Thursday, 14 August 2014

नेत्रसुरक्षा




                   सध्या या मोबाइल , कॉम्प्युटर्स, आय पॅडस च्या युगात सर्वात जास्त ताण कशावर येत असेल तर तो म्हणजे डोळ्यांवर…… 
                         म्हणूनच हल्ली डोळे दुखणे, चुरचुरणे,जळजळणे,डोळ्यांना थकवा येणे,वारंवार वाढणार चष्म्याचे नंबर अशा तक्रारी मोठ्या प्रमाणावर दिसतात. या सुरुवातीच्या बारीक-सारीक तक्रारींकडे दुर्लक्ष होत राहिले तर मग हळूहळू वाचताना झोप येणे,एकाग्रता कमी होणे,डोकेदुखी,झोप कमी होणे,गाढ झोप न लागणे,
 डोके जड झाल्यासारखे वाटणे अशा दीर्घकालीन तक्रारी त्रास देऊ शकतात. या सर्व कारणांचे मूळ हे डोळ्यांची नीट  काळजी घेतली न जाणे यातच आहे.
                            डोळ्यांची काळजी घ्यायची म्हणजे नक्की काय करायचे यासाठी आपण प्रथम डोळ्यांची रचना पाहूया. पुढे दिलेल्या आकृतीप्रमाणे डोळ्याची रचना



डोळ्याची शास्त्रीय रचना




        नेत्र गोलकाच्या बाहेरच्या बाजूस असणाऱ्या पेशी





                         डोळा म्हणजेच  'नेत्र' हे चक्षुरिंद्रियाचे (पाहण्याचा अवयव,क्षमता) आणि ते सुस्थितीत ठेवायचे असतील तर डोळ्यांचा वापर त्यांच्या पूर्ण क्षमतेने व्ह्यायला हवा. मात्र mobile , tv , computers , वापरताना डोळे सतत एकाच ठिकाणी,ठराविक अंतरावर (ते सुद्धा जवळच्याच) पाहत असतात , तसेच या सर्व उपकरणांच्या स्क्रीन कृत्रिम प्रकाशाने उजळलेल्या असतत. अशा वेळी डोळ्यांवर, नेत्रगोलकाच्या पेशींवर ताण येतो. 
                              हे टाळण्यासाठी आपण सर्वानीच पुढे दिलेल्या काही सोप्या उपायांचा वापर करावा - 
  • रोजचे काम करताना दर २-३ तासांनी computer मधून थोडा वेळ काढून डोळ्यांचे आणि मानेचे व्यायाम करावेत (सवय झाली कि या कामासाठी १० मिनिटेसुद्धा पुरतात.)
  • कामाला सुरुवात करण्यापूर्वी तसेच काम झाल्यावर डोळे गच्च बंद करुन काही क्षण तसेच ठेवावेत आणि मग हळूहळू सैल करत उघडावे.  असे ४-५ वेळा करावे. 
  • त्यानंतर डोळे बंद करून त्यावर गार पाण्याचे हबके मारावेत. 
  • रात्री झोपताना आणि सकाळी उठल्यावर eye wash cup मध्ये साधे पाणी घेऊन त्याने डोळे धुवावेत.
या साध्या उपायांचा वापर दररोज करून आपण डोळ्यांवर येणारा ताण कमी करू शकतो. याखेरीज औषधी उपायांची गरज भासल्यास आयुर्वेदीय उपचार आणि पंचकर्म  उपायांचा वापर करता येतो. यामध्ये प्रामुख्याने वात दोषाची गति नियमित करणारे,कफ दोष कमी करणारे व पित्त दोष प्राकृत करणारे उपचार करण्यावर भर दिला जातो. विविध औषधे पोटात घेण्यासाठी तसेच नेत्रतर्पण (नेत्रबस्ती) , लेपन , बिडालक,शिरोधारा,आश्च्योतन,बस्ति आदि उपक्रम आदी पंचकर्म उपायही वापरले जातात.


वाग्भट नेत्रसुरक्षा 

                       वाग्भट नेत्रसुरक्षा  हा डोळ्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी तयार केलेला खास कार्यक्रम आहे. यामध्ये शास्त्रीय आणि आयुर्वेदीय पद्धतींचा मेळ घालून उपचार पद्धती निश्चित केली आहे. 
                             
                           कार्यक्रमाची वैशिष्ट्ये :  
  • डोळ्यावरचा ताण कमी करण्यासाठी डोळ्यांचे व्यायाम तज्ञ वैद्यांच्या मार्गदर्शनाखाली करून घेतले जातात. (यासाठी आठवड्यातून एक दिवस ठरवून आगाउ नोंदणी करावी, ४-५ आठवडे सलग येऊ शकल्यास सर्व व्यायाम संच टप्प्या-टप्प्याने शिकवले जातात)
  • औषधी चिकित्सा 
  • पंचकर्म चिकित्सा  -   नेत्र तर्पण 
                                     -  परिषेक 
                                     -  आश्च्योतन 
                                     -  अंजन 
                                     -   लेप / बिडालक 
                                     - बस्ति  
  • डोळ्यांच्या आरोग्यासाठी आवश्यक आहार, विहार,योग,श्वसन यांचे मौलिक समुपदेशन. 
कोणासाठी  :
  1. विद्यार्थी   
  2. सतत Computer शी संबंधित कामाचे स्वरूप असणाऱ्या व्यक्ति. 
  3. व्यवसायजन्य ताणामुळे असणाऱ्या डोळ्यांच्या तक्रारी इत्यादी.  

No comments:

Post a Comment