केस_पेपर_तिचा_आणि_त्याचासुद्धा
केसांचे सामाजिक स्थान -
ऐतिहासिक काळापासून चांगले केस हे चांगले आरोग्य, तारुण्याचे , लैंगिकता, शक्ति, वर्चस्व तसेच धार्मिकता यांचे लक्षण आहे. डोक्यावरील केसांवरुन व्यक्तीचा स्वभाव, सवयी, सामाजिक स्थान यांचा अंदाज लावता येतो. कारण चेहेऱ्याप्रमाणे केसांकडेसुद्धा चटकन लक्ष वेधले जाते.
पोलिस, सैन्यदलातील जवान यांचे केस बारीक कापलेले असतात. तर अभिनेते , खेळाडू अश्या व्यक्तीचे केस बऱ्याचदा लेटेस्ट स्टाइल, फॅशनचे असतात. वेगवेगळ्या प्रकारच्या केसांच्या रचना व्यक्तिचे आर्थिक स्थानही दर्शवितात. (सांभाळण्यास कठीण फॅशन असेल तर त्यासाठी वेगळी व्यक्ती/ नोकर असणे ही आर्थिक संपन्नताच, नाही का?) तर मानसिक ताण-तणावाचे काम करणाऱ्या माणसांमध्ये डोक्याच्या कोपऱ्यांतील केस विरळ होतात ही काही उदाहरणे म्हणता येतील.
डोक्यावरचे केस आपल्याला जन्मतःच असतात तर चेहरा, काख , जननेंद्रिय येथे उगवणारे केस वयात आल्यावर दिसू लागतात. पुरुषांना काख, छाती, जननेंद्रिये व चेहेऱ्यावर (दाढी-मिश्या) केस उगावतात तर स्त्रियांना जननेंद्रिये ,काखेत केस येतात. हे केस उगवणे हे व्यक्ती वयात आल्याचे लक्षण असते (Secondary sexual charachters). मात्र पुरुषांना उपरोक्त निर्देशित स्थानी केस न येणे किंवा स्त्रियांना त्या जागी केस येणे हे विकृतीचे (Hormonal Imbalance चे) लक्षण आहे. त्यामुळे,
डोक्यावरचे गळत असलेले केस वाचवणे.
टक्कल असल्यास तेथे नवीन केस उगवण्यास प्रयत्न करणे
नवीन येणाऱ्या केसांचा पोत (texture हो!) सुधारणे.
आणि
अनावश्यक ठिकाणी उगवलेले केस कमी करणे
या पद्धतीने केशायुर्वेद - संपूर्णतः आयुर्वेदिक पद्धतीने काम करते.
No comments:
Post a Comment