नवजात बालकांसाठी केल्या जाणाऱ्या विधीमध्ये सुवर्णप्राशन संस्कार भारतामध्ये पूर्वापार चालत आला आहे. व्यक्तीच्या आयुष्याच्या विविध टप्प्यांवर केल्या जाणारया सोळा संस्कारामध्ये या संस्काराचा समावेश होतो.
बालक परिचर्या व बालरोग चिकित्सेसाठी प्रसिद्ध कश्यप संहितेमध्ये तर म्हटले आहे,
सुवर्णप्राशनमं हि एतत मेधाग्नीबलवर्धनम ॥
आयुष्यं मंगलं पुण्यं वृष्यं वर्ण्यं ग्रहापहम ॥
म्हणजेच, हे जे सुवर्णप्राशन करायचे ते मेधा(धारणाशक्ती ) , अग्नि (पचनशक्ती) , बल वाढवणारे आहे तसेच ते आयुष्यदायी , पवित्र, पुण्यप्रद , वृष्य, वर्ण्य (त्वचेचा रंग , पोत , तजेला सुधारणारे ) , अनिष्ट ग्रह दूर करणारे आहे.
त्यामुळे बाळाला सुवर्णप्राशन नक्की करावे , असे सांगितले आहे.
आयुर्वेदामध्ये बालकांना *लेहन* अर्थात चाटण स्वरूपात औषधे देण्यास सांगितले आहे. ही लेहन औषधे दूध/ आहारातून राहिलेला पोषणाचा अभाव दूर करतात. लेहन औषधे पचण्यास सोपी व शरीराचे बळ वाढवणारी असतात. या लेहनीय औषधांमध्ये *सुवर्ण* अर्थात 'सोने' यापासून बनवलेले *सुवर्णभस्म* हे सर्वात महत्वपूर्ण औषध आहे
इतर फायदे :
- सुवर्णप्राशन बालकाची प्रतिकार क्षमता वाढवते,ज्यामुळे प्रत्युर्जतेमुळे वारंवार होणारे आजार कमी होतात.
- सुवर्णप्राशनामुळे अग्नि प्रदीप्त होतो ,ज्यामुळे पचनक्रिया सुधारते.
- यामुळे शरीराची वाढ चांगल्या प्रकारे होते.
- सुवर्णप्राशन मेंदूच्या सुयोग्य वाढीलाही मदत करते,ज्यामुळे बाळाचा मानसिक विकास चांगला होतो व एकाग्रताही वाढते.
- यामुळे त्वचेचा वर्ण , पोत सुधारतो व त्वचा तजेलदार दिसते.
सुवर्णप्राशन FAQs
1. सुवर्णप्राशन कोणाला दयावे :
नवजात बालकांपासून वय वर्षे १६ पर्यंत मुलांना सुवर्णप्राशन द्यावे. तसेच ज्या मुलांना वारंवार सर्दी-खोकला यासारखे आजार होतात , ज्या बालकांचे वजन वाढीच्या प्रमाणापेक्षा कमी असते अशा मुलांसाठी सुवर्णप्राशन विशेषत्वाने सांगितले आहे.
अगदी एक महिन्याच्या लहान मुलाला सुवर्ण प्राशन सुरू करून वयाच्या सोळाव्या वर्षापर्यंत दर महिन्याला सुरू ठेवता येते.
2. सुवर्णप्राशन कधी द्यावे :
सुवर्णप्राशन दर महिन्याच्या (हिंदू कालगणनेनुसार ) पुष्य नक्षत्राच्या तिथीला द्यावे.
3. घटकद्रव्ये :
सुवर्णप्राशन हे शुद्ध सुवर्णभस्म, गोघृत (गायीचे तूप) , मध, आणि वचा ,शंखपुष्पी , विडंग यासारख्या आयुर्वेदिक वनौषधींचा उपयोग करून बनवले जाते.
4. मात्रा :
1. मुहूर्तानुसार द्यायचे सुवर्णप्राशन - बिंदू स्वरुपात दिले जाते, याची मात्रा बालकाचे वय आणि वजन यावरून ठरवले जाते.
2. रोज घ्यायचे सुवर्णप्राशन - रोज द्यायचे छोट्या गोळ्यांच्या स्वरूपात आहे.
5. कुठे मिळेल?
पत्ता:
Dr. Snigdha's आयुर्वेदिक व पंचकर्म चिकित्सलय ।
Dr. Snigdha's आयुर्वेदिक व पंचकर्म चिकित्सलय ।
अपर्णा सरोवर,
कांची-गच्चीबावली रोड,
हैदराबाद, तेलंगणा.
आपण सुवर्णप्राशन घरी कुरिअरने सुद्धा मागवू शकता.
6. कुरियरने मागवण्यासाठी -सुवर्ण प्राशन,
एक महिना,
तीन महिने,
सहा महिने आणि
बारा महिने
या स्वरूपात उपलब्ध आहेत.
पार्सल मध्ये ,
दर महिन्याचे सुवर्णप्राशन
दर पुष्य नक्षत्राला दिले जाणारे सुवर्णप्राशन
आणि
वजन - उंचीचे नोंदणी कार्ड, चा समावेश असेल
7. अधिक माहिती व नोंदणीसाठी :
डॉ. स्निग्धा प्र. चुरी.
B.A.M.S. ( आयुर्वेद कायचिकित्सा तथा शल्य चिकित्सा स्नातक )
आयुर्वेदिक आणि पंचकर्म विशेषज्ञ
फोन : 09870690689
ईमेल - samanwayaayurveda@gmail.com
B.A.M.S. ( आयुर्वेद कायचिकित्सा तथा शल्य चिकित्सा स्नातक )
आयुर्वेदिक आणि पंचकर्म विशेषज्ञ
फोन : 09870690689
ईमेल - samanwayaayurveda@gmail.com
मेल करताना त्यामध्ये सुवर्णप्राशन (Suvarnaprashan) असा स्पष्ट उल्लेख असावा.
जर तुम्ही आमच्याकडे आगाऊ नोंदणी केली असल्यास , सर्व बालकांच्या पालकांना २ दिवस आधी सुवर्णप्राशन मुहुर्ताबाबत आठवण करून देणारा लघुसंदेश मोबाईल वर पाठवला जातो.
To read this article about "Suvarnaprashanam" in English , click the link below,
https://samanwayayurved.blogspot.in/2013/03/suvarnaprashan-ayurvedic-sanskaar-for.html?m=1
No comments:
Post a Comment