चित्र सौजन्य - ReSanskrit website
गेले काही दिवस आपण COVID - 19 च्या निमित्ताने आहार, विहार तसेच मानसिक ताण कमी करण्यासाठी काही उपाययोजना पाहिल्या. त्यांना सर्वांचाच उत्तम प्रतिसाद मिळाला. मानसिक ताण-तणाव आणि आहार या विषयावर तर इतके प्रश्न आलेत कि सविस्तर लिहावे लागते आहे. मानसिक ताणाविषयी आपण काल माहिती दिली आणि आहाराविषयी आज पाहणार आहोत. आहाराविषयी शंकांपैकी “सध्याच्या वातावरणात काय खावे, कसे खावे, किती खावे ,तसेच व्याधिक्षमत्त्व (Immunity ) वाढवण्यासाठी काय करावे याविषयी प्रश्नांचा रोख अधिक होता. म्हणूनच आता आहार या मुद्द्यावर सविस्तर लिहीत आहे.
व्याधिक्षमत्त्व हे फक्त औषधाने मिळवता येत नाही. म्हणजे व्याधिक्षमत्त्व निर्माण करण्यासाठी आयुर्वेदामध्ये औषधे आहेतच पण कायमचे तसेच अधिक प्रभावी व्याधिक्षमत्त्व निर्माण व्हावे यासाठी सद्वृत्त (Diet and Routine Correction) अधिक महत्त्वाचे आहे आणि यासाठी ऋतुचर्या म्हणजेच ऋतूनुसार आहार-विहार अतिशय महत्त्वाचा आहे.भारतीय कालगणनेनुसार सध्या वसंत ऋतू सुरु आहे.या ऋतूमध्ये कफदोषाचे नैसर्गिकरित्या प्रकोप होत असतो. म्हणजे असे कि शरीरात निसर्गतःच असणारा कफ दोष थंड ऋतुमुळे (हेमंत ऋतू) वाढतो,साचतो. आणि उष्णता मिळाली (वसंत ऋतू) कि पातळ होतो.(कल्पना करा हं, थंडीमध्ये सतत बर्फ साचला की मोठे हिमखंड तयार होतात आणि उष्णता वाढली की हे हिमखंड वितळून नद्यांना पूर येतात.) त्याचप्रमाणे हा वाढलेला, साचलेला कफ पातळ झाला कि शरीरात जी स्थिती तयार होते त्यास कफप्रकोप असे म्हणतात. वेगवेगळ्या आजारांसाठी ही स्थिती पोषक असते. जसे की सर्दी-खोकला-तापासारखे श्वसनसंस्थेचे आजार , वेगवेगळे विषाणूजन्य आजार (viral infections) किंवा अपचन-आम्लपित्त- भूक मंदावण्यासारखे पचनाचे आजार, तसेच सोरायसिस-एक्झिमासारखे त्वचाविकार होताना किंवा आधीच झालेले असल्यास अधिक बळावताना दिसतात. हे त्रास होऊ नयेत किंवा आधीच असतील तर अधिक बळावू नयेत म्हणूनच नियमित ऋतुचर्या महत्वाची असते.
यासाठी काय टाळावे आणि कोणते नियम पाळावे हे पुढील तक्त्यात दिले आहे.
सध्या लॉकडाऊनमुळे थोडासा change म्हणून बऱ्याच जणी (आणि काही जणसुद्धा) छान-छान पाककृतींचे फोटोज शेअर करत आहेत. वेगवेगळी Challanges शेअर होत आहेत.
चला तर मग आपणही एक challenge करूया, “वसंत ऋतू रेसिपी Challenge.”
यात मी तुम्हाला challenge करतेय, वर लिहिलेल्या पदार्थांपासून एखादी छानशी पाककृती बनवा आणि share करा.
तळटीप -
* बाजरी - बाजरी हे धान्य मूलतः उष्ण गुणाचे आहे. त्यामुळे वसंत ऋतूमध्ये वापरताना देखील वातावरणातील उष्णतेप्रमाणे जपून वापर करावा.
**मांस - मांस सेवन करताना शक्यतो भाजलेले Barbeque केलेले मांस निवडावे पण याला मसाला कमी लावावा.
***मध - मध कफ कमी करणारा उष्ण गुणाचा आहे. त्यामुळे गोडवा येण्यासाठी वापरता येतो. मात्र मध चुकूनही गरम करू नये.
महत्त्वपूर्ण माहिती
ReplyDeleteThank you so much
Deleteनिम्मे उकळलेले पाणी म्हणजे काय? आणि त्याचे फायदे सांगाल का please?
ReplyDeleteस्वप्नाली
आयुर्वेद शास्त्रात पाणी वापरताना बऱ्याचदा उकळून थंड केलेले किंवा उकळून कोमट असे पाणी ऋतूनुसार वापरायला सांगितले उष्ण जल हे कफाचे शमन करणारे ,पचनशक्ती (जाठराग्नी ) वाढवणारे आणि आम (अपाचित विषद्रव्य ) कमी करणारे असे सांगितले आहे. पण पाणी उकळून घेताना ते फक्त उकळी आली ली आच बंद न करता तसेच उकळू द्यावे आणि तीन चतुर्थांश (३/४) किंवा अर्धे आटेपर्यंत उकळून घ्यावे असे सांगितले आहे. कारण असे पाणी पचायला अधिक हलके असते. कफाचे आजार असणाऱ्या व्यक्तींना वैद्यांच्या सल्ल्याने असे पाणी दिले तर नक्कीच फायदा होताना दिसतो.
Deleteदही,चक्का ,पीयूष ,लस्सी श्रीखंड, पनीर, चीझ , मिल्कशेक्स , आईस क्रीम. दही हे पोटाला थंड तरी उन्हाळ्यामध्ये ते टाळावे का?
नक्कीच, कारण या सर्व गोष्टी स्पर्शाला थंड असल्या तरी प्रत्यक्षात पित्तकारक आहेत. आणि अजून उन्हाळा सुरूही झालेला नाही.
ReplyDeleteखजूर उष्ण असतो की नाही? उन्हाळ्यात खाल्ला तर चालेल का? किती खावा?
ReplyDelete