….. अर्थातच आयुर्वेदानुसार
ती - क्या आपके टूथपेस्ट में चारकोल,नमक , निम्बू, लौंग , बबूल है????
मी - नाही , पण आम्ही दंत मंजन वापरतो , त्यात हे सगळे आहेच.
ती - किती आउट डेटेड , colurfull toothpaste is soooo coool
हल्ली सगळीकडे थोड्याफार फरकाने असेच संवाद ऐकायला मिळतात . ( क्लिनिकमध्ये तर फारच ) . हल्ली सगळ्याच घरांमध्ये वेगवेगळ्या रंगांच्या गोड - गोड टूथपेस्ट "IN" झाल्या आहेत . आणि त्यांच्या या गोड चवीमुळे बरीचशी जनता पेपर वाचत / TV बघत तोंडातला ब्रश चावत असते . लहान मुलांची तर वेगळीच कथा , त्यांच्यासाठी खास कार्टून्सच्या , रंगीबेरंगी , गोड टूथपेस्ट आल्या आहेत . परत त्या Floride Free सुद्धा आहेत . त्यामुळे ब्रश करताना दात साफ होण्यापेक्षा पेस्ट खाणेच जास्त होते .
आयुर्वेदानुसार मधुर (गोड) चव हि तोंडाला चिकटा आणणारी असते . (मधुरं रसं वक्त्रमनुलिम्पति । ) मग तोंडाला चिकटा आणणाऱ्या रसाची ही गोड टूथपेस्ट आपले तोंड कसे बरे नीट स्वच्छ करेल?
आता तुम्ही विचाराल, मग करायचे तरी काय? डॉक्टर 'तुमच्या' (हासुद्धा पेशंटच्या डिक्शनरीमधला खास शब्द ) आयुर्वेदाने तरी याबद्दल काही सांगितले आहे का?
तर हो , आयुर्वेदात 'दंतधावन विधी ' सांगितला आहे.
दंतधावन काष्ठ (टूथब्रश) बनवण्यासाठी खैर , करंज,निंब,वड ,अर्जुन,मधुक यापैकी झाडाची कोवळी फांदी ( साधारण १२ अंगुळे लांब व करंगळी एवढी जाड अशी ) घेऊन एका टोकाला चावून मऊ भाग तयार करावा आणि या ब्रशने दात,हिरड्या व जीभ घासावी. ही कोवळी काडी चावल्यामुळे दात -हिरड्यांना व्यायाम होतो. नंतर दात घासल्यामुळे जीभ न हिरड्या स्वच्छ होतात, तोंडाचा चिकटपणा - किटण कमी होतो. त्यानंतर जीभ साफ करावी. यासाठी तांब्याचा जिव्हानिर्लेखक ( Tongue Cleaner ) वापरावा. जीभ नियमित साफ केल्यामुळे जिभेच्या मुळाशी असलेला कफ निघतो आणि मुखदुर्गंधी दूर होते.
गंडूष /कवल (Gargling) - त्यानंतर व्यक्तीच्या प्रकृतीनुसार औषधी काढ्यांच्या गुळण्या कराव्यात किंवा काढे तोंडात धरावे. यामुळे जबड्याच्या हाडांना बळकटी येते. स्वर सुधातो, ओठ फुटत नाहीत तसेच सध्याचा Popular त्रास म्हणजे Sensetiveness of teeth ( दात शिवशिवणे / दाँतों की झुनझुनाहट ) खूप कमी होते. ( सध्या यासाठी सुद्धा महागड्या टूथपेस्ट्स prescribe केल्या जातात. )
आता तरीही कोणी विचारेल कि हे सगळे कसे काय करायचे तर हे लक्षात घ्या कि एवढे सगळे फायदे मिळणार असतील तर तर असे करण्यात काय हरकत आहे ? आणि नेहमीएवढाच किंवा कदाचित थोडासाच जास्त वेळ यासाठी लागेल . तरीही कोणाला अगदीच जमत नसेल तर त्यांनी किमान दंतमंजन वापरावे.फ़क्त हे दंतमंजन अगदी बारीक चूर्ण आहे याची खात्री करून घ्या. म्हणजे Dental Enamel खराब होणार नाही.
तसेच टाळू,ओठ,जिभेचे रोग झाले असतील किंवा तोंड आले असेल तर दंतधावन वापरू नये (म्हणजेच ब्रशने दात घासू नये. ) तर अशा वेळी बोटाने हळू दंतमंजन चोळावे आणि औषधी गुळण्या कराव्यात.
तर असे हे दंत आख्यान सफल संपूर्ण झाले . आता तुम्ही हे उपाय जरूर करून बघा आणि मला नक्की कळवा.
No comments:
Post a Comment