A Date or Two
A Date or Two नावाचा धडा, आपल्याला शाळेत असताना इंग्रजीच्या पुस्तकात होता . त्यात खजूराचे गुणधर्म आणि आहारातील उपयोग याबद्दल सांगितले होते . आज तोच धडा मी आयुर्वेदिक दृष्टीकोनातून पुढे नेणार आहे .
खजूर (मराठी/हिंदी ) खर्जूर (संस्कृत ) Dates (इंग्रजी )
Phoenix dactylifera ( Latin)
मधुरं बृहणं वृष्यं खर्जुरं गुरु शीतलम ।
क्षये sभिघाते दाहे च वातपित्ते च तद्हितम ।।
रस - मधुर वीर्य - शीत विपाक - मधुर
खजूर हे मधुर रसाचे , बृहण ,वीर्यवर्धक ,गुरु (पचायला जड ) , शीत आहे . क्षय , मार लागल्यामुळे झालेल्या जखमा , दाह तसेच वात-पित्त विकारांमध्ये उपयोगी आहे .
Nutritional Values :
Principle Nutrient Value Percentage of RDA
Energy 277 Kcal 14%
Carbohydrates 74.97 g 58%
Total Fat 0.15 g <1%
Protein 1.81g 3%
Cholesterol 0 mg 0%
Dietary Fiber 6.7 g 18%
Vitamins
Folates 15 µg 4%
Niacin 1.610 mg 10%
Pantothenic acid 0.805 mg 16%
Pyridoxine 0.249 mg 19%
Riboflavin 0.060 mg 4.5%
Thiamin 0.050 mg 4%
Vitamin A 149 IU 5%
Electrolytes
Sodium 1 mg
Potassium 696 mg 16%
Minerals
Calcium 64 mg 6.5%
Copper 0.362 mg 40%
Iron 0.90 mg
Magnesium 54 mg
थोडक्यात काय तर खजूर हे एक Power House म्हणता येईल .
Principle Nutrient Value Percentage of RDA
Energy 277 Kcal 14%
Carbohydrates 74.97 g 58%
Total Fat 0.15 g <1%
Protein 1.81g 3%
Cholesterol 0 mg 0%
Dietary Fiber 6.7 g 18%
Vitamins
Folates 15 µg 4%
Niacin 1.610 mg 10%
Pantothenic acid 0.805 mg 16%
Pyridoxine 0.249 mg 19%
Riboflavin 0.060 mg 4.5%
Thiamin 0.050 mg 4%
Vitamin A 149 IU 5%
Electrolytes
Sodium 1 mg
Potassium 696 mg 16%
Minerals
Calcium 64 mg 6.5%
Copper 0.362 mg 40%
Iron 0.90 mg
Magnesium 54 mg
थोडक्यात काय तर खजूर हे एक Power House म्हणता येईल .
- खजूर बृहण करत असल्यामुळे क्षय म्हणजेच , झीज होत असेल (अतिश्रमामुळे, रस-रक्तादि धातू क्षीण असल्याने ) तर खजूर लाभदायी ठरतो .
- खजूर श्रमहर आहे त्यामुळे थकवा आला असता , बराच काळ कुपोषण होत असेल तर खजूर उत्तम . (त्यामुळे प्रवासात,trecking -hiking करताना, श्रमाचे काम करताना जवळ खजूर असावेत .)
- दम,खोकला किंवा T.B . च्या रुग्णांना थोडा थोडा खजूर द्यावा .
- फायबर चे प्रमाण अधिक असल्याने मलावरोध (Constipation ) होत असेल तर खजूर जरूर खावेत .
- खजुरामध्ये लोहाचे प्रमाण जास्त असल्यामुळे रक्ताल्पता (Anaemia ) असल्यास आहारात खजूर असावेत .
- शुक्रधातु वाढविण्यासाठी खजूर लोणी व दुधाबरोबर घ्यावा . ( स्त्री व पुरुष दोघांनीही )
- तापामध्ये अशक्तपणा जाणवत असेल तर ताकद येण्यासाठी खजूर द्यावा .
- लहान बाळांना खारीक/खजूर दुधात उगाळून द्यावा . साप्तधातुच्या पोषणासाठी लाभदायक ठरते
- १ ते १० वर्षापर्यंत मुलांना साधारण पचनशक्ती प्रमाणे रोज सकाळी अर्धी किवा एक खारीक अथवा खजूर द्यावे .
- बृहण , तर्पण, रसादि धातुवर्धक असल्यामुळे बाळंतिणीस खजूर द्यावा,
- वजन कमी करण्याची इच्छा असलेल्या व्यक्तींनी तसेच Diabetes असलेल्या व्यक्तींनी खजूर नियंत्रित प्रमाणात खावा .
- सध्या पाश्चिमात्य देशांप्रमाणे भारतातसुद्धा Lactose Intolerence च्या केसेस दिसून येत आहेत . दुधातील Lactose शर्करेची Allergy असल्याने , दूध व दुग्धजन्य पदार्थांच्या सेवनाने हा त्रास होतो . अशा वेळी सप्त धातुवर्धन आणि शरीर पोषणासाठी खजूर खूपच उपयोगी आहे .
- खजूर लाडू रेसिपी - खजुराच्या बिया काढून खजूर मिक्सरमध्ये भरडसर वाटून घ्यावे. नॉनस्टिक पॅनमध्ये तूप गरम करावे त्यात खसखस घालून काही सेकंद परतावे. त्यात भरडसर वाटलेले बदाम, खोबरे आणि खजूर घालून मंद आचेवर गरम करावे.
नीट मिक्स झाले कि थाळीमध्ये काढून ठेवावे. हाताच्या तळव्यांना थोडे तूप लावून मिश्रण कोमटसर असतानाच लाडू बांधावेत. - स्वतःच्या आवडीनुसार मिश्रण केले तरी चालेल . यासाठी येथे प्रमाण मुद्धामच दिलेले नाही .
- ह्याच साहित्याच्या वड्या किंवा रोल सुद्धा करू शकता .
- मोठ्यांना आणि मुलांना डब्यात मधल्या वेळेचे खाणे म्हणून Snack bar / protein bars देण्याऐवजी हे लाडू अधिक फायदेशीर ठरतील .
No comments:
Post a Comment