#weekend_brunch with #ayurveda - Part 5
#inHAIRetance_वारसा_सुंदर_केसांचा #केस_पेपर_तिचा_आणि_त्याचासुद्धा
#samanwaya_ayurvedic_and_panchakarma_clinic
#keshayurved
केसांच्या समस्या भाग 3
केस गळणे.
केसांच्या समस्या म्हटले की सर्वांना सर्वप्रथम आठवते ती “झड़ते बालों की समस्या.” अगदी दहशत म्हणावी एवढी ही केसगळतीची समस्या सध्या बळावली आहे. १० पैकी ७ लोकांना थोड्या-फार प्रमाणात केस गळण्याचा त्रास असतोच. आणि जवळपास सर्वांचाच प्रवास तेले-लेप-शाम्पूपासून सुरुवात होऊन via त्वचारोगतज्ञ ते शेवटी आम्हा आयुर्वेद तज्ञांकडे येऊन पोहोचतो.
सायलीचे केस शाळेत असताना दाट आणि लांबसडक होते. तिच्या आईकडून आलेल्या या सुंदर वारश्याचा तिला खूप अभिमान.पण सध्या ती गळणाऱ्या केसांमुळे अगदी त्रस्त झाली होती. वेगवेगळे उपाय करूनही थोडासा फरक पडे आणि पुन्हा येरे माझ्या मागल्या. सायली माझ्या क्लीनिकमध्ये आली तेव्हा अगदी रडकुंडीला आली होती. पूर्वीचे दाट केस जाऊन आता तिची वेणी अगदी पातळ झाली होती. पूर्ण माहिती घेतल्यावर, तिच्या केसचा बारकाईने अभ्यास केल्यावर लक्षात आले की कॉलेजमध्ये आल्यापासून सबमिशन्स, कॉलेज फेस्ट्समुळे होणाऱ्या लेट नाईट्स, पार्टीज यामुळे तिची जीवनशैली पूर्ण बदलली होती.
चाळीशीची अमला क्लीनिकमध्ये आली , तेव्हा लक्षात आले की प्रेझेन्टेशनस्, प्रोजेक्ट डिलिव्हरी , क्लायंट मीटिंग, घरच्या जबाबदाऱ्या हे आणि असे ताण-तणाव तिच्या रोजच्या आयुष्याचा भागच झाले होते.
विमलाताईंची तर अजून वेगळी कथा, त्यांचे केसगळतीचे प्रमाण तर एवढे वाढले होते की टाळू स्पष्ट दिसू लागली होती. त्यांची हिस्टरी घेता असे लक्षात आले की अगदी लहानपणापासूनच त्यांना आम्लपित्ताचा त्रास होता.
केस गळण्याची बरीच कारणे असतात. चुकीची जीवनशैली, पोषणमूल्यांचा अभाव (nutritional deficiency), ताण-तणाव, अपुरी झोप अश्या कारणांमुळे केस गळतात. केस गळणे ही काही फक्त सौंदर्य समस्या नाही तर कधी कधी ते एखाद्या गंभीर आजाराचे लक्षण असू शकते. उदा. हॉर्मोनल आजार जसे की थायरोईड़ ग्रंथी विकार,पिट्युटरी ग्रंथी विकार, PCOS/PCOD, Autoimmune disorder, कुपोषण, SLE यासारख्या आजारांत केस गळणे एखाद्या लक्षण स्वरूप दिसते तर कधी कधी कॅन्सर च्या चिकित्सेमुळे, दीर्घ मुदतीचा ताप (Malaria,typhiod,chickengunia , dengueसारखे ताप) , केशत्वचेच्या जंतुसंसर्गामुळे (Lichen planus/ring worm infection) सुद्धा केस गळणे दिसून येते.तसेच मेनोपॉजनन्तरही केस गळताना दिसतात.
आता एवढी वेगवेगळी आणि प्रसंगी गंभीर कारणे असतील तर 'मला काहीतरी तेल-शाम्पू द्या, केस गळणे थांबवण्यासाठी.' हा उपाय होऊ शकतो का? तर *निश्चितच नाही* या सगळ्या केसेसमध्ये केस गळण्याचे कारण शोधून औषधोपचार करावे लागतात. बऱ्याचदा धातुक्षयामुळे, उदा. रस-रक्तादि धातूंचा क्षय, केस गळत असतील तर त्यांची इतरही सूक्ष्म कारणे सर्व शरीरावर दिसतात. त्यानुसार निदान (diagnosis) केले जाते आणि त्याप्रमाणे औषधोपचाराचा कालावधी वाढतो. जर एखादे गंभीर किंवा जुनाट कारण जसे की हार्मोनल आजार, PCOD, कॅन्सर असेल तर प्रसंगी पंचकर्माने शरीरशुद्धी करुन मग औषधे द्यावी लागतात. आता कोणाला प्रश्न पडेल की फक्त केसच गळत आहेत तर एवढा वेळ का लागेल ट्रीटमेंटला? पण लक्षात घ्या,अश्या केसेसमध्ये फक्त केस गळण्यासाठी चिकित्सा करून उपयोगाचे नसते तर त्यामागचे कारण ट्रीट करणे गरजेचे असते. बऱ्याचदा रुग्ण आमच्याकडे येतात तेव्हा खूप वेळ गेलेला असतो अश्या वेळी या मधल्या वेळेत झालेले केसांचे नुकसानसुद्धा भरून काढावे लागते. मुळापासून नीट ट्रीटमेंट केली तर नवीन येणारे केस चांगल्या प्रतीचे आणि ताकदवान असतात.
(क्रमशः)
लेखिका
डॉ. स्निग्धा वर्तक.
समन्वय आयुर्वेद व पंचकर्म क्लिनिक.
अधिकृत केंद्र केशायुर्वेद प्रा. लि.
बोरीवली, मुंबई.
9870690689
(सदर लेख वैद्य स्निग्धा चुरी-वर्तक यांनी 11 ऑक्टोबर 2020 रोजी https://samanwayayurved.blogspot.com/2020/10/3.html
या ब्लॉगवर प्रथम प्रकाशित केला. याचे सर्व अधिकार लेखकाधिन आहेत. इतरत्र शेअर करायचे असल्यास कृृपया कोणतेही बदल न करता व मूळ लेखिकेच्या नावासहित शेेेअर करावा.)