मागच्याच आठवड्यात प्रसिद्ध झालेल्या घरीच स्वविलगिकरण कसे करावे या तीन भागांच्या लेखमालेला आपण भरभरून प्रतिसाद दिलात, प्रश्नही विचारलेत. यातील काही प्रश्न बऱ्याचदा विचारले गेलेत म्हणून त्यांची सत्वर उत्तरे देते आहे.
हॉस्पिटलमध्ये असताना आयुर्वेदिक औषधे घेऊ शकतो का? ©samanwayaDrSnigdha
हो. रुग्ण एक संमतीपत्र (Consent form) भरून देऊ शकतात. सध्या पूरक चिकित्सा म्हणून आयुर्वेद चिकित्सेला मान्यता आहे. यासाठी हॉस्पिटलचे वैद्यकीय अधिकारी आणि उपचार करणारे वैद्य यांच्यात समन्वय असायला हवा. अलाक्षणिक तसेच सौम्य आणि मध्यम स्वरूपाची लक्षणे असलेल्या रुग्णांमध्ये खूप छान प्रतिसादही मिळत आहे.हा लेख लिहीत असताना दि.०१ऑगस्ट रोजी प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेद, दिल्ली येथे एप्रिल महिन्यापासून चालू असलेल्या ट्रायलचे निकाल अतिशय सकारात्मक आले आहेत. अधिक माहितीसाठी कृपया भाग 3 मधील सविस्तर उत्तर वाचावे.
पल्स ऑक्सिमीटर चे ऍप चालू शकेल का?
या ऍपविषयी सोशल मीडियावर बराच गदारोळ झाला. आता त्यातील फिंगरप्रिंट चोरीला जाण्याच्या तांत्रिक मुद्द्यांवर त्या क्षेत्रातील तज्ञांनी भाष्य केलेच आहे. त्यामुळे मी माझ्या वैद्यकीय क्षेत्रापुरते सांगते. ©samanwayaDrSnigdha
तर पल्स ऑक्सिमीटर हे छोटेसे चिमट्यासारखे उपकरण असते. जे बोटाच्या चिमट्याप्रमाणेच लावतात. यातील प्रकाश सेन्सर्स (LED light sensors)च्या साहाय्याने रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण मोजले जाते.ऍपमध्ये कॅमेराचा फ्लॅश लाईट वापरुन हे प्रमाण मोजले जाते. हे ऍपने दाखवले जाणारे प्रमाण दरवेळी अचूक असेलच असे नाही.आम्ही ऍपद्वारे आणि त्यांनंतर पल्स ऑक्सिमीटर,BP तपासायचे यंत्र तसेच स्टेथोस्कोपने, ऑक्सिजन,BP आणि श्वसनाचा वेग मोजला दरवेळी त्यात थोडीफार तफावत आली. त्यामुळे औषधोपचारांसाठी जर आपण ऑक्सिजनचे प्रमाण बघत असू तर ते अचूकच असायला हवे.
पल्सऑक्सिमीटर न टोचता, रक्त घेता हे प्रमाण मोजतात,हलके,वापरायला सोपे असतात. त्यामुळे रुग्णांनी तरी ते जरूर वापरावे.
तसेच पल्स ऑक्सिमीटर वापरण्यापूर्वी नेलपेंट,मेंदी यासारखी रंगद्रव्ये टाळावीत. त्यामुळे प्रकाश वाहनाला अडथळा होऊ शकतो.
©samanwayaDrSnigdha
कोण करणार हे सगळं?खूप कठीण आहे.
मान्य आहे की ही नवीन तडजोड कठीण आहे. घरच्या व्यक्ती, केअर गिव्हर्सवर थोडा ताणही येईल पण ते गरजेचे आहे.वेळीच केलेले आयसोलेशन आजाराचा पुढील प्रसार रोखू शकेल. बरं हे आयसोलेशन करण्यात काही अडचणी येत असतील तर जवळच्या डॉक्टरांना जरूर विचारा,ते नक्कीच शंकानिरसन करतील.
उदा. गरम पाण्यासाठी किटली,मधल्या वेळेचा हलका खाऊ म्हणून लाह्या,वाफेचे यंत्र रुग्णाच्या खोलीतच नेऊन ठेवले तर ते दररोज पुरवण्याचा ताण केअरगिव्हरवर येणार नाही. अलाक्षणिक रुग्ण इंडक्शनवर स्वतःचा नाश्ताही बनवून घेऊ शकतील.
घरी स्वतंत्र टॉयलेट किंवा वेगळी खोली नाही.
असे असल्यास लक्षणे असलेल्या रुग्णांना घरीच स्वविलगिकरणाची परवानगी स्थानिक अधिकारी देणार नाहीत. ◆पण थोडासा सर्दी-खोकला किंवा ताप आल्यास टेस्ट करायच्याही आधी पहिल्या दिवसापासूनच वेगळे राहिल्यास उत्तम.
◆यामुळे इतरांना संसर्ग होण्याची शक्यता कमी होऊ शकते. ◆यासाठी घरातही मास्क वापरावा.
◆घर छोटे असल्यास एका ठराविक कोपऱ्यात बसावे-झोपावे-जेवावे.तिथे शक्य असेल तर तात्पुरते पार्टीशन लावून आडोसा करता येईल.
◆ तसेच भाग दोन मध्ये सविस्तर सांगितलेले स्वविलगीकरणासाठी सांगितलेले स्वच्छतेचे नियम पाळावेत.
◆टॉयलेटला जाऊन आल्यानन्तर 1% सोडियम हायपोक्लोराइट फवारावे. मग थोडया वेळाने इतरांनी वापर करावा.
आहार कसा असावा? ©samanwayaDrSnigdha
बऱ्याचदा आजारपणात ताकद येण्यासाठी भरपूर नाश्ता-जेवण करण्याचा सल्ला दिला जातो. पण आयुर्वेदानुसार ताप आला असताना भूक मंदावते,तोंडाला चव नसते असे लक्षण दिसते. आणि भूक लागत नसल्यास लंघन म्हणजे उपवास करावा असे सांगितले आहे.
◆अर्थात हे लंघन उपचारांचा भाग असल्याने वैद्यांच्या सल्ल्यानेच करावे.
◆भूक पुरेशी लागत नसेल पण उपवासही सोसत नसेल तर तांदळाची पेज,मऊ भात, मुगाचे कळण,लाह्या,डाळ-तांदुळाची खिचडी असा पचायला हलका आहार घेता येईल.
◆असा आहार भूक लागेल तेव्हा आणि भूक भागेल तेवढ्याच प्रमाणात घ्यायचा.
फुप्फुसांची क्षमता कशी वाढवायची?
◆फुप्फुसांची क्षमता वाढवण्यासाठी सर्वप्रथम धूम्रपान बंद करावे.तसेच प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे धुराशी येणारा संबंध टाळावा.
◆घरातील धूळ,धूर,बुरशी दूर करून स्वच्छता राखावी.
◆ताजे सकस अन्न घ्यावे.
◆नियमित शारीरिक व्यायाम करावा.
◆नियमित श्वसनाचे व्यायाम, प्राणायामाचे प्रकार करावेत. हे सर्व व्यायाम प्रकार अनुभवी तज्ञ व्यक्तींकडून शिकून घ्यावे.टीव्ही,विडिओ पाहून स्वतःच्याच मनाने करू नये.
अजूनही काही शंका असतील तर आपण प्रश्न जरूर विचारू शकता.
स्वविलगीकरण या विषयावर लिहिलेली 3 भागांची लेखमाला खाली सविस्तर वाचा,
भाग १ - https://www.facebook.com/538889016257642/posts/2195116127301581/
भाग २ - https://www.facebook.com/538889016257642/posts/2197070703772790/
भाग ३ - https://m.facebook.com/story.php?story_fbid=2198121820334345&id=538889016257642
लेखिका
डॉ. स्निग्धा चुरी-वर्तक.
(सदर लेख वैद्य स्निग्धा चुरी-वर्तक यांनी ०२ ऑगस्ट 2020 रोजी आपल्या https://samanwayayurved.blogspot.com/2020/08/faqs.html या ब्लॉगवर प्रथम प्रकाशित केला. याचे सर्व अधिकार लेखकाधिन आहेत. इतरत्र शेअर करायचे असल्यास कृृपया कोणतेही बदल न करता व मूळ लेखिकेच्या नावासहित शेेेअर करावा.)
No comments:
Post a Comment