Tuesday, 28 March 2017

देह देवाचे मंदिर - भाग (१)



आज चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात गुढीपाडवा, हिंदू नववर्षातील पहिला दिवस. मावळत्या सूर्याबरोबर गतवर्षाला निरोप देताना नविन वर्षाचे स्वागत उगवत्या सूर्याबरोबर करण्यासाठी एक नवीन परिपाठ,विचार, आपणा सर्वांसमोर मांडायला मला आवडेल. आणि हा विचार आहे आयुर्वेदीय जीवनशैली म्हणजेच दिनचर्येचा.
दिनचर्या हा आयुर्वेदाच्या स्वस्थवृत्त विचाराचा एक महत्वाचा भाग आहे. आजारी नसतानाही आपल्या आरोग्याच्या जपणुकीसाठी जे नियमित उपाय आपण करतो त्यांना स्वस्थवृत्त असे म्हणतात. तुकोबा म्हणतात ‘देह हे देवाचे मंदिर आहे आणि आत जो आत्मा आहे तो परमेश्वरस्वरूप आहे.’  मग या मंदिराची स्वच्छता, पावित्र्य अबाधित ठेवण्यासाठी आपण काय करतो? ज्याप्रमाणे घर स्वच्छ ठेवण्यासाठी आपण रोज केरवारे , सडासंमार्जन करतो तसेच शरीराच्या-मनाच्या स्वच्छतेसाठी दिनचर्या पाळणे आवश्यक आहे. सगळयात आधी  दिनचर्या म्हणजे काय आणि हे सर्व केल्याने काय फायदे होतात ते आपण समजून घेऊ.

  • सकाळी उठणे - सकाळी उठण्यासाठी ब्राह्म मुहूर्ताचा काळ प्रशस्त मानला आहे. या काळात वात दोष प्रबळ असतो त्यामुळे शौच- मलमूत्र विसर्जन सहज आणि योग्य होते. उठायला उशीर झाला किंवा रोज उठण्याचा वेळा वेगवेगळ्या असतील तर पोटाच्या/मलविसर्जनाच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात दिसतात. तसेच मल-मूत्र प्रवृत्ती कुठल्याही बाह्य साधनाशिवाय ( औषधे-गरम पाणी) व्हायला हवी. त्यामुळे सकाळी ४ ते ६ या काळातच आपली उठण्याची वेळ असावी.
  • दंतधावन विधी - दंतधावन म्हणजे दात घासणे. दात घासणे व मंजन याविषयी यापूर्वीच सविस्तर लेखन झालेले आहे. त्यामुळे विस्तार टाळण्यासाठी इथे पुन्हा ते सर्व सांगत नाही पण सारांशाने सांगायचे झाले तर दात घासण्याचे दातवण किंवा मंजन तिक्त, कटु किंवा कषाय रसात्मक असावे. दंतधावनाविषयी सविस्तर वाचण्यासाठी खालील लिंक वर दिलेला लेख वाचावा.


  • अंजन - त्यानंतर दोन्ही डोळ्यांत अंजन वापरावे. अंजन केल्याने डोळ्यांतील जास्तीचा कफ कमी होतो.

  • नस्य आणि गंडूष - नस्य म्हणजे दोन्ही नाकपुड्यांत औषधी तेलाचे थेंब टाकणे. आणि गंडुष म्हणजे औषधी काढे-तेलाच्या गुळण्या.यामुळे शरीरात साचलेला अतिरिक्त कफ कमी होतो. हे सगळे उपाय कफ कमी करण्यासाठी केले जातात कारण मस्तक आणि सर्व शिरस्थ अवयव कफप्रधान आहेत. त्यामुळे अतिरिक्त कफामुळे या अवयवांना होणारा त्रास कमी करण्यासाठी या कफाची शोधन करणे गरजेचे असते.

  • यानंतर करायचे कार्य म्हणजे स्नेहाभ्यंग अर्थात सर्वांगाला तेलाने मालिश करणे (विशेषतः डोक्याला, कानांना, पावलांना) . यासाठी कोमट केलेले तिळाचे, खोबरेल तेल अथवा आजारानुरुप औषधीसिद्ध तेल वापरले जाते.
           याचे लाभ - थकवा, वार्धक्य घालविणारे. डोळ्यांची ताकद वाढवणारे,पुष्टीदायी, आयुष्य देणारे, झोप शांत करणारे. मात्र अजीर्णाचा त्रास असणारे, आम विकाराने त्रस्त लोकांनी अभ्यंग टाळावे.
  • व्यायाम - तेलाने मालिश केल्यावर लवचिक झालेल्या शरीराला पिळदार बनवण्यासाठी त्यानंतर व्यायाम करावा. यामुळे व्यायाम करताना मांसपेशी जखडणे, उसण भरणे कमी होते. दररोज व्यायाम केल्याने शरीराची श्रम करण्याची क्षमता (स्टॅमिना हो…) वाढते. , अग्नि प्रदीप्त होतो, अतिरिक्त मेद कमी होतो आणि अवयव पिळदार बनतात.

  • स्नान - व्यायामानंतर शरीराला उटणे लावून कोमट पाण्याने स्नान करावे यामुळे शरीराला हलकेपणा येतो, मन प्रसन्न होते. मात्र केस धुण्यासाठी गरम पाण्याचा वापर करू नये.

  • ध्यान - स्नान केल्यानंतर ध्यानधारणा केल्याने मनावरील ताण कमी होतो व मन शांत होते, जे आपल्याला या दैनंदिन धकाधकीच्या जीवनात अत्यंत गरजेचे आहे. यानंतर आपल्या नित्याचे काम, व्यवसाय याला सुरुवात करावी.
                                                    ( क्रमशः)

टीप - पुढील लेखात आपण दिनाचर्येचा उर्वरित भाग म्हणजेच दुपारचे जेवण, रात्रीचे जेवण,  आहारातील पाण्याचे  पाण्याचे प्रमाण, निद्रा या उर्वरित भागाविषयी माहिती घेऊ.

Monday, 23 January 2017

....कंबर लचकली. (भाग १)






"अगं आई गं!!" हातातून खाली पडलेले पाकीट उचलून घेताना नीता एकदम विव्हळली. आधीच सकाळी निघायची धावपळ होती त्यात हा पाठदुखीचा त्रास हल्ली वारंवार होत असे तिला. 'आह से आहा तक'वाली मलमे, मालीश ,गरम-गार शेक  यासारख्या उपायांनी,जसे पूर्वी थोडे बरे वाटे, तेही हल्ली वाटत नसे. त्यात ऑफिसमध्ये ऑडिटची दगदग होतीच.पण आता निभतच नाही म्हटल्यावर एके दिवशी तिचा नवरा अनिल तिला बळजबरीने घेऊनच आला दवाखान्यात.
"डॉक्टर, जरा हिच्या कंबरेचं काहीतरी बघा आणि जरा हिचंही तुमच्या स्टाईलने 'प्रबोधन' करा. "
"अहो काहीतरीच काय बोलता, डॉक्टर यांचं    काssही ऐकू नका हो, पण खरंच या कंबरेचं मात्र नक्की काही तरी करा, अगदी वात आणलाय या दुखण्याने" - इति नीता.
मी - "अहो वात आणला नाही , वात वाढलाय असं म्हणा. नाहीतर कंबर दुखेल कशी?"
नीता - वात वाढला आहे??? म्हणजे काय?मुळात या कंबर दुखण्याचे कारण तरी काय?
मी - म्हणजे असं बघा,कंबरदुखी हे एक प्रकारचं दुखणं आहे ज्याला आयुर्वेदामध्ये कटिशूल असं म्हणतात. ही वेगवेगळ्या कारणांमुळे होते, त्यातील काही कारणे आपण पाहू.
१. रचनात्मक कारणे -
◆पाठीच्या मणक्याच्या विकृती - जसे की मणक्यांमधील गादी सरकणे, तिची झीज होणे अथवा गादीला इजा होणे.
◆पाठीचा मणका सरकणे.
◆मणक्यावर आघात होणे.
◆पाठीचे स्नायू - पेशी जखडणे, दुखणे.

२. पाठीची / मणक्याची ठेवण (Posture)
  • पोक काढणे
  • कुबड असणे
  • Lordosis - पाठीचा कणा बाहेरच्या बाजूस झुकणे (सुटलेले पोट, गर्भारपण यासारख्या अवस्थेत)
  • Scoliosis - पाठीचा कणा आतल्या बाजूला वळलेला असणे.
  • चुकीच्या पद्धतीने बसणे/झोपणे
  • मणक्याच्या जन्मजात विकृती
३. पोषक घटकांचा अभाव
  • व्हिटॅमिन B12 किंवा व्हिटॅमिन D3 ची कमतरता
  • Calcium चे अपुरे पोषण

४ . कर्करोग किंवा अर्बुद ( malignant or benign tumours)
५. इतर ठिकाणी असलेल्या त्रासामुळे होणारी कंबरदुखी
  • मूतखडा
  • Hydronephrosis मूत्रपिंडाच्या कटिरामध्ये लघवी जमून राहणे.
  • वृक्क विद्रधी Nephrotic abscess
  • यकृत विद्रधी Liver abscess
६. इतर करणे -
  • चिंता,ताणतणाव
  • मलबद्धता
  • इतर जंतुसंसर्ग

“अरे बापरे डॉक्टर, अहो एवढे सगळे आजार?? कंबरेचं दुखणं एवढं त्रासदायक असेल असं वाटलं नव्हतं. मला हो कोणता त्रास असेल आता? काही गंभीर तर नसेल ना?”

“अहो नीता ताई, ही सर्व कारणे सांगताना मी तुम्हाला एका विशिष्ट क्रमाने सांगितली आहेत. साधारणतः बऱ्याच लोकांमध्ये दिसून येणाऱ्या कारणांपासून सुरुवात करुन आपण दुर्मिळात दुर्मिळ कारणेसुद्धा पाहिली. त्यामुळे नुसती कारणे ऐकून घाबरण्यासारखे काहीच नाही. आणि कोणाची कंबरदुखी कोणत्या कारणांमुळे आहे हे आम्ही वैद्य रुग्णाची स्थिती , नाडी प्रत्यक्ष तपासून ठरवतो. फक्त वाचून किंवा तक्रार ऐकून हे ठरवणे चुकीचे आहे. त्यामुळे तुम्ही निश्चिन्त व्हा.”

“अच्छा , असेही असते का? बरं मग डॉक्टर, आता कसे करायचे?”
                                                   ( क्रमशः)
टीप - पुढील भागात वाचा कंबरेच्या दुखण्याचे निराकरण करण्याचे उपाय तसेच आयुर्वेदिक विचार.
चित्रसौजन्य : आंतरजाल.

Thursday, 27 October 2016

National Ayurveda Day.




                 Today is an auspicious day of Dhanatrayodashi. Many people worship wealth ie Dhan on this day. But very few know that it is originally a day of Lord Dhanwantari Jayanti. Lord Dhanwantari is deity of Ayurveda. Hence This day marks special importance as it just states value of outer prosperity but also signifies value of inner wealth ie health.
Dhanvantari is the form of Lord Vishnu, the protective aspect of divinity, who arose from the samudra manthana, the original churning of the cosmic ocean, as a gift of healing for all. Ayurvedic science which is developed by Lord Dhanwantari was then enriched and researched and further developed by various acharyas to form AyurvedaShastra. Hence By honouring Dhanvantari we can open ourselves to the power of healing within us. Accessing such inner blessings is more important than merely buying gold and silver.
                     This year Dhanatrayodashi has one more significant aspect as we will be celebrating first National Ayurveda Day. This highlights recognition to Ayurveda as an effective mode of life science and treatment. As Ayurvedic science has proved its eternal power and importance in daily challenges it is important to create awareness and also provide easy accessibility. By this we do not mean only medical tourism but also providing benefits of Ayurveda to grassroot level.
  • For this involvement of public health system is very important. There should be an ayurvedic OPD in all government hospitals and primary health centers
  • Ayurvedic medicines should be available here and should be prescribed by qualified ayurvedic doctor.
  • Raw material for medicines ie herbs need to cultivated scientifically and organic production needs to be encouraged
                      All these efforts are Herculean and require government administration. Hence acknowledgement and recognition in the form of National Ayurveda day can be considered as a first step towards revival of Indian science.

Emblem released on the occasion of first Ayurveda Day.

राष्ट्रीय आयुर्वेद दिनाच्या निमित्ताने...


।। श्री धन्वन्तरये नमः ।।


              सर्वप्रथम दीपावलीच्या आपणा सर्वाना हार्दिक शुभेच्छा. आज धनत्रयोदशी.सगळीकडे आजच्या दिवशी धनाची,संपत्तीची पूजा केली जाते.आम्ही आयुर्वेदिक वैद्यसुद्धा पूजा करतो पण ही पूजा असते,आरोग्यरूपी धनाची. कारण धनत्रयोदशी हा आयुर्वेदशास्त्राची देवता भगवान धन्वन्तरी यांची जयंती सुद्धा आहे.
                धन्वन्तरी हे भगवान विष्णूंचा अवतार मानला जातो.अमृतप्राप्तीसाठी जे समुद्रमंथन केले गेले त्यातून बाहेर आलेल्या चौदा रत्नांपैकी एक रत्न म्हणजे धन्वन्तरी. बहे उत्तम आयुर्वेदज्ञ होते. त्यांनी सुरु केलेल्या रोग्यचिकित्सेच्या कार्यात विविध आचार्य,ऋषी-मुनींनी आपापल्या अनुभव,ज्ञानाची भर घातली आणि विस्तृत आयुर्वेद शास्त्र निर्माण होत गेले. म्हणून धनत्रयोदशीच्या दिवशी आयुर्वेदाचे आदि आचार्य भगवान धन्वन्तरींचे पूजन  सर्व वैद्य मोठया उत्साहात करतात व यानिमित्ताने आयुर्वेदाशी संबंधित कार्यक्रम,चर्चासत्रे, रुग्णशिबिरे आयोजित केली जातात.
              यावर्षी धनत्रयोदशीचे महत्व खास आहे कारण आयुर्वेदाला मिळत असलेला राजाश्रय. आयुर्वेदाचे महत्व, कालातीत असणे व सध्याच्या जीवनात आयुर्वेदाची निकड हे लक्षात घेऊन भारत सरकारने ‘धनत्रयोदशी’ हा ‘राष्ट्रीय आयुर्वेद दिवस’ म्हणून साजरा करण्याचे ठरविले आहे. कोणी म्हणेल यात खास ते काय?योग दिवस तसा आयुर्वेद दिवस,झालं!! पण ते तसे तितके सहज नाही. आयुर्वेदाला सरकारी पातळीवर मान्यता मिळते आहे याचे हे दर्शक आहे. जागृती ,मान्यता आणि उपयोजन ( mass Awareness ,availability and acceptance) यासाठी हे महत्वाचे आहे. यामुळे आयुर्वेद प्रसाराला चालना मिळेल,आयुर्वेदाविषयी जास्तीत जास्त माहिती लोकांपर्यंत पोहोचावी यासाठी प्रयत्न होतील. असे म्हणताना फक्त परदेशी पर्यटक आणि मेडिकल टुरिझम एवढा संकुचित विचार अपेक्षित नसून भारताच्या तळागाळातील लोकांनाही त्यांच्या या आयुर्वेदाचे लाभ मिळणे अपेक्षित आहे.
  • यासाठी सार्वजनिक आरोग्यसेवेचा महत्वाचा वाटा आहे. सर्वच सरकारी रुग्णालये आणि प्राथमिक आरोग्य केंद्रे यामध्ये आयुर्वेदाची OPD व औषधे उपलब्ध असावीत,ती शिक्षित व पात्र आयुर्वेदिक वैद्यांकडून योग्य तपासणीनंतर दिली गेली तर सामान्यांना सहज,खात्रीशीर उपलब्ध होतील.
  • सामान्यांना दर्जेदार औषधे रास्त दरात मिळावी यासाठी आयुर्वेदिक फार्मसी असाव्यात
  • औषधांसाठी लागणारा कच्चा माल म्हणजेच औषधी वनस्पती मुबलक उपलब्ध व्हाव्यात यासाठी त्यांचे शास्त्रशुद्ध व सेंद्रिय उत्पादन घ्यावे लागेल. यासाठी प्रशिक्षण आवश्यक आहे.
                 हे सर्व उपाय म्हणजे आयुर्वेद तसेच इतर भारतीय शास्त्रे यांना पुनर्वैभव मिळवून देण्यासाठीचा सुरुवातीचा पाया म्हणता येईल. हे शिवधनुष्य पेलण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न होणे गरजेचे होते.ते यामुळे होईल अशी अशा करुयात.

राष्ट्रीय आयुर्वेद दिनाचे बोधचिन्ह 

Friday, 14 October 2016

नऊ रंग नवरात्राचे... स्रीशक्तीचे... आरोग्याचे.. भाग ६ समारोप


समारोप

               गेले दहा दिवस चालू असलेली लेखमाला आज संपुष्टात येत आहे. नवरात्रीच्या निमित्ताने मासिक पाळी सारख्या निषिद्ध मानल्या जाणाऱ्या विषयाला हात घातला याचे मुख्य कारण म्हणजे मासिक पाळीचे शक्तीस्वरूप तसेच तिचे आरोग्यविषयक महत्व.

                   आज मासिक पाळी आणि त्या अनुषंगाने स्त्रियांना आज जे दुय्यम स्थान स्थान आहे ते दूर करुन मासिक पाळीचे शरीरातील महत्व ,शास्त्रीय स्वरूप त्यामुळे स्त्रीला मिळणारी नवनिर्माणाची, सर्जनाची शक्ती याची जाणीव सर्वांनाच व्हावी आणि यापुढे मासिक पाळी हा अमंगल,लाजिरवाणा विषय ठरू नये यासाठीचा हा प्रयत्न छोटासा प्रयत्न होता.

                 यासाठीचे पहिले पाऊल म्हणजे जाणीवपूर्वक स्त्री-पुरुष असा मिश्र वाचकवर्ग असेल अशा मंचाची निवड केली.जेणेकरून पुरुषांनाही योग्य शास्त्रीय माहिती मिळेल व प्रत्येक पुरुषालासुद्धा स्त्रियांना होणारा त्रास समजू शकेल आणि स्त्रीच्या कोणत्याही रूपाबद्दल मग ती आई, बहीण, बायको,वहिनी,मुलगी,मैत्रीण ,कोणीही का असेना तिच्याबद्दल त्याच्या मनात आदरभाव असेल.यामुळे स्रीयांविषयीचा दृष्टिकोन सुधारला तर ते मोठे यश म्हणता येईल.

                 गेले दहा दिवस सर्वांचा उत्तम प्रतिसाद मिळाला.हजारापेक्षा जास्त लोकांनी हे लेख वाचले आणि प्रतिक्रियाही कळवल्या याबद्दल सर्वांचे आभार.यापुढेही विविध विषयांवर लेख प्रकाशित होत रहातील, त्यांनाही आपला असाच प्रतिसाद मिळावा.

धन्यवाद.

NAvaratri.. Celebration of woman power. Part 5


Understanding Menstrual Cycle - Part 5 (Menopause)



                   Menopause is defined as natural cessation of monthly menstrual bleeding. It is generally confirmed by absence of menstruation for at least 12 consecutive months. This usually happens at the age of 40 to 59 years and the variation depends on Prakruti, habitat, ,lifestyle, heredity, food habits, stress levels etc. Normal function of ovaries slows down which causes deficiency of ovarian hormones. Ayurvedic texts have described this stat as Vaatprakopa. Symptoms of which are as follow


  1. Cessation of menstruation naturally over 12 consecutive months
  2. Pain in lumbar region (lower back)
  3. Headaches
  4. Tired feeling without any particular reason
  5. Nausea
  6. Perspiration
  7. Occasional palpitations
  8. Irregularities with hunger ( loss of appetite, loss of taste, nausea)
  9. Pain in abdomen
  10. Hot flushes
  11. Tenderness in breasts
  12. Mood swings
  13. Feeling of grief
  14. Negative attitude
  15. Loss of confidence
  16. Stress
  17. vaginal dryness and itching (due to cessation of secretions from glands in vagina)
  18. Experience of discomfort or pain during intercourse
  19. Loss of libido
  20. Loss of muscular tone of urinary bladder which leads to leakage of urine during coughing , sneezing
  21. Urge of frequent micturation. (To pass urine)
  22. Weight gain

               One or multiple of these symptoms may be experienced and their severity depends on factors like prakruti, lifestyle etc as mentioned earlier. One should not ignore these symptoms and start corrective measures as early as possible.. Ayurveda has described this phase as a Pitta-Vaat dominant hencevwe need to start a treatment which pacifies Pitta-Vaat.

  1. regular exercise is a must. Moderate light  exercise is required to keep body fit  and flexible.
  2. workout should be followed by Oil massage and type of oil should be chosen by specific prakruti
  3. Pranayama and meditation is important for a peaceful mind
  4. If anyone is still feeling any negativity or grieving thoughts then she can try to learn some creative forms or hobbies or social work to keep mind occupied.
  5. ‘Empty Nest Syndrome’ is term used for parents who has lost urge of living after their children have left home in search of new horizons. They feel that there no aim for their living. Such people must know that aim of life is to live it fully and it must depend on your innerself.
  6. If anyone is still feeling any form of depression then she can seek help of a counselor or medication.
  7. Family support is very important during this transition. Women should talk freely with her husband, children, in laws and even grandchildren. family members should also be supportive. Proper communication is the key to all hurdles
  8. Need of medication - menopausal symptoms can usually be managed by above mentioned advises but if thses symptoms are severe or if There are other symptoms like irregular bleeding, blood clots , breast tenderness or feeling of lump in breasts or mental depression, then it calls for medical advice.
  9. Ayurvedic treatment for menopause involves counseling, panchkarma and medicines for severe cases.
                 It is very important to listen to these body signals and act according to our bodily needs. Menopause is not a disease, it is just a transitory phase so ladies wipe off that gloomy face and get ready to embark upon the second inning of your life. After all life is too short to grieve.
                                                     (The End)

Thursday, 13 October 2016

नऊ रंग नवरात्राचे... स्रीशक्तीचे... आरोग्याचे... लेखमाला भाग ५


महिन्यातील “ते” दिवस लेखमाला - भाग ५वा



              पन्नाशी जवळ आली की बायकांना जरा धाकधूक वाटू लागते.वयात आल्यापासून दर महिन्याला सोबत करणारी “ती” सखी हळूहळू दुरावत असते ना.. खरं तर दर महिन्याला “ती” येणार म्हटलं की सणवार,पाहुणे-रावळे यांच्या आणि “हिच्या” तारखा तपासताना “कधी बरं जाणार ही कायमची” हा विचार प्रत्येकीच्या मनात कधी ना कधी डोकावलेला असतोच पण आता ती खरंच जाणार म्हटल्यावर तिचे फायदे-तोटे, इतरांचे अनुभव ऐकून बायकांना जरा धस्स होतंच.
आता गेले काही दिवस ही लेखमाला वाचणाऱ्यांना “तिची” वेगळी ओळख करून द्यायला नकोच. “ती” म्हणजे ‘असून अडचण , नसून खोळंबा ‘ अशी मासिक पाळी आणि आजचा आपला विषय आहे “रजोनिवृत्ती” म्हणजेच Menopause.
                 रजोनिवृत्ती म्हणजे मासिक पाळी नैसर्गिकरित्या बंद होणे.हे सामान्यतः वयाच्या ४०-५० वर्षांपर्यंत घडून येते. रजोनिवृत्तीच्या वयावरसुद्धा प्रकृती, देश,काळ,जीवनपद्धती, अनुवंशिकता तसेच ताण-तणाव यांचा प्रभाव असतोच.या काळात Ovaries चे कार्य थांबलेले असते व संप्रेरकांचा अभाव होतो.आयुर्वेदानुसार ही स्थिती वातप्रकोपामुळे होते.रजोनिवृत्तीची लक्षणे पुढीलप्रमाणे,

  1. मासिक पाळी पूर्णपणे थांबणे (या वयात सलग १२ महिने पाळी न आल्यास रजोनिवृत्ती सुरु झाली असे मानले जाते.)
  2. कंबर दुखणे
  3. डोकेदुखी
  4. कोणत्याही कारणाशिवाय थकवा जाणवणे
  5. मळमळल्याची भावना
  6. अचानक अंगाला घाम फुटणे
  7. Hot flushes
  8. भुकेच्या तक्रारी जसे की अन्नावर वासना नसणे, भूक कमी होणे,चव न जाणवणे
  9. उदरप्रदेशी वेदना
  10. स्तनप्रदेशी वेदना
  11. भावनाप्रधानता
  12. नैराश्य, दुःख जास्त जाणवणे
  13. नकारात्मक विचार मनात येणे
  14. ताण-तणाव
  15. वजन वाढणे
  16. योनीप्रदेशी शुष्कता (योनीप्रदेशी असलेल्या ग्रंथींद्वारे होणारा स्राव थांबल्यामुळे)
  17. त्यामुळे लैंगिक संबंधाची इच्छा नसणे, समागमाच्या वेळी वेदना होणे
  18. स्नायूंना शैथिल्य आल्यामुळे मूत्राशयाला शैथिल्य
  19. त्यामुळे खोकताना किंवा शिंकताना लघवी होणे किंवा वारंवार लघवीला यावेसे वाटणे
             यापैकी एक किंवा अधिक त्रास जाणवू लागतात.यांची तीव्रता ही पूर्वी सांगितल्याप्रमाणे व्यक्तिसापेक्ष असते.
            अशा वेळी या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता वेळीच उपाय केल्यास रजोनिवृत्तीचा काळ सुसह्य होतो. या काळात पित्त-वात दोषाचे प्राबल्य असते त्यामुळे चिकित्सासुद्धा पित्त-वाताचीच असते.

  1. रोज हलक्या स्वरुपाचा व्यायाम करावा.ज्यामुळे शरीर लवचिक व काटक राहण्यास मदत होते.
  2. व्यायामानंतर वातशमनासाठी तेलाने मालिश करावे.(हे तेल प्रकृतीसापेक्ष वेगवेगळे वापरले जाते.)
  3. प्राणायाम आणि ध्यानधारणेचा अभ्यास करावा म्हणजे मनःशांती मिळते.
  4. तरीही मानसिक दैन्य,निराशा नकारात्मक विचार मनात येत असल्यास मनाला आवडतील असे छंद जोपासावे, सामाजिक कार्यात गुंतवून घ्यावे.
  5. तरीही ताण-तणाव जाणवत असतील तर समुपदेशकाची मदत घेता येईल.
  6. मानसिक त्रास टाळण्यासाठी सर्वात मोठी भूमिका कुटुंबाचे सदस्य बजावतात. त्यामुळे पती-मुले-सुना-जावई-नातवंडे या सर्वांशी मोकळेपणे आपल्या त्रासांबद्दल बोलावे व सदस्यांनीसुद्धा बाऊ न करता आपल्या घरातील कर्त्या स्त्रीला समजून घ्यावे व या स्थित्यंतरातून यशस्वीपणे जाताना त्यांना त्यांचा वेळ द्यावा,मदत करावी
  7. वैद्यकीय सल्ला -  रजोनिवृत्तीची लक्षणे तशी सौम्य स्वरुपाची असतात मात्र स्तनांमध्ये गाठ/वेदना, रक्ताच्या गुठळ्या होणे, अकस्मात रक्तस्राव,अचानक अतिप्रमाणात घाम येणे किंवा तीव्र स्वरुपाचे मानसिक नैराश्य अशी काही लक्षणे दिसल्यास तातडीने वैद्यकीय सल्ला घ्यावा.
  8. आयुर्वेदिक चिकित्सेमध्ये समुपदेशन, पंचकर्म आणि तीव्र स्वरूपाच्या लक्षणांची औषधी चिकित्सा केली जाते.
               त्यामुळे स्त्रियांनी आणि त्यांच्या घरच्यांनीसुद्धा हे समजून घ्यावे  की रजोनिवृत्ती हा कोणताही आजार नसून एक नैसर्गिक अवस्था आहे आणि शरीराच्या या संकेतांना वेळीच समजून त्यानुसार उपाययोजना केल्या तर आयुष्याच्या या शिशिर ऋतूतही पानगळीऐवजी वसंताची पालवी अनुभवास येईल.
                                                      (  समाप्त)