Monday, 3 October 2016

Navaratri.. Celebration of Woman Power - Part 1.


                  Navaratri is going on and everyone is in festive mood.But every approaching Festival or ritual gives a silent shudder to women.Menstrual dates are the major make and break point of the festive mood.
                Menstruation has always been a taboo subject and Gynecological problems are always discussed in hushed tones with shameful guilt. But we need to change our mindset. On occasion of this Navaratri Festival, which is a celebration of Stree Shakti , we will discuss about this Boone for women and will try to wash off its taboo status. Inspite of all the awareness from various media many  misconceptions, distorted customs and traditions have forced Ladies to think of menstruation  as a curse. To understand science of menstruation we need to understand anatomy of female reproductive system.

                  Ayurvedic texts have described female reproductive system as external genitals, two muscular Labia (Majora and minora) and Smaratpatra (Clitoris), a pair of Stanyashaya (mammary glands-breasts) and a Garbhashaya (Uterus).
Garbhashaya is situated behind Basti (Urinary bladder), in front of pakwashaya (colon) and at postero-inferior aspect of Bhagasthi (pubic symphisis). Garbhashaya is considered as Third aavarta of Yoni. It means it situated in the third whirl. Garbhashaya has anatomical structure like a conch which has whirls in it. First avarta is Yonimarg (vagina) , second avarta is Garbhashayamukha (Cerivx) and the third innermost avarta is Garbhashaya (Uterus). Also it is lined with a layer called Jarayu (Endometrium) in which Rajah - stree dhatu is situated which fertilised ovum is embedded, protected and nourished.Rajah is also responsible for menstruation.
Antahphala (Ovaries) are present as pair and responsible for ovulation and menstruation.


  • Yonimarg (Vagina) is a stretchable , muscular canal which connects external genital organs to the cervix. It is responsible for semen entry, excretion of menstrual discharge and also serves important role delivery of fetus.


  • Garbhashayamukh (Cervix) - The cervix is the neck of the uterus, the lower, narrow portion where it joins with the upper part of the vagina.

It closed during pregnancy thus provides protection to the growing fetus. And dilates at term to ejaculate the fetus out.

  • Garbhashaya (Uterus and fallopian tubes) - it is the main body which comprises of fundus and fallopian tubes. Uterus is made of three layers of strong and flexible muscular layers. It has a major role in providing mechanical protection, nutritional support, and waste removal for the developing embryo  and fetus. Also contractions in the muscular wall of the uterus are important in pushing out the fetus at the time of birth.


  • Antahphala (Ovaries) - these are an almond shaped pair of organs situated at each side of uterus. Ovaries have major role in ovulation and reproductive hormones production.


Menstruation -
According to Ayurveda Aartava is a stree beej (ovum) which is fertilised by a sperm and Rajahsrawa is menstrual bleeding which takes place every month in absence of fertilization.
Rajah is considered as a upadhatu of Rasadhatu. In healthy women Rajah is red in colour like Gunjaphal , red sealing wax,red Lotus or aalata (these different shades of red are described according to age, prakruti of different women.) If it stains a piece cloth, it can be washed thoroughly with water. Menstrual bleeding should happen once in a month and it should last for 3-5 nights only. Anything more or less than that will be considered abnormality. Discharge should not be heavy or scanty. It should not be sticky or foul smelling.There should not be any pain or spasm.
                                       To be continued..

Saturday, 1 October 2016

नवरंग.. नवरात्राचे…. स्त्री शक्तीचे आणि आरोग्याचे - महिन्यातील "ते" दिवस.


                 गेल्या वर्षी नवरात्राच्या निमित्ताने आपण स्त्रीच्या आयुष्यात वेगवेगळ्या टप्प्यांवर येणाऱ्या आरोग्यविषयक नऊ आव्हानांचा विचार केला होता.
               या वर्षी आपण स्त्रियांची मासिक पाळी, तिचे आरोग्यविषयक महत्व आणि वयाच्या विविध टप्प्यांवर बदलत जाणारे स्वरुप यांचा विचार आपण करू. खरंतर स्त्रियांचे आरोग्य हा हलकेच कुजबुजत बोलण्याचा विचार होता कालपरवापर्यंत, पण आता स्थिती बदलते आहे. माध्यमांमधून याबाबत प्रबोधन होत आहे. महिलासुद्धा जागरूक होऊन सजगतेने माहिती मिळवताना, बोलताना दिसतात तरीही काही गैरसमजुती, प्रथा आणि जुन्या प्रथांचे विकृतीकरण यामुळे आजही मासिक पाळीचे आरोग्य काहीसे दुर्लक्षितच आहे. ते नीट समजून घेण्यासाठी आपण प्रथम स्त्री प्रजनन संस्थेची रचना पाहू.

                  आयुर्वेदामध्ये स्त्री प्रजनन संस्थेचे वर्णन करताना बाह्य दोन पेशी व स्मरातपत्र ( Labia and clitoris ) तसेच दोन स्तन्याशय व आभ्यंतर एक गर्भाशय यांचे वर्णन आहे. यापैकी गर्भाशय हे स्त्री शरीरात बस्तिच्या ( Urinary Bladder) मागे , पक्वाशयाच्या (colon) पुढील बाजूस व भगास्थिच्या(pubic symphisis) मागे खालील बाजूस असतो. गर्भाशयाला योनीचा तिसरा आवर्त म्हटले आहे.यात बाहेरच्या बाजूस योनीमार्ग- Vagina(प्रथम आवर्त) , गर्भाशयमुख - Cervix (द्वितीय आवर्त) व गर्भाशय - Uterus and fallopian tubes (तृतीय आवर्त) असे वर्णन आहे.तसेच गर्भाशय हे आतील बाजूने ‘जरायु’ (Endometrium) नामक आवरणाने आच्छादित असते ज्यामध्ये ‘रज’धातु स्थित असतो,जो गर्भाचे पालन-पोषण करतो आणि मासिक धर्माचे नियमन करतो.
                   अंतफले हि दोन असतात व स्त्रीबीज उत्पत्ती आणि मासिक धर्माचे नियमन करतात असे वर्णन आहे.


  • योनीमार्ग म्हणजे Vagina ही पेशींपासून बनलेली नलिका बाह्य जननेंद्रिये गर्भाशय मुखाशी जोडते.शरीरात शुक्राचा प्रवेश आणि मासिक पाळीच्या वेळी रजःस्राव तसेच जन्माच्या वेळी शिशूचे बाहेर येणे यासाठी योनीमार्ग सुस्थित असणे आवश्यक आहे.

  • गर्भाशयमुख म्हणजे Cervix हा गर्भाशयाचा खालचा निमुळता भाग आहे, जो योनी व गर्भाशयाला जोडतो. गरोदरपणात शिशूचे रक्षण आणि प्रसावच्या वेळी शिशूला वाट देण हे गर्भाशयमुखाचे कार्य आहे.

  • गर्भाशय म्हणजे uterus हे लवचिक आणि ताकदवान पेशींच्या ३ स्तरांनी बनलेले असते.गर्भाशयाचे मुख्य कार्य म्हणजे फलित बीजसाठी पोषण, संरक्षण आणि पालनासाठी योग्य वातावरण निर्मिती करणे तसेच जन्माच्या वेळी गर्भनिष्क्रमण आहे.

  • अंतःफले म्हणजे Ovaries ही साधारण बदामाएवढ्या आकाराची अवयवांची जोडी गर्भाशयाच्या दोन्ही बाजूस प्रत्येकी एक अशी असते.या  Ovaries मुळे स्त्रीबीज तसेच प्रजननासाठी आवश्यक संप्रेरकांची (Hormones) निर्मिती होते.


मासिक पाळीचे चक्र -
                   आयुर्वेदानुसार आर्तव म्हणजे गर्भधारणेच्या वेळी शुक्राशी संयोग  पावणारे स्त्रीबीज तर रजःस्राव म्हणजे गर्भधारणा न झाल्यास दर महिन्याला जाणारा स्राव म्हणजेच ज्याला आपण मासिक पाळी म्हणतो.रजः हा रसधातूचा उपधातू आहे.शुद्ध रज हे गुंजेच्या बीप्रमाणे, पायांना लावायच्या आळत्याप्रमाणे , लाखेच्या रसाप्रमाणे किंवा लाल कमळाच्या रंगप्रमाणे लाल असावे.(वय,प्रकृती,स्थान यानुसार लाल रंगामध्ये येणारे वैविध्य या छटांनी सांगितले आहे.) तसेच त्याचा कापडावर डाग पडला तर धुवून सहज नाहीस व्हावा. रजःस्रावाचा कालावधी महिन्यातून एकदा, तीन ते पाच रात्रीपर्यंत असावा.रजःस्राव अति जास्त किंवा अटी अल्प नसावा.चिकट, बुळबुळीत किंवा दुर्गंधी नसावा. रजःस्रावाच्या कालावधीत कोणताही दाह , शूल , वेदना नसाव्यात. थोड्या प्रमाणात थकवा असणे प्राकृत आहे. 
क्रमशः

Friday, 6 May 2016

फळांचा राजा आंबा

फळांचा राजा आंबा





                  वसंत ऋतूमध्ये कोकिळेच्या आवाजाबरोबर सर्वांना साद घालत येतो तो आंबा. या दिवसात आंब्याला आलेला मोहोर, हळूहळू वाढणाऱ्या कैऱ्या सर्वांना खुणावत असतात.ज्याच्या घराजवळ-बागेत झाड असेल तिथे येणाऱ्या जाणाऱ्या सगळ्यांचे लक्ष या कैऱ्यांवर असते.बाजारातसुद्धा आंब्यांची हंगामी दुकाने दिसू लागतात. हापूस,पायरी,रायवळ,लंगडा,दशहरा,बेंगनापल्ली, केशर,तोतापुरी,राजापुरी या आणि अशा कितीतरी प्रकारचे आंबे संपूर्ण भारतात वेगवेगळ्या ठीकाणी आवडीने खाल्ले जातात. या दिवसात आंबा न खाण्याची इच्छा होणारी व्यक्ती क्वचितच असेल.
                आयुर्वेदातही आंब्याचे गुण सविस्तर वर्णन केले आहेत.छोटी कैरी (बाल आम्र),वाढ पूर्ण झालेला परंतु कच्चा आंबा (तरुण आम्र ) आणि पिकलेला आंबा (पक्व आम्र) यांचे गुण वेगवेगळे असतात.

               आम्र बालं कषायाम्लं रुच्यं मारुतपित्तकृत् ।
               तरुणं तु तदत्यम्लं रुक्षं दोषत्रयास्रकृत् ।।
        कोवळी कैरी ही चवीला तुरट-आंबट , अम्ल विपाकी आणि उष्ण गुणांची आहे. तशीच ती वात-पित्तकर आहे.
तरुण आम्र हा अतिशय आंबट, रुक्ष, उष्ण आणि तिन्ही दोष वाढवणारा आहे. कैरीमध्ये क्षारांचे प्रमाण अधिक असते. उन्हाळ्यात घामावाटे क्षार निघून गेल्याने जाणवणाऱ्या थकव्यासाठी पन्हे हे उत्तम तर्पण आहे.मात्र कैरी अतिप्रमाणात खाल्ली तर पोटाचे त्रास होतील. त्यामुळे पन्हे,आंबेडाळ,भेळ असा आडवा हात मारताना मनाला आवरलेलेच बरे. गावाकडे घामोळे आल्यावर  कैरीचा गर लावून अंघोळ करायची पद्धत आहे. कैरीचा किस रुमाल बांधव डोळयांवर ठेवल्यास डोळ्यावर आलेला ताण कमी होतो. कैरीची कोय तुरट चवीची असते.  बाठीचे चूर्ण मंजनामध्येसुद्धा वापरतात. कषाय रसामुळे (तुरट चवीमुळे) हिरड्यांतून रक्त येणे,त्यांत पू  होणे अश्या त्रासांमध्ये कोयींच्या चूर्णाने मंजन केले जाते. आंब्याची पाने 'पंचपल्लवांमध्ये**' गणली जातात. त्यांचा  जंतुनाशक तसेच  म्हणून  सुगंधासाठी वापर होतो. 

पिकलेला आंबा


                पक्वं तु मधुरं वृष्यं स्निग्धं हृद्यं बलप्रदम् ।
                गुरु वातहरं रुच्यं वर्ण्यं शीतमपित्तलम् ।।
                रसस्तस्य सरः स्निग्धो रोचनो बलवर्णकृत् ।

                हा मधूर रस-विपाकी, थोडासा तुरट ,स्निग्ध आणि शीतवीर्य आहे. पिकलेला आंबा नियमितपणे खाल्ल्यास तो बलदायी, हृदय (मनाला आनंद देणारा आणि हृदयाचे संरक्षण करणारा) , वर्णकर आहे. आंब्यामुळे जठराग्नि (पचनशक्तीचे बळ ) वाढते पण तरीही हा पित्ताकार नाही.तसेच पिकलेला आंबा हा गुरू - पचायला जड आहे, त्यामुळे अति प्रमाणात खाल्ल्यास पोट जड होते. या कारणामुळे तसेच अधिक मात्रेत शर्करा असल्यामुळे मधुमेही व्यक्तींनी वैद्यकीय सल्ल्याने आंबा प्रमाणात खावा.
आमरस हा रुची वाढवणारा , स्निग्ध पण सारक  असतो.

● पिकलेला आंबा आणि सप्तधातू
        आंबा हा रस-रक्तादि सर्व धातूंना बल देतो. शुक्रवृद्धी करतो. वृष्य (aphrodisiac) आहे. आंबा पोषक आहे, सप्तधातूंच्या पोषणासाठी पिकलेल्या आंब्याचे नियमित सेवन उत्तम असते.आधुनिक मतानुसार आंबा जितका पिकलेला तितके त्यात कॅरोटीन चे प्रमाण वाढते.कॅरोटीन हा Vitamin A चे प्रारूप (Precursor) आहे. म्हणून आबालवृद्धांनी या मोसमात आंबा नियमित व प्रमाणात खावा.

  • कैरीचे पन्हे
याला आयुर्वेदात 'पानक' असे म्हणतात.त्याची कृती पुढीलप्रमाणे,

कैरीचा गर १ वाटी
खडीसाखर १ ते १.५ वाटी (बारीक करून घ्यावी)
पाणी
भीमसेनी कापूर
मिरेपूड
वेलची
जिरेपूड

१. कैऱ्या सोलून पाण्यात उकळून शिजवून घ्याव्या.(कुकरला उकडून सुद्धा घेता येतील.)
२. कोयी बाजूला काढून गर बारीक करावा.
३. हा गर मोजून त्यात 1 वाटी गराला साधारण १ ते १.५ वाटी खडीसाखर मिसळावी.( साखरेचे प्रमाण कैरीचा आंबटपणावर अवलंबून)
४. पाणी मिसळून भीमसेनी कापूर, जिरे-मिरेपूड, वेलची आणि चवीनुसार मीठ घालावे.
            हे पानक उष्ण आणि पित्तकारक असते मात्र त्यातील खडीसाखर,भीमसेनी कापूर, जीरे, वेलची यामुळे त्याचा उष्ण गुण कमी होतो तसेच ते शीघ्र इंद्रिय तर्पण म्हणजेच तृप्ती देणारे,तहान कमी करणारे होते.व किंचित मिरेपूड घातल्याने बाधत नाही. भीमसेनी कापूर  खात्रीचा न मिळाल्यास नाही टाकला तरी चालेल पण कृत्रिम पद्धतीने बनवलेला रसायनयुक्त कपूर वापरू नये. 
त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात पन्हे पिण्याचा आनंद जर5 घ्यावा फक्त पित्त प्रकृतीच्या व्यक्तींनी जरा जपून घ्यावा.

  • पिकलेल्या आंब्याचा मुरंबा

पिकलेल्या आंब्याच्या सोलून मोठ्या फोडी
साखर - दीडपट
पाणी - साधारण साखरेच्या निम्मे
लवंगा

कृती -
१. साखर व पाणी एकत्र करून दोनतारी पाक करावा.
२. आंब्याच्या फोडी व लवंगा घालाव्यात.
३.आंब्याच्या रसामुळे पाक पुन्हा पातळ होईल. मध्यम आचेवर मुरांबा शिजवावा आणि पूर्वीप्रमाणे दोनतारी पाक होईपर्यंत शिजवावे.

आंबेडाळ  - ही  पाककृती माझ्या लहानपणापासून खूप आवडती आहे. आमच्या बालमोहन विद्यामंदिर शाळेत चैत्र महिना सुरु झाला कि सगळ्या विद्यार्थ्यांना  आंबेडाळ आणि कलिंगड दिले जाई. मुलींना चैत्रगौरीचे हळदी-कुंकू दिले जाई. त्यामुळे कलिंगड आणि कैऱ्या दिसल्या कि माझं मन पुन्हा एकदा शाळेत जातं.
तर , आंबेडाळ बनवण्यासाठी साहित्य - 
चण्याची डाळ - १ कप ( ६-८ तास किंवा रात्रभर भिजवून ठेवलेली )
कैरीचा किस - १ कप 
साखर - १चमचा 
मीठ - चवीनुसार 
फोडणीसाठी साहित्य - तेल, मोहरी , मिरची, कढी पत्ता,किंचित हळद आणि हिंग 

कृति  - 
  १. भिजवलेली चणा  डाळ मिक्सरमध्ये भरड वाटून घ्यावी. 
 २. त्यामध्ये किसलेली कैरी, चवीनुसार साखर आणि मीठ घालून नीट मिसळून घ्यावे. 
 ३. वरून फोडणी द्यावी. अशी साधी सोपी सहज आंबेडाळ सगळ्यांना नेहमीच आवडते. 
  
असे हे आंबा आख्यान सुफळ संपूर्ण झाले. 


टीप - प्रस्तुत लेख वैद्य स्निग्धा चुरी-वर्तक यांनी लिहिला असून या लेखाचे copyright हक्क लेखिकेधीन  आहेत.  लेख शेअर करायच्या असल्यास त्यात बदल न करता , लेखिकेच्या नावासहित शेअर करावा.  

Friday, 29 April 2016

डालडाचे खाणार त्याला......

        

      डालडाचे खाणार त्याला......
           

              दर वर्षी उन्हाळा सुरू झाला की सर्व social media वर एक मेसेज फिरायला लागतो तो म्हणजे डालडा पासून बनवलेले Ice Cream. पहिल्यांदा हा मेसेज वाचणारा माणूस एकदम शहरतोच. "ई sss , शीssss, नकोच ते Ice Cream" अशा सगळ्या प्रतिज्ञा होतात. पण मग उन्हाळा आहे आणि ice cream नाही खायचं म्हणजे कसं? मग अमूक एका कंपनी ऐवजी दुसऱ्या तमक्या कंपनीचे दुधापासून बनवलेले ice cream पण डालडावाले Ice Cream नकोच हे सर्वानुमते ठरते.

पण हे एवढे पुरेसे आहे का? इतर कितीतरी मार्गांनी आपण या विषारी डालडाचे सेवन करत आहोत.

          काय आहे हे डालडा??? खरे तर डालडा हे ब्रँड नेम आहे या पदार्थाला म्हणतात वनस्पतीजन्य खाद्य तूप थोडक्यात 'वनस्पती.' आपण जे तेल स्वयंपाकासाठी वापरतो ते जर जास्त काळ राहिले तर त्यावर हवा आणि प्रकाशाची रासायनिक प्रक्रिया होते आणि त्यामुळे त्याला एक विशिष्ट चव आणि वास येतो यालाच खवटपणा किंवा Rancity म्हणतात.असे तेल मग स्वयंपाकासाठी वापरले जात नाही.त्यामुळे उत्पादकांचे नुकसान होते.हे टाळण्यासाठी 20व्या शतकात तेलावर Hydrogenation ही प्रक्रिया केली जाऊ लागली.यामुळे ही पातळ तेले घट्ट,टिकाऊ, वास न येणारी आणि वाहतुकीला सोयीची झाली. या सर्व कारणांमुळे हे वनस्पती खूप लोकप्रिय झाले. Margarine हासुद्धा वनस्पती चा भाऊच. त्यात भर म्हणून याला म्नाव दिले वनस्पती तूप यामुळे लोकांचा गैरसमज झाला आणि एवढे स्वस्त "तूप" म्हटल्यावर रोजचे जेवण,तळण, पक्वान्ने एवढेच काय लोक दिवाळीचा फराळसुद्धा डालडामध्ये बनवू लागले. (दचकलात ना?डालडामध्ये बनलेले रवा-बेसनाचे लाडू,करंज्या आणि चकल्यासुद्धा.. मीसुद्धा एका रुग्णाकडून हे सर्वप्रथम ऐकलं तेव्हा अशीच दचकले होते)

             या वनस्पतीचे शरीरावर काय घातक परिणाम होतात ते जरा पहा -

- वनस्पतिज तूप शरीरातील वाईट Cholesterol (LDL) वाढवते आणि चांगले Cholesterol (HDL) कमी करते.

- या वनस्पतिज तूपातील घटक रक्तवाहिन्यांच्या अंतःत्वचेमध्ये साचून राहतात ज्यामुळे धमनीप्रतीचय (Coronary artey blockeges) , हृद्रोग, उच्च रक्तदाब, Hyperlipidemia (वाढलेलं Cholesterol) यासारखे आजार दिसून येतात.

- शरीरामध्ये Inflammation म्हणजे पेशींना आलेली सूज कमी करण्यासाठी जी रसायने आवश्यक असतात ती तयार होण्यास बाधा आणते.

- Hyperallergy म्हणजेच प्रत्युर्जता वाढवते, यामुळे शरीरावर पुरळ , कंड ,लालसर चट्टे उठणे असे त्रास दिसून येतात

             पण सध्या या वनस्पती विरोधात बराच गदारोळ झाल्यामुळे जेवणात होणारा वापर तरी बऱ्याच प्रमाणात कमी झाला असला तरी पुरता हद्दपार नाही, कारण आपण अजूनही पुरेसे जागरूक नाही.

               वनस्पती तूप, Hydrogenised oil , trans fat हे एकमेकांचे प्रतिशब्द आहेत आणि हे हमखास मिळण्याची जागा म्हणजे

- तयार खाद्यपदार्थ. बाजारातले Ready to eat food, बिस्किटस्, प्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ (processed food)

- Bakery पदार्थ म्हणजे खारी, बटर, नानकटाई, केक्स

- तळलेले फ्रेंच फ्राईज,नाचोज

- Butter जो बटर ही नही किंवा बटर से बेटर च्या नावाने विकले जाणारे table margarine (यात खूप मखलाशीने हे butter नाही असे सांगतात पण हे margarine म्हणजे बटर पेक्षा जास्त धोकादायक आहे हे सांगत नाहीत.)

- Eggless cake म्हणून विकताना वापरले जाणारे फॅट,क्रीम किंवा फ्रॉस्टिंग

- टपरीवाले, हलवाई , कॅन्टीनवाले, लग्नादी समारंभाची जेवणे बनवणारे आचारी हे सगळे खर्च वाचवण्यासाठी बऱ्याचदा वनस्पती वापरत असतात.

        त्यामुळे हे घातक वनस्पती जीवनातून पूर्णपणे हद्दपार करणे कठीण होऊन बसते परंतू या बाबत नीट माहिती असेल तर जागरूकपणे आपण त्याचा वापर कमी करण्यासाठी नक्कीच प्रयत्न करू शकतो.


मूळ लेखिका- 

वै. स्निग्धा चुरी-वर्तक.

समन्वय आयुर्वेद व पंचकर्म क्लिनिक.

बोरीवली, मुंबई.

*9870690689*

(कृपया लेख फॉरवर्ड करताना मूळ लेखिकेच्या नावसाहित फॉरवर्ड करावा.आपल्या या छोट्याशा नैतिक कृतीने त्यांनी लिखाणासाठी केलेले श्रम सार्थकी लागतात.

धन्यवाद.

सदर लेख वैद्य स्निग्धा चुरी-वर्तक यांनी 13 एप्रिल 2022 रोजी आपल्या https://samanwayayurved.blogspot.com/2016/04/blog-post_29.html

या ब्लॉगवर प्रथम प्रकाशित केला. याचे सर्व अधिकार लेखकाधिन आहेत.)


 

Friday, 8 April 2016

गुढीपाडवा

                 आज चैत्र शुद्ध पाडवा म्हणजेच गुढीपाडवा, हिंदू नववर्षाचा पहिला दिवस.एका नवीन चैतन्यमयी उत्साहाची शुभ सुरुवात.भारतीय कालगणनेनुसार बघायचे झाले तर वर्षाचा पहिला महिना म्हणजे चैत्र - हा वसंत ऋतूचा काळ.  हेमंत-शिशिर ऋतूच्या थंडीमुळे शरीरात साचलेला कफ वसंत ऋतूच्या उष्णतेमुळे वितळून शरीरात कफ दोषांचा प्रकोप होतो.म्हणून या काळात कफाचे आजार मोठ्या प्रमाणात दिसून येतात.
                  प्रकुपित कफाचा इलाज करायचा असेल तर आयुर्वेदात शोधन कर्म - वमन सांगितले आहे.यामध्ये औषधी काढयाच्या साहाय्याने वमन करुन वाढलेला कफदोष काढून टाकला जातो. जेथे शोधन शक्य नसेल तिथे शमन कर्म सांगितले आहे.यामध्ये तोंडावाटे घ्यायची औषधे वापरुन इलाज करतात.
                  ही औषधे, "औषध" म्हणून न घेता सहज-सोप्या पद्धतीने घेतली जावी व रोजच्या दगदगीच्या जीवनात आजारांचा मुकाबला करण्याची ताकद यावी म्हणून सण आणि आरोग्य यांचा मेळ घातला जातो.जसे की आपण गुढीला कडुनिंबाची पाने-मोहोर,गूळ ,धणे यांचा नैवेद्य दाखवतो.
                यातील गूळ चवीला गोड, वात-पित्त शामक,कफ विताळवणारा, रक्त आणि मूत्र शुद्ध करणारा आहे.
धणे ज्वर,दाह,तहान कमी करणारे आहेत, चवीला कडू, वात-कफदोषनाशक आहेत.
कडूनिंब हे कडू चवीचे ,थंड, पित्त-कफदोषनाशक, पचन सुधारणारे, कृमिनाशक आणि रक्त शुद्ध करणारे आहे.
 म्हणून ही चटणी फक्त पाडव्याच्याच दिवशी नाही तर पुढेही सलग काही दिवस घ्यावी.त्यामुळे वसंतात होणारे कफाचे विकार आणि पुढे ग्रीष्मात उन्हाळ्यामुळे होणारे पित्ताचे - उष्णतेचे आजार कमी होण्यास मदत होईल.
                आपल्या पूर्वजांनी विचारपूर्वक ऋतू आणि हवामान बदलाच्या काळात सणांची योजना केली ज्यामुळे जीवनात आनंद येईल व या सणांच्या निमित्ताने त्या-त्या वेळी शरीराच्या स्थितीला पूरक घटकांचा नैवेद्य सुद्धा सांगितला म्हणजे त्याचे सेवन निश्चित होईल असे पाहिले.
आपणही या परंपरांचा मान राखून,त्यांचे पालन करुन जीवन आनंदी, आरोग्यदायी होईल असा प्रयत्न करु.
आपणा सर्वाना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा।।

Sunday, 28 February 2016

उपवासाचे शास्त्र



उपवासाचे शास्त्र 

                     उपवास हा शब्द 'उपविश ' या संस्कृत क्रियापदापासून बनला आहे. 'उप' म्हणजे जवळ आणि 'विश ' म्हणजे रहाणे /वास करणे. यामुळे उपवास या शब्दाचा अर्थ होतो शरीर - मनाने देवाच्या जवळ  रहाणे . व्यक्तीच्या कायिक-मानसिक शुद्धतेसाठी उपवासाची योजना केली गेली आहे . पण हल्ली उपवास म्हणजे अतिकडक अन्न-पाणी वर्ज्य करून (निर्जळी ) किंवा याच्या अगदि विरुद्ध म्हणजे 'एकादशी आणि दुप्पट खाशी' अशा चमचमीत प्रकारचे तरी असतात. या दोन्ही प्रकारात कसली आली आहे हो शुद्धता ?
                   परमेश्वराच्या जवळ जायचे, ध्यानानंदात तल्लीन व्हायचे तर शरीरात लाघव म्हणजेच हलकेपणा  आणि मनाला उत्साह हवा. 
 आयुर्वेदाचार्य चक्रपाणी म्हणतात ,
 उपावृत्तस्य पापेभ्यः सहवासो गुणैः सह ।
उपवासो  स विज्ञेयो न शारीरविशोषणम ।।
                    पापकर्मापासून दूर (निवृत्त) होऊन परमेश्वराच्या सहवासात राहणे. पुढे ते असेही म्हणतात उपवास म्हणजे शरीराचे  शोषण नाही . 
                    म्हणून उपवास करताना, मनाला चिंता,लोभ,मत्सर,दुःख यातून Break द्यायचा आणि देवाचे नाम-जप यात रमून जायचे आणि शरीराला - पर्यायाने पचन संस्थेला Break द्यायचा व पचायला हलके पदार्थ खायचे म्हणजे पचन सुधारते आणि सामता कमी होऊन शरीराला हलकेपणा (लाघव) येतो 
                      पण प्रत्यक्षात आपण काय करतो तर उद्या शिवरात्र-एकादशी-अंगारकी आहे मग , " सगळ्यांसाठीच नाश्त्याला साबुदाण्याची खिचडी करू" म्हणून ढीगभर साबुदाणे भिजत घातले जातात. साबुदाण्याची  खिचडी-वडे ,वेफर्स,दाण्याची आमटी असे एकापेक्षा एक दणदणीत ,पचायला जड असलेले खाऊन आपण पचन संस्थेला अजून दमवून टाकतो आणि`मग अंग जड वाटणे , गॅसेस होणे, Hyperacidity, डोकेदुखी हे प्रकार सुरु होतात. त्यात अजून भूक दाबण्यासाठी म्हणून चहा-कॉफी चा मारा असतोच . मग सुरू होतात डॉक्टरांच्या वाऱ्या आणि ओरड सुरु होते कि हे उपास-तापास सोसत नाहित ब्वा  आपल्याला ……. 
खरं तर उपवास नाही तर उपवासाची चुकीची पद्धत सोसत नसते आपल्याला. मनाचं-शरीराचं न ऐकता फक्त जिभेचं ऐकल्याचा हा परिणाम असतो.
                    म्हणून उपवास करताना  पुढील पदार्थांचा वापर करावा . 

  1. सामान्यतः उपवासाचे पदार्थ हे पचायला हलके मात्र पचायला सोपी शर्करा असलेले (Simple  forms  of  sugars  such  as Glucose ,Fructose ) , Magnesium  असलेले असावेत जेणेकरून शरीराला  त्वरित उर्जा मिळू  शकेल. 
  2. चिक्की हा उत्तम पदार्थ आहे. यातील गूळ राजगिरा सुकामेवा हे पदार्थ त्वरित उर्जा देणारे , मिनरल्स आणि प्रमाणात स्निग्ध पदार्थ पुरवणारे असतात . 
  3. उसाचा रस हा बलकारक , तहान शमन करणारा ,मूत्र शोधन करणारा आणि थंड  आहे 
  4. शहाळ्याचे पाणी सप्तधातूवर्धक,थंड,तृष्णाहर असे असूनही  पचायला हलके तरीही दीपन करणारे आहे . 
  5. वेगवेगळ्या  प्रकारची ताजी आणि शक्यतो त्या ऋतुमानातील फळे चावून खावी . फळांचे रस घेतल्यास शरीराला आवश्यक चोथा फेकून दिला जातो आणि गरजेपेक्षा जास्तीची साखर शरीरात जाते म्हणून ते शक्यतो टाळावेत . 
  6. खजूर खारका , जर्दाळू,मनुका,बदाम,अक्रोड,चारोळी यासारखा सुका मेवा मात्र थोड्या प्रमाणात खावा . काजू,पिस्ते,शेंगदाणे टाळावे.
  7. प्रवासात असताना उपवास करायचा असेल तर आंबापोळी ,फणसपोळी ,कोहळ्याचा पेठा , चिक्की ,सुकामेवा खाता  येईल .
    रस्त्यावरचे Juices , कापलेली फळे खाऊ नयेत . 
  8. गायीचे दूध,ताक,साजूक तूप  वापरावे पण दूधापासून बनले आहेत म्हणून बासुंदी ,लस्सी, मिल्कशेक, श्रीखंड, पेढे, बर्फी किंवा पनीरचे पदार्थ खाऊ नयेत ते पचायला जड असतात . 
  9. वेगवेगळे कंद जसे कि शिंगाडा,सुरण, कंदभाजी ,रताळी , कोनफळ हे उपवासासाठी उत्तम, पण ते शक्यतो भाजून किंवा उकडून खावे , तळून  खाणे टाळावे . 
  10. सगळ्यात महत्वाचे म्हणजे हॉटेलच्या Menu card वर, वेगवेगळ्या कूकिंग शोज मध्ये "उपवासाचा/ची/चे या विशेषणाने सुरु होणारे सर्व पदार्थ टाळावेत (उदा. डोसे,मिसळ,कचोरी,कटलेट ,सामोसे,कोफ्ते हे आणि  असे सगळेच, हल्ली पिझ्झा सुद्धा आला आहे बरं का.. )
शेवटी उपवास का आणि कशासाठी करायचे या मागची कारणमीमांसा लक्षात घेणे महत्त्वाचे  नाहीतर चवीसाठी खायचे असतील तर या पाककृतींचा आस्वाद घेण्यासाठी उपवासाचे निमित्त कशाला?
शेवटी आरोग्यासाठी , आनंदासाठी केलेला उपवास खरा,नाही का?

(सदर लेख वैद्य स्निग्धा चुरी-वर्तक यांनी 28 फेब्रुवारी 2016 रोजी आपल्या https://samanwayayurved.blogspot.com/2016/02/blog-post.html?m=1

या ब्लॉगवर प्रथम प्रकाशित केला. याचे सर्व अधिकार लेखकाधिन आहेत. इतरत्र शेअर करताना कृृपया कोणतेही बदल न करता व मूळ लेखिकेच्या नावासहित शेेेअर केल्यास हरकत नाही.)












































































Sunday, 7 February 2016

For your Eyes Only...

Eye care

                Nowadays cases of various eye complaints and disorders related to eyes have risen up. Overuse of smartphones , televisions, computers is attributing to these complaints. People can and are using their smartphones ,laptops,kindles,i-pads outside their workspace as well.It has added some extra stress to eyes which might have gotten some free time to rest.This stress is the root cause of various common and severe eye problems.
               Stressed eyes can be diagnosed with symptoms like eye fatigue , Watery- irritated eyes, dry eyes, eye pain, reduced vision. If ignored it can get more severe and cause headache, reduced or disturbed sleep patterns, loss of concentration and irritability.
                Hence taking good care of your eyes , nurturing them is important. But for that first we need to understand basic  anatomy (structure) of our eyes.


                An Eye is roughly spherical structure situated in an orbit and mainly consists of three layers.


  • Outer fibrous coat is sclera and te transparent cornea.
  • Middle vascular layer comprises of coroid,cilliary body and an iris.
  • Innermost sensory layer is formed by retina which is an extended layer of the optic nerve,which carries visual senses to the brain.
  •                  When light rays fall on the eye , they usually fall on cornea which then refracts light through pupil which then get focused through the lens and the aqueous humor to fall on the retina.
    Retina being light and colour sensitive,carries these nerve impulses to the brain via optic nerve. Thus enabling us to visualize.
                   
            Externally there are six accessory eye muscles which control eye movement, refer to this image.

                  

              According to Ayurveda 'Chakshurindriya (चक्षुरिन्द्रिय) is located at an eye. And it has prime function of Seeing, looking and observing (दर्शनम्) . But nowadays we have limited this capacity mainly to a near vision work e.g. reading, watching illuminated screens of mobiles,TVs,computers which has increased stress.
                To rectify these complaints, we need to incorporate few minor changes to our routine. first we will start with following exercises.

  • Take a 10 minutes break from work every 3 hours. Do various eye and neck exercises. (It can be done at your workstation itself.)
  • Squeeze both eyes tightly ,hold for few seconds and then reopen slowly. Repeat this procedure 3-4 times
    Close eyes , open and look at some near object ,at around 15-20 cms.
  • Repeat this process and look at some distant object
  • Splash normal tap water on eyelids keeping eyes closed.
  • Wash eyes before going to bed and after waking up in the morning.


           These procedures considerably reduce eye strain. But if problem persists, one can sought help of Ayurveda. Ayurvedic treatments chiefly include internal medicines and panchakarma which controls vitiated Vat Dosha,  regulates activity of Vat , pacifies Pitta Dosha  and removes excess of kapha dosha. Procedures like Tarpan ( Netra Basti) ,Nasya , Parishek , Dhara, Lepam, Bidalak and Basti kram are performed.

              At Samanwaya ayurvedic and panchakarma clinic , we have started ' Vagbhat Netra suraksha Program ' , which is an eye care program for everyone.
Key features of this program -
  • This is a very scientific and Customized program which caters every patients requirements.
  • It includes various combinations of eye exercises , oral medication, panchakarma and Dietary - routine corrections as per patients' complaints.
  • For which we take a detailed patient history and suggest individual based program features.
  • This is a weekly appointment based program where we give eye exercises for each week. Every week we progress to next set of exercises after evaluating earlier exercises.
  • For further information and to book your appointment kindly contact / message Samanwaya ayurvedic and panchakarma clinic. (Email drsnigdhapchuri@gmail.com )

Disclaimer - This article has first been published on date 07th February 2016 by Dr Snigdha Churi-Vartak on her blog http://samanwayayurved.blogspot.com   All rights to this article are reserved. Kindly ask for permission prior sharing and do share without changing any contents and original author's name and blog address.