नमस्कार,
सध्या हिवाळ्यातील थंडीमुळे दरवर्षी असणाऱ्या सर्दी-खोकल्याच्या रुग्णांना आता omicron च्या लक्षणांनी बुचकळ्यात टाकले आहे, त्यातच भरीस भर म्हणून पाऊसही होऊन गेला. त्यामुळे सध्या मोठ्या प्रमाणात आढळत असलेल्या *हलका ताप ,अंगदुखी, सर्दी, खवखव किंवा घसा दुखणे, खोकला, मळमळ ,
उलटीची भावना, थकवा* अशी लक्षणे असणाऱ्या लोकांनी *वैद्यकीय सल्ल्याने* पुढील प्राथमिक आहार व औषध योजना करावी -
*सर्वप्रथम अजिबात घाबरून जावू नये*
*घरी राहून पूर्ण विश्रांती घ्यावी*
*पुढे सांगितल्याप्रमाणे पचायला हलका आहार, जेवढी भूक असेल तेवढाच घ्यावा.*
*आहार*-
_संध्याकाळी लवकर 7अथवा उशिरात उशिरा 8 पर्यंत जेवावे._
*भूक नसल्यास, जोपर्यंत भूक जाणवत नाही तोपर्यंत लंघन (उपास) करणे* व कोमट पाणी पीत राहावे.
_खाण्याचे पदार्थ पचायला हलके, ताजे बनवलेले व तापमानाला साधारण गरम असावे._
*काय खावे* -
◆मऊभात.
◆तांदूळ बाहेर टोपात शिजवून भाताची पेज गाळून त्यात साजूक तूप घालून घ्यावे.
◆तांदूळ भाजून भरड करून ठेवावी आणि या तांदळाच्या कण्याची पेज, चवीपुरते मीठ व साजूक तूप घालून घ्यावी.
◆भाज्यांचे सूप- (दुधी ,लाल भोपळा,फरसबी,
कोबी, शेवगा ,पालक, गाजर ,कांदा वर चवीसाठी लसूण,पुदीना,आले ,फोडणीला धणे-जिरे पूड )
◆मुगाचे कढणं ,
◆मुगाची खिचडी,
◆मुगाचे वरण + भात
◆मधल्या वेळेत खायला लाह्या(राजगिरा,
भाताच्या, ज्वारीच्या)
◆फुलका, भाकरी व दुधी ,दोडका, पडवळ भाजी
_काय खाऊ नये_
*मैदा ,फळे , दही , चीझ ,पनीर , कोल्ड्रिंक्स, फ्रिजचे पाणी वा अन्य फ्रिजचे पदार्थ* ,
*शिळे ,आंबवलेले पदार्थ पूर्णपणे टाळावे*.
ताप असताना भूक मंदावणे, तोंडाला चव नसणे साहजिक आहे पण त्याकडे दुर्लक्ष करून, खायलाच हवे या अट्टाहासाने भूक नसतानाही खाणे, चटपटीत किंवा मांसाहार करणे टाळावे.
_पाणी कसे प्यावे_
◆ या काळात पाणी उकळूनच प्यावे.
◆ शक्यतो उकळलेले पाणी गरम असताना थर्मस मध्ये भरून कोमट आणि घोट-घोट प्यावे.
◆ पाण्यामध्ये उकळताना सुंठ अथवा धणे घातल्यास उत्तम.
*साधी औषधे-*
◆शमन वटी
2 गोळ्या 2 वेळा गरम पाण्यातून
◆महासुदर्शन घनवटी
2 गोळ्या 2 वेळा सकाळी व संध्याकाळी गरम पाण्यातून घेणे.
◆_खोकला, उलटीची भावना मळमळ असल्यास._
*तालीसादि चूर्ण अथवा कफ-कोल्ड मिक्सचर*-
अर्धा चमचा मधातून चाटण दोन्ही जेवणानंतर घेणे.
◆ *कासघ्न चूर्णाच्या काढ्याने गुळण्या कराव्यात*. ते नसल्यास पाण्यामध्ये हळद उकळवून सोसेल एवढे कोमट झाल्यावर ,मीठ, थोडे तूप टाकून गुळण्या करणे.
◆ _घसा दुखत असल्यास सोसेल एवढीच गरम पाण्याची वाफ घेणे._
*हे प्राथमिक उपचार आहेत,यापैकी कोणतीही लक्षणे दोन दिवसांपेक्षा जास्त टिकल्यास अथवा दोन दिवसापेक्षा जास्त ताप येणे , तीव्र स्वरुपाचा ताप वा तीव्र स्वरूपाची कोणतीही लक्षणे दिसल्यास त्वरित फॅमिली वैद्यांचा सल्ला घ्यावा* .
वैद्य स्निग्धा चुरी-वर्तक.
समन्वय आयुर्वेद,
बोरीवली, मुंबई.
*9870690689*
*samanwayaayurveda@gmail.com*
No comments:
Post a Comment