कुळीथाचे कढण / कळण
आयुर्वेदोक्त नाव ( कुलत्थ यूष )
आयुर्वेदोक्त नाव ( कुलत्थ यूष )
साहित्य
कुळीथ - १/४ वाटी
पाणी - ४ वाट्या
फोडणीसाठी साहित्य
तूप - २ चमचे
लसूण पाकळी - १
हिंग
जिरे
मीठ (चवीनुसार)
कृती
- कुळीथ आदल्या रात्री पाण्यात भिजत घालून सकाळी कुकरला ३-४ शिट्या होईपर्यंत शिजवावे
- यातील शिजलेले कुळीथ वेगळे काढून पाणी कढण बनवण्यासाठी वापरावे
- तूप,जिरे,हिंग, व लसूण यांची फोडणी या पाण्याला द्यावी.
- चवीनुसार मीठ घालावे.
- आवडत असल्यास फोडणीत कढीपत्ता घालू शकतो.
टीप
- हे कढण करताना त्या पाण्यात शिजलेले कुळीथ घोटून घातले व तिखट-हळद ,गोडा मसाला, गूळ , नारळ घालून कुळीथाचे सार करता येईल . हे सार भाताबरोबर खाण्यास छान लागते .
- आयुर्वेदिक गुण - हे कढण कफ-वात शामक ,उष्ण गुणाचे आणि पित्तकारक असते. वातव्याधी ,आमवात ,किडनी स्टोन या सारख्या आजारात तसेच वजन कमी करणाऱ्या माणसांसाठी आहाराचा भाग म्हणून हे कढण वापरता येते .
- मात्र गर्भिणी , क्षयरोगी , आणि पित्त प्रकृतीच्या व्यक्तींनी कुळीथ टाळावे .
No comments:
Post a Comment