या वडया,गूळपापडी असे पोषक पदार्थ थंडीच्या दिवसांत खावे.
"मकरसंक्रांतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.. तिळगुळ खा आणि गोड-गोड बोला."
To view this article in english click here
https://samanwayayurved.blogspot.com/2016/01/significance-of-tilgud-for.html?m=0
(सदर लेख वैद्य स्निग्धा चुरी-वर्तक यांनी 14 जानेवारी 2016 रोजी आपल्या
या ब्लॉगवर प्रथम प्रकाशित केला. याचे सर्व अधिकार लेखकाधिन आहेत. इतरत्र शेअर करताना कृृपया कोणतेही बदल न करता व मूळ लेखिकेच्या नावासहित शेेेअर केल्यास हरकत नाही.)
No comments:
Post a Comment