#Samanwaya_Ayurveda
#Five_white_poisons_part_1
#healthy_diet_series_स्वास्थ्यवेद
लॉकडाऊनच्या काळातही अनया आणि टीम स्वतःला व्यस्त ठेवत होती रोजचे शाळेतील ऑनलाईन तासिका, चित्रकला-हस्तकला याबरोबरच स्वतःला बिझी ठेवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकल्पांसाठीसुद्धा कामकरत होती. अश्या वेळी एका दुपारी माझा फोन गुणगुणला आणि उचलल्या-उचलल्या श्रीयाचा समोरून आवाज आला.
“मावशी, मला विज्ञान परिषदेत आपला आहार-आपले आरोग्य या विषयावर काहीतरी सादर करायचं आहे. काय गं बोलू मी?”
“अरे वाह, छानच विषय आहे की. काय विचार केला आहेस तू?”
“मला वाटतं , आपण जे खातो तसेच आपले आरोग्य असते. म्हणजे रोज घरी शिजवलेला चौरस आहार घेतला तर आपण निरोगी राहू.”’
“छान, अजून काही?”
“हं , तू सांगतेस तसं , त्या त्या ऋतूतली फळं आणि भाज्या ताज्या खायच्या. सगळ्या भाज्या न कुरकुरता खायच्या.”
“अरे वाह, अजून??”
“अजून??? आणखी काय गं ?? हं जंक फूड नाही खायचं.”
“बरोबर, खूप छान मुद्दे सांगितलेस तू श्रीया. यासगळ्या बरोबरच आपल्या सगळ्या स्वयंपाकघरात नेहमीच असणाऱ्या आणि रोजच्या आहाराचा मुख्य भाग बनलेले ५ पदार्थ आहेत ते म्हणजे साखर , मीठ , मैदा , दूध आणि तांदूळ. सध्या यांना ५ पांढरी विषे (White Poisons ) म्हणतात.
“काय??? मावशी अगं दूध आणि तांदुळसुद्धा?? आई मला नेहमी गोड कमी खा. सारखं वरून मीठ घेऊ नकोस म्हणून ओरडते. आजोबांनासुद्धा ब्लड प्रेशर-डायबेटीसमुळे मीठ-साखर कमी खायला सांगितली आहे. पण दूध आणि तांदुळसुद्धा?? अगं मग खायचे काय?”
“हो हो अगं , थांब जरा. बघ मी तुला नीट सविस्तर सांगते मग तू तुझे मुद्दे तयार कर, ठीके?”
(क्रमशः)
टीप - या लेखमालेचे सहा भाग आजपासून दररोज एक याप्रमाणे प्रसिद्ध होतील.
डॉ. स्निग्धा वर्तक.
samanwayaayurveda@gmail.com
(सदर लेख वैद्य स्निग्धा चुरी-वर्तक यांनी १४ मे २०२० रोजी आपल्या https://samanwayayurved.blogspot.com/2020/05/blog-post_14.html?m=1 या ब्लॉगवर प्रथम प्रकाशित केला. याचे सर्व अधिकार लेखकाधिन आहेत. इतरत्र शेअर करायचे असल्यास कृृपया कोणतेही बदल न करता व मूळ लेखिकेच्या नावासहित शेेेअर करावा.)
No comments:
Post a Comment