Wednesday, 7 August 2019

स्तनपान - आयुर्वेदीय दृष्टिकोन भाग २







स्तनपान - आयुर्वेदीय दृष्टिकोन 
         (वर्ल्ड ब्रेअस्टफीडिंग डे - जागतिक स्तनपान सप्ताह २०१९)





या  भागामध्ये आपण आयुर्वेदीय संहितांमध्ये सांगितलेले स्त्रीदुग्ध म्हणजेच स्तन्याचे गुण  पाहणार आहोत. सुश्रुत संहितेत सांगितले आहे कि स्तन्य परीक्षा पाण्यामध्ये करावी. ही अत्यंत साधी परीक्षा असून घरच्या  घरी करता येते. काचेच्या भांड्यात शुद्ध पाणी घेऊन त्यात स्त्रीदुग्धाचे काही थेंब  टाकून बघितले जातात. 

शुद्ध स्तन्य लक्षणे -
  1. शुद्ध स्तन्य शीतल , अमल (स्वच्छ - clear ), तनु (पातळ), शंखाच्या वर्णनाप्रमाणे शुभ्र, पाण्यात टाकल्यावर पूर्णपणे मिसळून जाणारे असावे. 
  2. दुध फेसाळलेले नसावे. 
  3. त्यामध्ये तार  दिसून येऊ नये. ( दोन बोटांच्या चिमटीत दुधाचा थेम्ब दाबून बीट विलग केल्यावर तार  येते का, ते पाहावे.)
  4. दूधाचा  थेंब  पाण्यात अलगद टाकून बघितल्यास तो तरंगणारा किंवा बुडणारा  नसावा. पाण्यात सहज मिसळून जावा.  
  5. तसेच आईचे दूध नियमितपणे पिणाऱ्या बाळांची शारीरिक व मानसिक वाढ उत्तम होते. (पुष्टीकर आरोग्यकर: च इति )
  6. बाळाला तसेच आईला स्तन्यामुळे काहीही त्रास होत नाही.  (शिशु: धात्र्यो: अनापत्ति )
अशुद्ध  स्तन्य लक्षणे 
  1. स्तन्य अधिक मधुर रसाचे असल्यास बाळाला वारंवार आणि भरपूर शी-शू होते . (सध्या पावसाळ्यात सगळ्याच बाळांना वातावरणातील गारव्यामुळे वारंवार शू  होताना दिसते त्यामुळे मातांनी काळजी करू नये. पण बाळाच्या शू -शी कडे लक्ष द्यावे. )
  2. कषाय रसाचे स्तन्य असल्यास बाळाला कडक शी होते आणि शूसुद्धा कमी होताना दिसते. 
  3. वात -कफादी दोषांनी बिघडलेले स्तन्य असल्यास बाळाला उलटी-अपचनाचा त्रास दिसतो. 
अश्या वेळी आईला आहार-विहार नीट समजून घेऊन त्यात आवश्यक ते बदल करावे लागतात व वैद्यांच्या सल्ल्याने आईला औषधे देणे गरजेचे असते. 


खालील तक्त्यामध्ये मातृस्तन्य , गायीचे दूध व बाजारात उपलब्ध असलेले फॉर्म्युला  फीड यांची तुलना दिली आहे . यावरून लक्षात येते कि आईच्या दूधाला  पर्याय नाही व बाकीचे पर्यायांचा विचार आईचे दूध अगदीच उपलब्ध नसल्यास करावा हे योग्य . 


इतर लिंक - मागील दोन वर्षांपासून चालत आलेल्या या लेखमालेत स्तनपान या विषयावर वेगवेगळ्या पैलूने विचार करून माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे . ते लेख खालील लिंक वर  वाचा. 

१.  स्तनपानाचे महत्व https://samanwayayurved.blogspot.com/2017/08/blog-post.html

२. स्तनपानाची पद्धत  https://samanwayayurved.blogspot.com/2018/08/blog-post.html

३. ब्रेस्ट क्रॉल , बाळ अथवा आई आजारी असल्यास https://samanwayayurved.blogspot.com/2018/08/blog-post.html

Wednesday, 31 July 2019

स्तनपान - आयुर्वेदीय दृष्टिकोन



        स्तनपान - आयुर्वेदीय दृष्टिकोन 
              (वर्ल्ड ब्रेअस्टफीडिंग डे - जागतिक स्तनपान सप्ताह २०१९)








               आई व बाळाचे नाते यावर सर्व भाषा-संस्कृतीमध्ये भरभरुन लिहिले- बोलले जाते.आई आणि बाळाच्या नात्याचा बांध हा स्तनपानामुळेही जास्त घट्ट होताना दिसतो . आरोग्याच्या दृष्टिकोनातून तसेच मानसिक विकासाच्या दृष्टिकोनातून आईचे दूध व स्तनपान, आई व बाळ दोघांसाठी महत्वाचे आहे.
             हे महत्व जगातील सर्व मातांपर्यंत पोहोचावे आणि जगभरातील प्रत्येक नवीन मातेला, मग तिचा आर्थिक स्तर-सामाजिक स्तर कुठलाही असो,तिला आपल्या बाळाला स्तनपान देता यावे यासाठी दरवर्षी १ ऑगस्ट ते ७ ऑगस्ट या पहिल्या आठवडयामध्ये १९९१ सालापासून ‘जागतिक स्तनपान सप्ताह’ साजरा केला जातो. स्तनदा माता व त्यांचे कुटुंबिय यांना स्तनपानाबाबत शास्त्रशुद्ध माहिती मिळून स्तनपानासाठी नवीन मातेला जास्तीत जास्त आधार मिळावा हाच यामागचा उद्देश आहे.
             याचसाठी  मागील दोन वर्षांपासून समन्वय आयुर्वेद व पंचकर्म क्लिनिक सदर ब्लॉगद्वारे  लेखमाला प्रसारित करत आहोत. मागील दोन वर्षांत आपण प्रेमस्वरूप आई.... वात्सल्यरूप आई... या लेखामालेत स्तनपान , आहारशास्त्रीय महत्व (Nutritive value ), स्तनपानाची योग्य पद्धत , स्तनपानसाठी अर्ह-अनर्ह (Indications -Contraindications ), ब्रेस्ट क्रॉल पद्धत यांची माहिती पाहिली . यावर्षी आपण आयुर्वेदीय दृष्टिकोनातून स्तनपान कसे असावे हे पाहणार आहोत. 
  1. धात्री  -  आयुर्वेदीय संहितांमध्ये सगळ्यात आधी धात्रीचे वर्णन आहे. धात्री म्हणजे बाळाची आई किंवा आईच्या अभावात बाळाला दूध पाजणारी स्त्री. पूर्वीच्या काळी  तिला दूधआई म्हणत. हल्ली याच प्रकारची संकल्पना ब्रेस्टमिल्क बँकच्या स्वरूपात पाहायला मिळते.  दोन्ही संकल्पनांमध्ये आईचे दूध मिळत नसल्यास बाळाला किमान स्त्रीदुग्ध मिळावे याचा प्रयत्न दिसतो. 
                       यासाठी सगळ्यात आधी बाळाच्या आईने/धात्रीने  कसे राहावे , हे सांगितले आहे. स्त्रीने आहार-विहाराचे पथ्य पाळावे. कारण चुकीचा आहार- विहार करणाऱ्या स्त्रीचे वातादि दोष कुपित होऊन स्तन्य दूषित करतात.  ज्यामुळे बालकांमध्ये काही आजार होताना दिसतात.याशिवाय धात्री ही मध्यमवयीन (साधारणतः २० ते ४५ वयाची), अतिकृश किंवा अतिस्थूल नसावी, अव्यसनी, शुचिर्भूत (स्वच्छतेचे नियम पाळणारी), अरोगा (निरोगी), वत्सल,आनंदी  व प्रेमळ असावी. या सगळ्या नियमांकडे नीट लक्ष दिल्यास लक्षात येईल कि यामध्ये स्वच्छता, शारिरीक  व मानसिक स्वास्थ्य यावर जास्त भर दिला आहे.  
  2. स्तन्यानाश (दूध कमी होणे) कारणे  - क्रोध, शोक, अवात्सल्य(lack of love for child ) , कुपोषण ही कारणे  दूधाचे स्रवण कमी करणारी ठरू शकतात असे आचार्य सांगतात . आधुनिक संशोधनाद्वारे सुद्धा  हे  सिद्ध  झाले आहे की Oxytocin आणि prolactin  ही  संप्रेरके आणि स्तनपानाची मुख्य प्रक्रिया (let down  reflex ) यामध्ये मातेच्या भावना महत्त्वाच्या असतात.तसेच नकारात्मक-दुःख्खी  विचार करणाऱ्या स्त्रियांच्या स्तन्यातील IgA  या इम्युनोग्लोब्युलिनचे प्रमाण कमी असते. यामुळे आयुर्वेदीय संहितांमधील दावे योग्य असल्याचेच सिद्ध होते. 
  3. मातेने करावयाचे पथ्य - यासाठी मातेने पुरेशी विश्रांती घ्यावी. मन प्रसन्नचित्त ठेवावे.रोज संपूर्ण अंगाला मालिश करून शेक घ्यावा.  आहारात गहू,ज्वारी, साठेसाळी किंवा तांदळाची उकड काढून केलेली भाकरी, शिंगाड्याचे पीठ,खोबरे (ओले किंवा सुके), अहळीव , तीळ, दुधी भोपळा , पडवळ, शिराळे ,हिरवे मूग, मुगाची डाळ, शेवगा,सुरण, कच्ची केळी , मसाल्याच्या पदार्थांत लसूण , जीरे ,धणे, काळे मिरे,दालचिनी,खसखस,शेपा  , खारीक ,खजूर, अक्रोड,बदाम  यासारखा सुकामेवा , शतावरी ,ज्येष्ठमध, विदारीकंद  यासारखी द्रव्ये आहारातमोठ्या प्रमाणात वापरावी. 


(क्रमशः )

               

Wednesday, 20 March 2019

*Holi tips for Skin & hair*



*Samanwaya Ayurveda's*☘
*Holi tips for Skin & hair*

               The nation is gearing up to celebrate one of their most loved festivals, Holi.
             Also called the festival of colours, Holi is one of the most widely celebrated festivals of the subcontinent.
            We have all the tips and tricks you would need for your beauty needs.

*#Keshayurved* *#Samanwaya Ayurveda*

1. Hair-care
◆On the day of Holi, make sure you massage or oil your hair from the roots with coconut oil
◆ Tie your hair in a braid or bun to avoid maximum damage.Brush off the dry colors that must have been accumulated in your hair. Stand under running water for 10 minutes and let the colors wash off from your hair.
 Gentle rub on the scalp is good to loosen up the formation of clots blocking the pores.

To get rid of wet colors, first rinse hair thoroughly with cold water . You can then apply a homemade mask..

1/2 tbsp. olive oil

1 tbsp. coconut oil,

1 tsp honey

1 tsp yogurt.

Make a fine paste by blending all ingredients, apply it on your scalp and hair and leave it for an hour. Then, wash it off. This will deeply condition your hair. Use natural cleanser shikakai.ritha.

*#Keshayurved* *#Samanwaya Ayurveda*

2. Skin Protection
◆On the day of Holi, make sure you apply almond oil all over your body. Especially, on the parts that are most exposed. Oiling the skin prevents colours from sticking to the body, and makes it easier to rinse off the colours post the play. In addition to this, almond oil is also a rich source of vitamin E and provides nourishment to the skin.

◆Face masks
You can use chandan + dahi face mask.
Chandan + cucumber juice face mask works best on colour allergies.
Aloevera gel is also useful for cooling effect.
Avoid using soaps or face-wash as they are alkaline in nature and will dry your skin more.
Using banana peel - you can rub inner surface of banana peel to remove excess colour.

*Happy & safe holi*🍂
*Eco friendly holi*🌸🍃

*for More info contact*--
*Dr Snigdha Churi-Vartak*
Samanwaya Ayurveda And panchakarma clinic.
*Authorized Keshayurved Branch*
(India's first ISO certified Ayurvedic hair testing lab)
*9870690689*

Tuesday, 7 August 2018

प्रेमस्वरूप आई .... वात्सल्यरूप आई....... - भाग 3







  • ब्रेस्ट क्रॉल - प्रसूती झाल्यावर बाळ रडले व श्वासोच्छवास सुरू नीट सुरु झाला की लगेच बाळाला कोरडे करावे. आणि साधारणतः आई प्रसूतीनंतर आडव्या स्थितीत असते अश्या स्थितीत आईच्या पोटावर दोघांचा एकमेकांना पूर्ण स्पर्श होईल अश्या रीतीने बाळाला उपडे ठेवावे.या अवस्थेत बाळाचे डोके आईच्या स्तनांमध्ये येते . आईने हलकेच बाळाला पकडावे , बाळाचे नाक दाबले जात नाही ना याची काळजी घ्यावी . बाळाला टोपी घालावी , आई-बाळाला एकत्रित पांघरूण  घालावे म्हणजे बाळ उबदार राहील व आई-बाळाचा एकत्रित स्पर्श होत राहील. असे ठेवल्यावर जवळ जवळ सर्वच बाळे आपणहून स्तनाकडे सरकतात व स्वतःहून स्तनपानाची सुरुवात करतात. यालाच ब्रेस्ट क्रॉल असे म्हणतात. या पद्धतीने साधारणतः अर्ध्या तासाच्या आत स्तनपानास सुरुवात होते . ब्रेस्ट क्रॉल ही पद्धत बाळाच्या शारीरिक व मानसिक विकासासाठी लाभदायक ठरते.
  • आई आजारी असल्यास - नेहमीचा  साधा आजार असल्यास डॉक्टरी सल्ल्याने स्तनपानास अडथळा न आणणारी औषधे घेऊन स्तनपान करता येईल.
मात्र HIV संक्रमित  किंवा अंमली पदार्थच्या व्यसनाधीन मातेचे दूध बाळाला देऊ नये.
किमोथेरपि किंवा रेडिएशन थेरपी चालू असल्यास बाळाला स्तनपान करू नये.
TB चे संक्रमण असल्यास सुद्धा डॉक्टरी सल्ला घ्यावा..
  • बाळ आजारी असल्यास - या उलट बाळ आजारी असल्यास त्याची पचनशक्ती मंदावते अशा वेळी त्याला बाहेरचे अन्न  पचायला जाड जाते. त्यामुळे आजारी बाळाला जरूर स्तनपान करावे. नियमित स्तनपान केल्यास बाळाला नवजात कावीळ  (physiological jaundice ) होत नाही अथवा झाल्यास ती लवकर बरी होण्यास मदत होते.
  • भेगाळलेली स्तनाग्रे असल्यास बाळाला दूध पाजताना मातेला वेदना होतात त्यामुळे स्तनपानाच्या अडथळा होऊ शकतो अशा वेळी स्तनाग्रांना इतर कोणतेही क्रीम न लावता स्तन्यच लावावे , तसेच पाजताना खूप वेदना होत असल्यास स्तन्य काढून पाजावे व लवकरात लवकर भेगा भरून येतील असे पाहावे.
  • दाटलेले स्तन  - वेळीच स्तन्याचा निचरा , बाळास दूध पाजणे किंवा काढुन ठेवणे , न झाल्यास आईच्या स्तनांत दूध दाटते. जर त्यावर वेळीच उपचार नाही केले तर संसर्ग होऊन ताप येऊ शकतो त्यामुळे शक्यतो दूध दाटणार नाही असे पाहावे व तसे झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
  • बाळाला पुरेसेस दूध मिळते कि नाही हे पाहण्याचे निकष म्हणजे बाळाची शी , शू  व वजन.
शी - जन्मल्यानंतर बाळाला २४ तासांत पहिली शी होते त्यांनतर ते रोज कधी कधी दिवसांतून २-३ वेळा अथवा दार स्तनपानानंतरही  शी करू शकते तसेच याउलट काही बाळे २-३ दिवसांतून एकदा सुद्धा शी करतात. हे सर्व सामान्य आहे
शू  - बाळास जन्मानंतर ४८ तासांच्या आत पहिली लघवी होते.  व पूर्णपणे स्तनपानावर अवलंबून असलेले बालदिवसभरात कमीत कमी ६-७ वेळा लघवी करते .
वजन - शी व शू  याबरोबर पहिला जाणारा महत्वाचा निकष म्हणजे वजन . पहिल्या ५-७ दिवसांत बाळाचे वजन जन्माच्या वेळेच्या वजनापेक्षा ५-१०% नी  कमी होऊ शकते. त्यांनतर साधारणतः दररोज सुमारे २० ग्रॅम म्हणजे महिन्याला ५००ग ग्रॅम वजन वाढते . पहिल्या ५ महिन्यांत बाळाचे वजन हे जन्माच्या वेळेच्या दुप्पट आणि पहिल्या वाढदिवसापर्यंत ते तिप्पट होते. अर्थात थोडा फेरफार असू शकतो.


तर  संपूर्ण आठवडाभर चाललेल्या या लेखमालिकेत आपण स्तनपान या विषयाबद्दल आवश्यक ती माहिती व स्तनपानाचे महत्त्व  जाणून घेतले. स्तनपान हा बाळाचा मूलभूत हक्क आहे , ती बाळाची गरज आहे त्यामुळे घरातील सर्वांनी याचे महत्त्व  जाणले पाहिजे. पहिल्या मुलाच्या वेळी यातील बऱ्याच गोष्टी पाळल्या जातात . पण पुढील प्रसूतीच्या वेळी सुद्धा या बाबी कटाक्षाने पाळणे गरजेचे आहे. विविध समाज घटकांत , आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना ही  सोया मिळावी यासाठी समाजाने पुढाकार घेणे गरजेचे असते. हा संदेश या लेखमालेद्वारे मिळावा अशी इच्छा होती. स्तनदा मातेचा आहार हा विषय विस्तारभयास्तव इथे घेतला नाही. पुढील काही दिवसांत त्यावर स्वतंत्र लेख लिहिण्याचे योजिले आहे. आपल्याला ही मालिका  माहितीपूर्ण वाटली असेल अशी अशा आहे . आपले काही प्रश्न असल्यास कंमेंट बॉक्स मध्ये आवर्जून विचारावेत.

Breastfeeding - Foundation of LIfe , Part 3












  • Breast Crawl - It is an ability  by which Every Newborn when placed on mothers abdomen, soon after birth, is able to make there way to mother's breast for feeding.  This instinct driven effort is known as ‘Breast Crawl’.
This can  be initiated by placing a baby , after regular breathing is confirmed, on his mother’s chest while mother is lying in natural laid back position. Here baby’s head lies between mother’s breasts. In this position , mother can make sure that baby is stable and doesn’t roll off.  Mother and her baby should be covered in same blanket to keep them warm and in each others touch. This helps to create bond of love. Within a hour, Breastfeeding can be introduced naturally with this method. Breast crawl is also important for infant’s physical and mental development.
  • Breastfeeding should be avoided
  • if mother has HIV infection
  • If mother under any influence of narcotic drugs.
  • If mother is under chemotherapy or radiation.
  • And In case of tuberculosis infection, under medical advice should be seeked.

  • Unwell baby -  A mother must  feed her baby even if it is unwell as it has low digestive power nad loss of appetite. Cooked food or top feed is difficult to digest. Hence for younger children exclusive nursing is strongly recommended. Also feeding is proven beneficial in order to give protection or faster recovery from neonatal jaundice.
  • Cracked nipples - can be very painful while feeding baby and can be a hindrance during feeding process. It can be healed by applying breast milk regularly. No other cream/ointment should be used. If mother has severe pain , she can express milk manually for feeding.
  • Breast Engorgement - is a condition where breasts gets swollen and painful due to overproduction of milk. Engorged breast can be tight,hard and painful if not drained on time. Swelling may go upto armpit. If left untreated it may get infected and cause fever and even may lead to an abscess. So it is important to keep draining breasts. Most easy and important way of doing it to feed your child frequently and as soon as possible. Manual expression is also a convenient method and expressed milk can be stored as per requirement. Check for baby’s latching position. Massage breasts before each feeding to express more milk. Use cold compression. In case pain increases consult your doctor for the treatment.
  • As mentioned earlier , criterias to know if infant is getting enough breast milk are baby’s satisfaction,weight , urination and and stools (potty).
  • Stools (potty) - infants pass first stools within 24 hrs of birth. And after that  once a day. But sometimes baby may pass stools 2-3 times a day or may be once in 2-3 days. These conditions are normal and do not need any urgent medical attention.
  • Urination - first urine should be passed within 48 hrs of birth. After that baby wets at least 6-7 diapers when it is solely dependent on breastfeed.
  • Weight -  baby continues to gain weight after gaining back the weight she initially lost after birth. (Most babies lose up to 7 percent of their birth weight and then regain it by the time they're about 2 weeks old). Generally an infant gains 20 gms of weight everyday. ie 500 gms per month. Baby roughly doubles its birth weight by the age of five months and triples  by the first birthday.

This entire week, we had tried to explain importance of breastfeeding. Everyone in the household must understand that breastfeeding is fundamental right of every infant and it is their basic need as well. Many a times these things are followed during first pregnancy and ignored in later pregnancies due to burden of work, when they are much needed. Society and employers should support economically backward class of community. We hoped to convey this message through this article series. Diet for lactating mother have not been discussed over hereas this could be a subject for entire full length article. Any comments and queries  are welcome.
Thank you.


References -

  1. . Breastfeeding Promotion Network , India
  2. Textbook of obstetrics
  3. Picture reference - World Alliance of Breastfeeding Action (WABA) official website

Sunday, 5 August 2018

Breastfeeding - Foundation of LIfe , Part 2




  • Ideally a newborn should be allowed to be with his mother.It helps mother to understand her child’s routine,urine and stool frequency,its nature. And if needed she can alert nurses if anything is wrong. This also helps to create a bond of love between the mother and her child which inturn helps in lactation as breast milk secretion is stimulated by  child’s sight ,touch and sound.
  • Always make sure that a lactating mother understands correct method of breastfeeding . Nipple and areola (dark part around nipple) should be in child’s mouth ,also sitting posture of mother ,baby’s holding position should me correct during breastfeeding . this ensures maximum comfort and increases success of sustainability of breastfeeding. If required, Lactating mother should seek help of doctors/ trained nurses or Lactation consultants in order to learn it.
  • Duration and frequency of Breastfeeding - this can be different for every child. “Other child is feeding 12 times a day and my child takes only 6 feeds,something must be wrong with my baby.” Hold on… you should not judge your baby like this. There are different criterias which we will discuss in next article. But for now a Lactating mother should understand that she needs to feed her baby AS and WHEN she demands. A mother can feed her baby during night as well. Breast feeding can be given in sleeping position  but mother must take precaution not fall asleep during the feed as breast may smother baby.
  • Contents of mother's milk - Breastfeeding is quite customized as per baby’s need. e .g. Studies have shown that when a mother of premature baby nurses her child , she produces breast milk which is slightly different than the normal breastfeed.milk that they produce is slightly richer in protein and have different types of fats and antibodies than the later week . it has such special composition to help baby to survive through those first difficult weeks.
                 In normal breast feedings also earlier milk, called foremilk, has lesser fat content and more water which helps to quench baby’s thirst . Fat consistency increases with progressing feeding and this thick milk, hind milk, helps to satisfy hunger. That's why mother should feed her baby from one breast at a time and shift to other side . (no need to choose one particular breast every time but let feed the baby fully on one of the sides every time)
  • For a Working Mother - any mother should nurse her baby for at least 4 months . ideally this period is of 6 months which is why government has approved 6 months of mandatory leave for nursing mothers. Maximum women should avail this facility but there many women who may not be able to get normal leaves , let alone maternity leave. If for some reason a mother is not being able to get  maternity leave she must learn to express her breast milk manually. It can be done with clean hands or sterile breast pumps. This breastfeed can be stored in sterile containers. Proper method of expressing breastmilk and its storage can be learned from a doctor / nurses / ANM / Asha sevika. According to latest researches , Such stored miok can be kept at room temperature for max 6 hrs, for 24hrs in the fridge and up to 1 week in deep freezer. For using this milk can be kept in warm water , not on a direct gas stove, and can be given to the baby after checking its temperature. (Author of this article is an Ayurvedic consultant and according to ayurveda, ideally no food should be consumed after keeping it for longer durations, but for the time of need or if the baby is sleeping or in case  milk is leaking while working , breast milk can be stored and used as soon as possible or on the same day itself.
  • Any top feed , be it cow milk or buffalo milk , goat milk or any infant formula available in the market , cannot be a perfect substitute for breastfeed. Mother must not opt for these substitutes unless and until  breast milk is not enough for baby.
(to be continued...)

Key features of Next Article
  1. Process of breast crawl and its importance.
  2. Diet for a lactating mother
  3. Contraindications for breastfeeding the baby

Thursday, 2 August 2018

प्रेमस्वरूप आई .... वात्सल्यरूप आई....... - भाग २











  • बाळ शक्यतो आईच्या कुशीत असावे , जेणेकरून बाळाची शी-शू , भूक ,झोपेच्या वेळा व इतर खाई गरजा आईच्या नीट लक्षात येतात . आवश्यकता असल्यास तात्काळ तज्ज्ञांची मदत मागता येते. तसेच  बाळ सतत आईच्या जवळ असेल तर दोघांमध्ये वात्सल्यबंध तयार होतो व आईला पान्हा फुटण्यास मदत होते .
  • प्रसूतिगृहातून घरी जाण्यापूर्वी स्तनपानाची शास्त्रशुद्ध पद्धत डॉक्टर्स/प्रशिक्षित नर्सेस / lactation consultants कडून नीट शिकून घ्यावी . बाळाला नीट दूध मिळावे यासाठी स्तनाग्र (nipple )  व बाजूचा काळा भाग (aerola ) अधिकाधिक बाळाच्या तोंडात असायला हवा ,तसेच बसण्याची स्थिती , बाळाला पकडण्याची पद्धत याचे नीट प्रात्यक्षिक शिकून घ्यावे.
  • स्तनपानाचा  कालावधी व वारंवारता - स्तनपानाच्या कालावधी व वारंवारता हे  प्रत्येक बाळासाठी वेगवेगळे असतात . त्यामुळे दुसरे बाळ दिवसातून १२ वेळा पिते आणि माझे बाळ ६च वेळा का पिते हा निकष लावू नये. बाळाचे पोट नीट भरते आहे कि नाही याचे निकष वेगळे असतात ते आपण पुढे पाहू. बाळाला जेव्हा भूक लागेल तेव्हा स्तनपान करणे गरजेचे  आहे , यालाच डिमांड फीडिंग (बाळ मागेल तेव्हा) असे म्हणतात . रात्रीसुद्धा स्तनपान करता येते. झोपलेल्या स्थितीतही स्तनपान करता येते. फक्त त्या स्थितीत आईला झोप लागणार नाही याची काळजी घ्यावी. तसेच स्तनाचे वजन बाळाच्या नका-तोंडावर येणार नाही असे पाहावे.
  • मातृस्तन्याचे घटक - बाळ स्तनपान करत असताना त्याच्या गरजेप्रमाणे स्तन्यात (घटकद्रव्यांत) थोडा बदल होतो. म्हणजे मुदतपूर्व प्रसूती झाली असेल तर आईच्या दुधातील घटक बाळाच्या गरजे प्रमाणे बदलतात. तसेच पूर्ण दिवस भरल्यानन्तर प्रसूती झाली तरी सामान्य बाळाला दूध पाजतानाही सुरुवातीचे दूध (foremilk)  थोडे पातळ असते कारण त्यात स्निग्धांश थोडा कमी असतो आणि पाण्याचे प्रमाण जास्त असते . हे दूध बाळाची तहान भागवण्यास मदत करते. जसे स्तनपान होत जाते तसा स्निग्धांश वाढत जातो व तसतशी या दूधाची  घनता वाढते. याला Hindmilk असे म्हणतात . हे दूध बाळाची भूक भागवते. त्यामुळे बाळाला पाजताना एकाच बाजूने संपूर्ण पाजावे आणि एका बाजूने दूध येणे बंद झाले कि मग दुसऱ्या बाजूने दूध द्यावे. म्हणजे बाळाचे पोट भरते. जर दोन्ही बाजूचे दूध थोडे थोडे दिले गेले तर बाळाचे पोट भरल्यासारखे वाटते पण त्यातील जास्तीच्या द्रवांशामुळे बाळाला परत लगेच भूक लागते .
  • आई ऑफिसला जात असल्यास - आईने किमान ४ महिने बाळाला अंगावर पाजलेच पाहिजे. खरेतर आदर्शरित्या हा काळ ६ महिन्यांचा आहे म्हणूनच हल्ली मातेला ६ महिने प्रसूती रजा  मिळावी अशी कायद्याने तरतूद आहे .तिचा अधिकाधिक लाभ घ्यावा. पण काही कारणाने हे शक्य होत नसेल तर आईने स्वतःचे दूध काढून साठवण्याची पद्धत शिकून घ्यावी. हे हाताने किंवा breastpump सारख्या यंत्रद्वारे शक्य आहे. ते निर्जंतुकरित्या साठवावे . असे साठवलेले दूध बाहेर ६ तास, फ्रीजमध्ये १ दिवस व फ्रीजर मध्ये १ आठवड्यापर्यंत चान्गले राहते असे नवीन संशोधन सांगते. हे दूध बाळाला देतात कोमट पाण्यात ठेवून (गॅसवर गरम करू नये.) सामान्य तापमानाला आणून बाळाला देता येते . (प्रस्तुत लेखिका आयुर्वेद तज्ज्ञ आहेत आणि आयुर्वेदानुसार कोणतेही अन्न  इतके दिवस ठेवून सेवन करू नये. पण अडचणीच्या वेळी तसेच बाळ झोपले असताना दूध गळत असल्यास ते काढून ठेवून लवकरात लवकर किंवा दिवसभरात संपवता येईल. )
  • तसेच कोणतेही वरचे दूध मग ते गाईचे असो वा  म्हशीचे किंवा कोणत्याही प्रकारचे तयार इन्फन्ट फॉर्म्युले हे आईच्या दूधासाठी समर्पक पर्याय असू शकत नाहीत त्यामुळे आईला पुरेसे दूध येत असेल तर बाळाला हे पर्यायी दूध देऊ नये. त्याऐवजी आधी सांगितल्याप्रमाणे आईचे दूध साठवता येईल.

(क्रमशः )


संदर्भ : ब्रेस्टफीडिंग प्रमोशन नेटवर्क, इंडिया.
        टेक्स्टबूक ऑफ ऑब्स्ट्रेटिक्स
चित्रसंदर्भ : वर्ल्ड अलायन्स ऑफ ब्रेस्टफीडिंग ऍक्शन वेबसाइट.