आज चैत्र शुद्ध पाडवा म्हणजेच गुढीपाडवा, हिंदू नववर्षाचा पहिला दिवस.एका नवीन चैतन्यमयी उत्साहाची शुभ सुरुवात.भारतीय कालगणनेनुसार बघायचे झाले तर वर्षाचा पहिला महिना म्हणजे चैत्र - हा वसंत ऋतूचा काळ. हेमंत-शिशिर ऋतूच्या थंडीमुळे शरीरात साचलेला कफ वसंत ऋतूच्या उष्णतेमुळे वितळून शरीरात कफ दोषांचा प्रकोप होतो.म्हणून या काळात कफाचे आजार मोठ्या प्रमाणात दिसून येतात.
प्रकुपित कफाचा इलाज करायचा असेल तर आयुर्वेदात शोधन कर्म - वमन सांगितले आहे.यामध्ये औषधी काढयाच्या साहाय्याने वमन करुन वाढलेला कफदोष काढून टाकला जातो. जेथे शोधन शक्य नसेल तिथे शमन कर्म सांगितले आहे.यामध्ये तोंडावाटे घ्यायची औषधे वापरुन इलाज करतात.
ही औषधे, "औषध" म्हणून न घेता सहज-सोप्या पद्धतीने घेतली जावी व रोजच्या दगदगीच्या जीवनात आजारांचा मुकाबला करण्याची ताकद यावी म्हणून सण आणि आरोग्य यांचा मेळ घातला जातो.जसे की आपण गुढीला कडुनिंबाची पाने-मोहोर,गूळ ,धणे यांचा नैवेद्य दाखवतो.
यातील गूळ चवीला गोड, वात-पित्त शामक,कफ विताळवणारा, रक्त आणि मूत्र शुद्ध करणारा आहे.
धणे ज्वर,दाह,तहान कमी करणारे आहेत, चवीला कडू, वात-कफदोषनाशक आहेत.
कडूनिंब हे कडू चवीचे ,थंड, पित्त-कफदोषनाशक, पचन सुधारणारे, कृमिनाशक आणि रक्त शुद्ध करणारे आहे.
म्हणून ही चटणी फक्त पाडव्याच्याच दिवशी नाही तर पुढेही सलग काही दिवस घ्यावी.त्यामुळे वसंतात होणारे कफाचे विकार आणि पुढे ग्रीष्मात उन्हाळ्यामुळे होणारे पित्ताचे - उष्णतेचे आजार कमी होण्यास मदत होईल.
आपल्या पूर्वजांनी विचारपूर्वक ऋतू आणि हवामान बदलाच्या काळात सणांची योजना केली ज्यामुळे जीवनात आनंद येईल व या सणांच्या निमित्ताने त्या-त्या वेळी शरीराच्या स्थितीला पूरक घटकांचा नैवेद्य सुद्धा सांगितला म्हणजे त्याचे सेवन निश्चित होईल असे पाहिले.
आपणही या परंपरांचा मान राखून,त्यांचे पालन करुन जीवन आनंदी, आरोग्यदायी होईल असा प्रयत्न करु.
आपणा सर्वाना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा।।

No comments:
Post a Comment