- पहिला स्पर्श व स्तनपान - प्रसूतिनंतर बाळ रडले व श्वासोच्छवास नीट सुरु झाला की लगेचच बाळाला स्वच्छ,मऊ कापडाने कोरडे करून आईजवळ स्तनपानासाठी द्यावे.
- पहिल्या तीन दिवासांमध्ये स्तनांतून पिवळसर ,जाड चिक,ज्याला कोलोस्ट्रम असे म्हणतात, तो स्रवत असतो. हे दूध प्रमाणाने कमी असले तरी पोषणमूल्याने अधिक संपृक्त असते.( Nutrients are in concentrated form in low volume). तसेच हे दूध थोडे सारक असते ज्यामुळे बाळाला शी करणे (passing meconium) सुलभ होते.ज्यामुळे अधिकचे बिलीरुबिन,लाल रक्तपेशींचे टाकावू घटक यांचा निचरा होतो व बाळाला कावीळ होण्याची शक्यता कमी होते. तसेच कोलोस्ट्रममध्ये नैसर्गिक प्रतिकारशक्ति निर्माण करणारे घटक (IgM, IgG, IgA antibodies) असतात ज्यामुळे बाळाची प्रतिकारशक्ति नैसर्गिकरित्या विकसित होण्यास मदत होते.
Dr.Snigdha's Samanwaya Ayurvedic and Panchakarma clinc Kulupwadi,Near National park,Borivali East, Mumbai - 400066. Kindly email/Inbox your name and contact information to consult with us.
Wednesday, 2 August 2017
‘प्रेमस्वरूप आई…. वात्सल्यरूप आई..’ भाग १
Sunday, 23 July 2017
रिमझिम गिरे सावन…….. ( वर्षा ऋतुचर्या )
- घर-ऑफिस स्वच्छ व कोरडे असेल याकडे लक्ष ठेवावे. जेणेकरून बुरशीची वाढ होणार नाही.
- घरात संध्याकाळी धूप करावा, धूपनाने सूर्यास्तानंतर घरात येणारे किटक दूर होण्यास मदत होते.
- बाहेर असताना पावसात भिजणे टाळावे,नेहमी छत्री, रेनकोट जवळ ठेवावे.
- गळ्याचा - छातीचा भाग , जॅकेट-स्कार्फने झाकून घ्यावा.
- भिजल्यास लगेचच अंग विशेषतः डोके कोरडे करावे व शक्य असल्यास स्वच्छ व कोरडे कपडे घालावे.
- पावसाळ्यासाठी बंद तोंडाचे बूट वापरावे. चिखल व साचलेल्या पाण्यातून चालू नये. यामुळे किटक दंश,उंदीर चावणे तसेच Leptospirosis यासारखे आजार टाळता येतात.
- कपडे व अंतर्वस्त्रे कोरडी वापरावीत. दमट कपडयांमुळे बुरशीचा प्रादुर्भाव होऊन त्वचाविकार,गुप्तांगांमध्ये खाज-चट्टे उठणे असे त्रास होऊ शकतात.
- केस ओले-अस्वच्छ राहिले किंवा ओल्या केसांना तेल लावले गेले तर कोंडा, फोड, पुटकुळ्या होऊ शकतात.
- सकाळी उठल्यावर गरम पाण्याने गुळण्या कराव्यात.
- व्यायाम हलक्या स्वरूपाचा असावा.
- वातशामक तेलाने अभ्यंग (मसाज) करून मग कोमट पाण्याने आंघोळ करावी.
- दिवसा झोप व रात्री जागरण टाळावे.नाहीतर वात-पित्ताचे त्रास वाढतात.
- पावसाळ्यात भाज्यांची कमतरता व चमचमीत पदार्थांची आवड यामुळे पापड, भरलेल्या मिरच्या-सांडगे, लोणची असे साठवणिचे पदार्थ बाहेर येतात.मांसाहारी घरामध्ये सुके मांस,सुके मासे यांचा वापर वाढतो.
- पण सुकवलेले पदार्थ पचायला जड असतात तसेच टिकवण्यासाठी त्यामध्ये जास्त प्रमाणात मीठ, तेल अथवा मसाले वापरतात. त्यामुळे या सर्व पदार्थांचा वापर जपूनच करावा.
- जेवणात आंबट-खारट चवींचे पदार्थ कमी वापरावे. रुचिकर म्हणून सैंधव, आले लिम्बू यांचा मर्यादित वापर करावा.
- चण्याची डाळ, बेसन याऐवजी मूग डाळ, मूग डाळीचे पीठ,मसूर डाळीचे पीठ वापरावे.
- धान्य शक्यतो जुने वापरावे किंवा नवीन असल्यास भाजून घ्यावे.
- आंबवलेले किंवा दही मिसळून शिजवलेले पदार्थ (इडली,उत्तप्पा, मेदूवडा, ब्रेड,ढोकळा) खाऊ नये. नाइलाजाने खायचे झाल्यास नीट भाजलेला टोस्ट,डोसा खावा)
- कच्चे सलाड, फ्रूट प्लेट खाऊ नये.सलाड खायचे झाल्यास थोडे वाफवून खावे.
- दूध पिताना एक कप दूधासाठी पाव चमचा सूंठ घालून उकळून प्यावे.
- पचन, अग्नि दीपन यासाठी ताक उत्तम आहे त्यामुळे ते शक्यतो दुपारी जेवणानंतर जीरे-सैंधव घालून प्यावे.
- हल्ली फिटनेसबद्दल गैरसमजापोटी लोणी-तूप टाळले जाते.मात्र पावसाळ्यात घरगुती लोणी-तूप आवर्जून वापरावे. (मात्र हे लोणी-तूप तळणासाठी न वापरता पोळी-चपाती-थालीपीठ-पराठे यावर लावून,वरण-भातावार असे कच्च्या स्वरुपात खावे.)
- शिळे अन्न खाऊ नये.
- भूक मंदावलेली असेल तर हलका, द्रव स्वरुपाचा आहार घ्यावा. (Ref. कुळीथाचे कढण http://samanwayhealth.blogspot.com/2015/07/blog-post_1.html?m=1, मांसरस http://samanwayhealth.blogspot.com/2015/07/blog-post_16.html?m=1 )
- पाणी नेहमी उकळलेले व कोमटच प्यावे.
- इतर पथ्य-अपथ्य पदार्थांचा तक्ता खाली सविस्तर दिला आहे. तो नीट वाचावा व काही शंका असल्यास कमेन्ट/मेसेज बॉक्स मध्ये निःसंकोच विचारु शकता.
- पावसाळ्यात वात प्रकोप झालेला असतो.त्यामुळे गुडघेदुखी,कंबर दूखणे, सायटिका,टाचा दूखणे, पायात गोळे येणे, यूरिक एसिड वाढून होणारा gout सारखा आजार असे वातविकार मोठ्या प्रमाणात दिसतात.अश्या आजारांसाठी बस्ति चिकित्सा अतिशय उत्तम आहे.
- पोटात गुबारा धरणे, वारंवार गॅसेस होणे,बद्धकोष्ठता यासारख्या आजारांवर सुद्धा बस्तिकर्म हा उत्तम उपाय आहे.
- जेव्हा आजाराची लक्षणे अधिक तीव्र असतात किंवा आजार जुनाट असतो किंवा औषधे थांबवली की त्रास परत उफाळून येत असेल अश्या वेळी वैद्य सखोल आणि विस्तृत तपासणी करून बस्ति कर्म करतात.
पथ्य
|
अपथ्य
| |
धान्य
|
तांदूळ,ज्वारी,बाजारी, नाचणी, जव, गहू(मर्यादित प्रमाणात)
|
मैदा-मैद्याचे पदार्थ,वरी तांदूळ,नवीन धान्य
|
डाळी
|
मूग,मसूर, कुळीथ(कढण/पिठले)
|
तूर, वाल,चणे, छोले,राजमा, वाटाणे
|
भाज्या/फळभाज्या
|
दूधी भोपळा,शिराळी, घोसाळी, पडवळ,भेंडी,सुरण
|
पालेभाज्या, कारली, गवार,बटाटा
|
फळे
|
अननस, पपई, डाळींब,करवंद, आंबा(मर्यादित)
|
फणस,ताडगोळे,काकड़ी, कवठ, खरबूज, टरबूज, केळी,
|
दूध व दुग्धजन्य पदार्थ
|
दूध(सुंठ/हळद सिद्ध), तूप, लोणी(टेबल बटर नव्हे), ताक.
|
दही,लस्सी,पनीर,चीज़, कंडेंसड मिल्क
|
मांसाहार
|
गावठी कोंबडा, गावठी कोंबडीची अंडी, छोटे मासे
|
सुके मांस,सुके मासे, मटण, मोठे मासे
|
गोड पदार्थ
|
मध,गुळ, खडीसाखर
|
पांढरी साखर, माव्याची मिठाई
|
मसाले
|
आले, लसूण, मिरे, जीरे,धने, लाल तिखट
|
मोहरी,हिरवी मिरची
|
आंबट पदार्थ
|
कोकम, लिम्बू
|
चिंच, कैरी,आमचूर,आंबवलेले सॉस , टॉमेटो(मर्यादित)
|
इतर
|
लाहया - ज्वारी,तांदूळ, राजगिरा, मका(पॉप कॉर्न्स)
|
तळलेले ,शिळे पदार्थ, जळजळ निर्माण करणारे असे , आंबट पदार्थ
|
Monday, 24 April 2017
आला उन्हाळा… आरोग्य सांभाळा…
पदार्थ | पथ्य | अपथ्य |
तृणधान्य | गहू,तांदूळ,ज्वारी | मका,बाजरी,नाचणी |
डाळी | मूग,मसूर | चणा,तूर, उडीद मर्यादित खावे. |
कडधान्य | मूग,मटकी,मसूर | वाल, वाटणे, हरभरे, कुळीथ,राजमा,छोले |
फळभाज्या-शेंगा | पडवळ,दोडकी,शिराळे,रताळे, सुरण, दुधी भोपळा, लाल भोपळा,वांगी, फरसबी ,शेवगा | कारली, गवार, नवलकोल, कॉलीफ्लॉवर, कोबी , सिमला मिरची |
पालेभाज्या | पालक, शेवगा, तांदूळजा, लालमाठ, | मेथी,शेपू |
फळे | आवळे,द्राक्षे(बी असलेली),डाळिंब,आंबा,कैरी,केळी, संत्री,मोसंबी,काकडी,कोकम,लिंबू, ऊस,शहाळे,नारळ,खरबूज,कोहळा,कलिंगड,खजूर,मनुका | फणस,जांभूळ,कवठ,काजू |
दूध व दुधाचे पदार्थ | दूध,तूप,लोणी | ताक(मर्यादित प्रमाणात ), दही, कढी |
मांस वर्ग | शेळी,कोंबडा,बदक | सुके मांस, मासे, पोर्क |
मसाले | लवंग,वेलची,धणे,जीरे, दालचिनी, लाल तिखट. | हिंग,ओवा,लसूण, हिरवी मिरची, मोहरी |
Monday, 17 April 2017
देह देवाचे मंदिर - भाग २
- न्याहारीची वेळ साधारण सकाळी ८.३० ते ९.३०ची असावी.
- न्याहारीचे पदार्थ पोटभरीचे, मात्र तडस निर्माण करणारे नसावे.
- दिवसाची सुरुवात आईस क्रीम, चॉकोलेट,मिठाई यासारखे अतिगोड किंवा समोसे, ढोकळा यासारखे अति तिखट,तेलकट किंवा तळलेले नसावे.
- न्याहारी करताना घरी शिजवलेल्या पदार्थांचाच आग्रह मी धरते.
- न्याहारीचे पदार्थ - न्याहारी म्हटले की बऱ्याच घरांमध्ये दिवसाची सुरुवात म्हणजे कॉर्नफ्लेक्स, मुसेली, ब्रेड-बटर, च्यवनप्राश(??? एक मोठ्ठा चमचा हो..) आणि त्याबरोबर उंच मग भरुन चहा-कॉफी किंवा मग उंच ग्लास भरुन दूध अथवा ज्यूस (It's healthy,u know?) अशी होत आहे. पण खरंच हा असा नाश्ता गरजेचा असतो का? तर नाही.
- नाश्त्यासाठी सहज पचणारे,हलके,पोटभरीचे पदार्थ हवेत.
- आपले पारंपरिक पदार्थ या सर्व निकषांत अगदी उत्तम बसतात.त्यामुळे या पदार्थांचा जरूर विचार करावा.
- पोहे, सांजा,शिरा,लापशी,दलिया उपमा,शेवया उपमा हे सर्व पदार्थ out dated, बोअरिंग नसून आवश्यक आहेत हे समजून घेणे गरजेचे आहे.
- हा काळ पित्त दोष प्राबल्याचा असतो त्यामुळे पचन सुधारते.
- मग संध्याकाळी आवश्यकता वाटली तर पचायला हलके पदार्थ ,दूध, लाडू,चिक्की खाता येईल.
- कारण संध्याकाळच्या जेवणाची आदर्श वेळ आहे ०६.३० ते ०८.३० (म्हणजेच ०८.३०वाजण्याच्या आत जेवण झालेच पाहिजे). यामागचे कारण असे की सूर्यास्तानंतर आपल्या शरीराचे व्यापार हळूहळू मंदावू लागतात. त्यामुळे खाल्लेल्या अन्नाचे पचन नीट होत नाही त्यामुळे प्रत्येकाने आपापला दिनक्रम लक्षात घेऊन जेवणाची वेळ लवकर कशी करता येईल त्याकडे लक्ष द्यावे.
- रात्रीचे जेवण दुपारच्या जेवणाच्या अर्ध्या प्रमाणात असावे.
- रात्रीचे जेवण झाल्यानंतर साधारणतः २ ते ३ तासांनी झोपेची वेळ हवी. मात्र झोपेच्या आधी दूरचित्रवाणी(मराठीत टीव्ही),स्मार्टफोन,टॅबलेट या आणि यासारख्या इतर साधनांचा वापर टाळावा. मालिकांमधील नाट्य,पार्श्वसंगीत,तसेच स्क्रीनचा तेजस्वीपणा यामुळे मेंदू व चेतासंस्था उत्तेजित होतात.याउलट त्या क्षणी आपल्या शरीराला विश्रांतीची गरज असते.
- झोप शरीराला अत्यावश्यक असते, व ती योग्य त्या प्रमाणात मिळाली तरच शरीर व्यापार उदा. उत्साह,संप्रेरकांचे,पाचक स्रावांचे स्रवण, भूक, मलमूत्रादि वेगांचे उत्सर्जन व्यवस्थित होते.
- किती - रोज साधारण ६-८ तास झोप आवश्यक आहे,मात्र ८ तास झोपायचे म्हणून रात्री १-२ वाजता झोपून सकाळी ८-१० वाजता उठणे चुकीचेच आहे.
- नाईलाजाने जागरण झाल्यास किंवा रात्रपाळी करणाऱ्यांनी रात्री जेवढी झोप कमी पडते त्याच्या निम्मीच झोप दिवसा घ्यावी.
- दिवसा झोप फक्त ग्रीष्म ऋतूतच घ्यावी,तीसुद्धा उपरोक्त सांगितल्याप्रमाणे मर्यादित प्रमाणात. एरवी लहान मुले,आजारी माणसे यांनाच दिवसा झोप घेणे शास्त्र संमत आहे.
- अवेळी झोपणं, रात्री जागरण करणे, दुपारी झोपणे, या मुळे अनेक आजार उत्पन्न होतात.
- अकाल शयन - अवेळी झोपल्यामुळे मोह, ताप, डोकं दुखणे, शरीर जखड्ल्या सारखे वाटणे,अपचन,अम्लपित्त, वारंवार सर्दी, डोकेदुखी, दिवसभर आळस येणे, भूक मंदावणे यासारखे आजार होतात. आणि यातल्या बऱ्याच आजारांचे मूळ कारण चुकीची झोप आहे हे आपल्याला जाणवतही नाही.
- त्यामुळे शांत व सलग झोप लागावी यासाठी शयनगृहातील दिवे मंद असावेत. रात्री खोलीत संपूर्ण काळोख असावा. बाहेरून येणारा उजेड टाळण्यासाठी जाड पडदे वापरावे.
- शांत झोप लागावी यासाठी पावलांना गायीचे तूप लावून काशाच्या वाटीने मालिश करावे.पादाभ्यंग केल्याने दृष्टी सुधारते व झोप शांत लागते.
http://samanwayhealth.blogspot.in/2017/03/blog-post.html?m=1
(कृपया हे लेखन लेखिकेच्या नावासकट पोस्ट अथवा शेअर करावी.तुमच्या या नैतिक कृतीने लेखनासाठी काढलेला वेळ आणि वापरलेली बुद्धी सत्कारणी लागल्याचे समाधान मिळते.धन्यवाद. )
Monday, 10 April 2017
Depression... Let's talk.
- Loss of energy
- Change in appetite. (Either increase or Loss of appetite)
- Change i sleep patterns (reduced or aggravated)
- Mood swings and anxiety
- Loss of concentration
- Indecisiveness
- Feeling of worthlessness,guilt or helplessness
- Thoughts of self harm or even suicide.
- Depression affects people of all ages-class, from all walks of life and in all countries. Nowadays life has become very fast and competitive. This hustle and competitiveness are taking its toll on our life. As a result of this, number of people suffering from depression and/or anxiety has been increased by nearly 50% during past decades. Currently almost 10% of the population is affected by either or both of the conditions.
- Financial worries, unemployment, death or illness of dear ones, own illness, professional failures, competitive and demanding nature of academics or profession can cause depression.
- Also cases of depression during pregnancy or Post partum depression(ie after delivery up to two years) are increasing nowadays.
- failure in relationships - break up or divorces
- alcoholism or drug addiction
- Also older adults (over 60s)
- Depression causes mental anguish. persistent feeling of sadness affects person’s routine. He/she may not wish doing everyday chores or even enjoy their favorite things.
- This affects their work
- It sometimes also has negative impact on their relationships with friends and family members as well.
- Depression during pregnancy or post partum (after delivery upto two years) can affect development of foetus or newborns.
- Depression may also lead to development of type 2 diabetes or cardiovascular disorders also these diseases may also be a cause of depression.
- Depression can be treated easily and effectively. But for that we need to clear out all the misconceptions and overcome the stigma associated with depression.
- This will help people from coming out of shadow and seek treatment.
- Most often treatment involves counselling and medical treatment, depending on the severity.
- Counselling is the first step. A person suffering from any of the symptoms should make it known. It could be anyone,your friend-family-relative. Anyone who can understand and is trustworthy. Talking to people you trust can be a first step towards recovery. Mild depression can be treated by such informal counselling.
- If needed, one should seek professional help. A Good counselor can understand your problems and help you to deal with it.
- Moderate to severe cases may also need combination therapy of counselling and antidepressants.
- Always make advance planning for your stress
- And prepare your mind and body for unexpected stressful situations. Meditation has proven helpful in such situations.
- indulging into some hobbies and cultivating interests can help to take mind off difficult situations.
- Also even if you are not suffering from depression but if you see someone from your family, friends or colleagues are suffering from, please make your that you offer a support. Cause sometimes it is just a helping hand that does the trick.



