- ब्रेस्ट क्रॉल - प्रसूती झाल्यावर बाळ रडले व श्वासोच्छवास सुरू नीट सुरु झाला की लगेच बाळाला कोरडे करावे. आणि साधारणतः आई प्रसूतीनंतर आडव्या स्थितीत असते अश्या स्थितीत आईच्या पोटावर दोघांचा एकमेकांना पूर्ण स्पर्श होईल अश्या रीतीने बाळाला उपडे ठेवावे.या अवस्थेत बाळाचे डोके आईच्या स्तनांमध्ये येते . आईने हलकेच बाळाला पकडावे , बाळाचे नाक दाबले जात नाही ना याची काळजी घ्यावी . बाळाला टोपी घालावी , आई-बाळाला एकत्रित पांघरूण घालावे म्हणजे बाळ उबदार राहील व आई-बाळाचा एकत्रित स्पर्श होत राहील. असे ठेवल्यावर जवळ जवळ सर्वच बाळे आपणहून स्तनाकडे सरकतात व स्वतःहून स्तनपानाची सुरुवात करतात. यालाच ब्रेस्ट क्रॉल असे म्हणतात. या पद्धतीने साधारणतः अर्ध्या तासाच्या आत स्तनपानास सुरुवात होते . ब्रेस्ट क्रॉल ही पद्धत बाळाच्या शारीरिक व मानसिक विकासासाठी लाभदायक ठरते.
- आई आजारी असल्यास - नेहमीचा साधा आजार असल्यास डॉक्टरी सल्ल्याने स्तनपानास अडथळा न आणणारी औषधे घेऊन स्तनपान करता येईल.
मात्र HIV संक्रमित किंवा अंमली पदार्थच्या व्यसनाधीन मातेचे दूध बाळाला देऊ नये.
किमोथेरपि किंवा रेडिएशन थेरपी चालू असल्यास बाळाला स्तनपान करू नये.
TB चे संक्रमण असल्यास सुद्धा डॉक्टरी सल्ला घ्यावा..
- बाळ आजारी असल्यास - या उलट बाळ आजारी असल्यास त्याची पचनशक्ती मंदावते अशा वेळी त्याला बाहेरचे अन्न पचायला जाड जाते. त्यामुळे आजारी बाळाला जरूर स्तनपान करावे. नियमित स्तनपान केल्यास बाळाला नवजात कावीळ (physiological jaundice ) होत नाही अथवा झाल्यास ती लवकर बरी होण्यास मदत होते.
- भेगाळलेली स्तनाग्रे असल्यास बाळाला दूध पाजताना मातेला वेदना होतात त्यामुळे स्तनपानाच्या अडथळा होऊ शकतो अशा वेळी स्तनाग्रांना इतर कोणतेही क्रीम न लावता स्तन्यच लावावे , तसेच पाजताना खूप वेदना होत असल्यास स्तन्य काढून पाजावे व लवकरात लवकर भेगा भरून येतील असे पाहावे.
- दाटलेले स्तन - वेळीच स्तन्याचा निचरा , बाळास दूध पाजणे किंवा काढुन ठेवणे , न झाल्यास आईच्या स्तनांत दूध दाटते. जर त्यावर वेळीच उपचार नाही केले तर संसर्ग होऊन ताप येऊ शकतो त्यामुळे शक्यतो दूध दाटणार नाही असे पाहावे व तसे झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
- बाळाला पुरेसेस दूध मिळते कि नाही हे पाहण्याचे निकष म्हणजे बाळाची शी , शू व वजन.
शी - जन्मल्यानंतर बाळाला २४ तासांत पहिली शी होते त्यांनतर ते रोज कधी कधी दिवसांतून २-३ वेळा अथवा दार स्तनपानानंतरही शी करू शकते तसेच याउलट काही बाळे २-३ दिवसांतून एकदा सुद्धा शी करतात. हे सर्व सामान्य आहे
शू - बाळास जन्मानंतर ४८ तासांच्या आत पहिली लघवी होते. व पूर्णपणे स्तनपानावर अवलंबून असलेले बालदिवसभरात कमीत कमी ६-७ वेळा लघवी करते .
वजन - शी व शू याबरोबर पहिला जाणारा महत्वाचा निकष म्हणजे वजन . पहिल्या ५-७ दिवसांत बाळाचे वजन जन्माच्या वेळेच्या वजनापेक्षा ५-१०% नी कमी होऊ शकते. त्यांनतर साधारणतः दररोज सुमारे २० ग्रॅम म्हणजे महिन्याला ५००ग ग्रॅम वजन वाढते . पहिल्या ५ महिन्यांत बाळाचे वजन हे जन्माच्या वेळेच्या दुप्पट आणि पहिल्या वाढदिवसापर्यंत ते तिप्पट होते. अर्थात थोडा फेरफार असू शकतो.
तर संपूर्ण आठवडाभर चाललेल्या या लेखमालिकेत आपण स्तनपान या विषयाबद्दल आवश्यक ती माहिती व स्तनपानाचे महत्त्व जाणून घेतले. स्तनपान हा बाळाचा मूलभूत हक्क आहे , ती बाळाची गरज आहे त्यामुळे घरातील सर्वांनी याचे महत्त्व जाणले पाहिजे. पहिल्या मुलाच्या वेळी यातील बऱ्याच गोष्टी पाळल्या जातात . पण पुढील प्रसूतीच्या वेळी सुद्धा या बाबी कटाक्षाने पाळणे गरजेचे आहे. विविध समाज घटकांत , आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना ही सोया मिळावी यासाठी समाजाने पुढाकार घेणे गरजेचे असते. हा संदेश या लेखमालेद्वारे मिळावा अशी इच्छा होती. स्तनदा मातेचा आहार हा विषय विस्तारभयास्तव इथे घेतला नाही. पुढील काही दिवसांत त्यावर स्वतंत्र लेख लिहिण्याचे योजिले आहे. आपल्याला ही मालिका माहितीपूर्ण वाटली असेल अशी अशा आहे . आपले काही प्रश्न असल्यास कंमेंट बॉक्स मध्ये आवर्जून विचारावेत.
No comments:
Post a Comment