नवरंग , नवरात्राचे…… स्त्रीशक्तीचे आणि आरोग्याचे (भाग २)
4. संधिवात - पूर्वी साठीच्या वयात दिसणारा संधिवाताचा आजार हल्ली चोरपावलांनी चाळीशीच्या आसपास दिसू लागला आहे.वाढणारे वय,कामाची दगदग,व्यायामाचा अभाव,अपुरे पोषण यामुळे वात दोष वाढतो व शरीरातील सांध्यांची झीज होते.
वेदनाशामक (painkillers) च्या गोळ्या किंवा मलम,Calcium च्या गोळ्या खाणे हे तात्पुरते ठरते मात्र हा कायम स्वरूपी इलाज नाही.शेवटी Knee Replacementसाठी अस्थिरोगविशारदाची (Orthopedic Surgeonची पायरी चढावी लागते.
त्याऐवजी आहारात दूध,बदाम,नाचणी,तीळ,हिरव्या पालेभाज्य असाव्यात.वजनावर ताबा ठेवावा.आवश्यकता असल्यास वैद्यांच्या सल्ल्याने स्नेहन-स्वेदन,बस्तिक्रमासारखे उपाय करता येतील. Menopause च्या नंतर वातशामक आहार-विहार आणि औषधे वापरता येतील .
5. अंगावरून पांढरे जाणे(Leucorrhea) -
या आजाराची बऱ्याचदा लज्जेस्तव चर्चा केली जात नाही.पण याचे गांभीर्य खूप जास्त आहे. अंगावरून पांढरे-पिवळे पाणी किंवा घट्ट स्त्राव जात असेल,योनिमार्गात घाण वास, खाज किंवा पुरळ येत असेल तर वैद्यांचा सल्ला घ्यावा. स्त्री विवाहित असेल तर पति-पत्नी दोघांनाही औषध घेण्याची गरज असते.
तसेच योनीमार्ग आणि जननांगे स्वच्छ ठेवावी. अन्तर्वस्त्रे स्वच्छ,फिक्या रंगाची,सुति आणि पूर्णपणे सुकलेली असावीत.अतिघट्ट किंवा दमट वस्त्रे हा त्रास वाढण्यास कारणीभूत असतात.
6. व्यायाम - नियमित व्यायाम करणे हे अत्यावश्यक आहे.व्यायामामुळे शरीर लवाचिक बनते.उत्साह वाढतो.त्यामुळे शरीर आणि मनाचीसुद्धा ताण सहन करण्याची ताकद वाढते.
व्यायाम करण्यासाठी सकाळी चालायला जाणे , Warm -Up ,योगासने ,Cardio Exercise यांचा क्षमतेनुसार वापर करावा
(क्रमशः )
(क्रमशः )
No comments:
Post a Comment