Wednesday, 17 September 2014

मनुका ( Black Raisins)


                   सुकामेवा  म्हटले की सर्वांच्याच त्यावर उड्या पडतात. पण हा सुका मेवा फक्त आवड म्हणून न खाता जर योग्य त्या प्रमाणात खाल्ल्यास औषधांना पूरक म्हणून आहारीय घटक म्हणून त्याचा चांगला उपयोग होतो.
                    या सुक्यामेव्यापैकीच आकाराने छोट्या  पण शक्ति/गुणांनी  मोठ्या असलेल्या मनुकांचा आपण विचार करूया.
                    सुकी द्राक्षे दोन प्रकारची असतात. मनुका (काळी द्राक्षे) आणि बेदाणे /किसमिस (तांबूस द्राक्षे) यापैकी मनुका अधिक गुणकारी असतात.

सामान्य माहिती :
                       द्राक्षाकुळ (Vitaceae family ) मधील वेलीच्या स्वरुपात आढळणारी हि वनस्पती असून तिचे शास्त्रीय नाव "Vitis vinifera" आहे.  द्राक्षे उत्तर-पश्चिम भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तान येथे दिसून येतात.    बिन बियांच्या द्राक्षांपेक्षा बिया असलेली द्राक्षे अधिक गुणकारी असतात. म्हणून मनुकासुद्धा घेताना बियांच्या  बघून घ्याव्यात.

आयुर्वेदीय गुणधर्म -
                                तेषां द्राक्षा सरा स्वर्या मधुरा स्निग्धशीतला  ।
                                रक्तपित्त ज्वरश्वास तृष्णादाहक्षयापहा ।।
                                                                                           च. सू. 
                      द्राक्षे गुणधर्माने सारक , आवाजासाठी उत्तम (स्वर्य ) , मधुर रस-विपाकी , स्निग्ध , शीतल गुणांची आहेत. त्यांचा रक्तपित्त, ताप, श्वास, तहान, दाह, क्षय आदि आजारांवर उपयुक्त आहे.

आहारीय पोषक तत्वे (Nutritional Qualities) :

 (Nutritive Value per 100gm)
PrincipleNutrient ValuePercentage of RDA
Energy299 Kcal15%
Carbohydrates79.18 g61%
Protein3.07 g5.5%
Total Fat0.46 g1.5%
Cholesterol0 mg0%
Dietary Fiber3.7 g10%
Vitamins

Folates5 µg1%
Niacin0.766 mg5%
Pantothenic acid0.095 mg2%
Pyridoxine0.0174 mg13%
Riboflavin0.125 mg10%
Thiamin0.106 mg9%
Vitamin A0 IU0%
Vitamin C2.3 mg4%
Vitamin E0.12 mg1%
Vitamin K3.5 µg3%
Electrolytes

Sodium1mg
11%
Potassium749 mg16%
Minerals

Calcium50 mg5%
Copper0.318 mg35%
Iron1.88 mg23%
Magnesium7 mg2%
Manganese0.299 mg12%
Phosphorus101 mg15%
Selenium0.6 µg1%
Zinc0.22 mg2%

इतर फायदे - 

  • रक्ताल्पता (Anaemia ) - 
                       मनुकांमध्ये लोह व vitamin B complex वर्गातील व्हिटामिन मोठ्या प्रमाणात असते. तसेच पित्तावर कार्यकारी असल्याने मनुकांचा रक्ताल्पतेमध्ये चांगला उपयोग होतो.
  • मलावरोध (Constipation ) -
                        मनुकांमध्ये Malic acid व तंतुमय पदार्थांचे प्रमाण जास्त आहे त्यामुळे मनुकांचा मलावरोधात खूप चांगला वापर होतो. यासाठी मूठभर मनुका व एक अंजीर सकाळी उपाशीपोटी चावून चावून खावे. किंवा मनुकांचे सूप* वा सरबत* घ्यावे. 
  • दौर्बल्य/थकवा  (ज्याला हल्ली बऱ्याचदा Weakness असे गोंडस नाव देतात.)
                         अति काम,वयामुळे,कुपोषणामुळे किंवा एखाद्या मोठ्या आजारातून बरे झाल्यावर जर थकवा जाणवत असेल तर मनुका हे एक उत्तम तर्पण (तृप्ती देणारे) औषध आहे. नुसत्या मनुका चावून किंवा सूप करून घ्याव्यात.
  • मदत्यय /दारूचे व्यसन (Alcohol addiction )
                         दारूमधील अल्कोहोल हे Neurons ना  क्षीण करते याउलट मनुका तर्पण , पोषण करतात. खजूर आणि मनुकांपासून बनवले जाणारे खर्जुरादी मंथ* हे पेय या आजारात खूप उपयोगी आहे.

उपरोक्त लेखात दिलेल्या पाककृती -
   
          मनुकांचे  सरबत -
                          १. मनुका - १ मूठ
                          २. प्यायचे पाणी - २-३ कप
                          ३. लिंबाचा रस - चवीपुरता
                          ४. मीठ - चवीपुरते
          मनुका रात्रभर २-३ कप पाण्यात भिजत घाल्याव्यात. सकाळी त्यातीलच थोडे पाणी वापरून मिक्सरमध्ये वाटून घ्याव्या. या मिश्रणात उरलेले पाणी मिसळून आवश्यक वाटल्यास चवीपुरता लिंबाचा रस व मीठ घालून नीट ढवळावे.
              (वजन वाढविण्यासाठी हे सरबत लिंबू-मीठ न घालता,दुधाबरोबर उकळून घेत येईल.)

टीप - या लेखात दिलेली शास्त्रीय,आयुर्वेदशास्त्रीय  माहिती ही सामान्य जणांच्या उद्बोधानासाठी आहे. रुग्णासाठी औषध म्हणून वापरताना याचा वापर वैद्यकीय सल्ल्यानेच करावा.

No comments:

Post a Comment